एक बॉल टाकू अरे दोन बॉल टाकू
दोन बॉल टाकू अरे तीन बॉल टाकू
तीन बॉल टाकू अरे चार बॉल टाकू
चार बॉल टाकू अरे पाच बॉल टाकू
पाच बॉल टाकू अरे सहा बॉल टाकू
सहा बॉल च्या ओव्हरी
बॉल टाकी बॉलर
रण रण उनी रन रन देई
ऑफ साईड चौका मारे
ऑन साईड छक्का मारे
अश्शी ब्याटिंग सुरेख बाई माराया मिळतं
अश्शी बोलिंग द्वाड बाई जग अपुली मारीतं
कित्ती बोलिंग सुरेख बाई जरी ती टाकली
मध्ये पचके वेडा जैशी हो टवळी
सगळे साजरे झाले आता की जिंकलो
असे म्हणता म्हणता आम्ही गाफील झालो
तिकडून आला नेहरा त्याने निरखून पाहिले
लिंबूटिंबू त्याला ब्याट्समन वाटला
टप्पा टप्पा त्याने बॉल तो टाकला
चौका छक्का त्याने खोलून मारला
कागदावरची किती भारी ही टीम
भरून द्यावी त्यांना कागदाची रीम
घाण करा सगळे कागद यथेछ
मैदान तरी किमान राहील स्वछ
lay bharee
thanks
Besht!
thanku!