गन्धाल्पबलरागीयम् | Gandalf and the Balrog.

लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. गँडाल्फचा हा पैलूच कुणाला ठाऊक नव्हता. तो अचानक असे आपले विश्वरूपदर्शन देईलसे कुणाला वाटले नव्हते.

काही शब्दार्थ अगोदरच दिलेले बरे.

गंधाल्प- गँडाल्फ. सगळीकडे फिरूनही स्वतःच्या अफाट ताकदीचा परिचय न दिल्यामुळे अल्प आहे ज्याचा गंध असा तो.

बलराग- बॅलरॉग.

वामन- बुटका अर्थात ड्वार्फ.

अनल्प – एल्फ. एल्फ लोक हे अमर असतात आणि एकूणच समृद्धीत राहतात म्हणून त्यांना अन् + अल्प असे नाव दिले.

हवित्तक – हॉबिट.

प्रद- फ्रोडो, श्याम- सॅम, पिपिन-पिपिन, मारी-मेरी.

वज्राद- विझार्ड, शिवाय वज्र खाणारा तो वज्राद अर्थात प्रचंड पॉवरफुल.

सरुमान- सारुमान., रघुलास- लेगोलास, गम्बली – गिमली, वरमिहिर – बोरोमीर, अलघूर्ण- आरागोर्न.

मौर्यखनि- माईन्स ऑफ मोरिया. औरग – ऑर्क. कज्जलधूम-khazad-dum.

कथैषा मध्यदेशस्य द्वापरे ह्यघटत्खलु |
मुद्रिकाभञ्जनस्यैषा सा कथा शृणुयु:स्तदा ||१||

पूर्वं हि कथिता सम्यक्कथाया: पूर्वपीठिका |
मुद्रिकाभञ्जनायैव शायरात्ते बहिर्गता: ||२||

के क आसन् चमौ तस्मिन्? तत्र वै सर्ववंशिका: |
पुरुषा: वामनाश्चापि, अनल्पाश्च हवित्तका: ||३||

गन्धाल्पोऽपि तु तत्रासीत्सर्वाणां मार्गदर्शकः |
वज्रादो ज्ञानवॄद्धो सः सरुमानसमः खलु ||४||

प्रद: श्यामः पिपिन् मारी रघुलासश्च गम्बली |
सार्धं च वरमिहिर: अलघूर्णश्च अन्तिमः ||५||

मौर्यखन्यां तु ह्यगमन् निरुपायाच्च ते खलु |
तत्र वामनभूपेन स्वागताकाङ्क्षिणो ह्यपि ||६||

औरगै: किन्तु तद्राज्यं कॄतं नष्टं हि सत्त्वरम् |
वसन्ति स्म पूर्वखन्यौ तेन दुष्टाश्च औरगा: ||७||

बहूँश्चौरगपिशाच्चान् हत्वाऽस्माकं जनास्त्वहो |
अधावन् त्वरया सार्धं गन्तुं खन्या: बहिस्तथा ||८||

तदानीमेकदाऽपश्यन् कोष्ठं गुरुतम़ं जना: |
उच्चै: नैकैरहो स्तम्भै: धृतवान् कोष्ठभार ह ||९||

पुनस्तत्र नवचमू: अरिभि: परिवेष्टितः|
तदानीमेव विचित्रः ध्वनि: गुरुतरोऽभवत् ||१०||

तच्छृत्वा शत्रवो सर्वे ह्यधावन् तेऽचिरात्खलु |
नवचमौ जना: सर्वे क्षणाय वै अमोदयन् ||११||

छाया चाग्नि च इत्येतं सरुमानोऽवदत् पुरा |
गन्धाल्पं तच्च गन्धाल्प: तदानीमस्मरत् तदा ||१२||

“एषः उच्चतमः शत्रु:, इदानीं तु पलायनम् |
इत्येव करणीयं स्यात्” गन्धाल्पश्चावदत्त्विदम् ||१३||

अधावन् त्वरया सर्वे यदैतच्च श्रुतम् तदा |
तदानीमन्तिमे चांशे सेतुरेको हि दृश्यमान् ||१४||

कज्जलधूम चानेन नाम्ना ज्ञात: स सेतु वै |
आक्रम्य सेतुमेनं तु जना: पारं गता: परम् ||१५||

गन्धाल्पः तत्र वै स्थित्वा अपश्यत्स मुहुर्मुहु:|
अचिरात्तत्र चागच्छत् महाशत्रु: निशाचरः ||१६||

बलरागः इति नाम्ना विख्यातः शत्रु स: महान् |
महाकाय: चतुर्बाहु: अग्निमान् धूमवाँश्च सः ||१७||

प्राचीनराक्षसेणाग्निप्रतोदोऽपि तु धार्यते |
प्रतोदनर्तनं दृष्ट्वा मर्त्या: भीता: तु सत्त्वरम् ||१८||

गन्धाल्पो किन्तु तत्रैव सेतोरुपरि वै स्थित: |
“गच्छ सूकर गुंफायां, प्रवेशोऽत्र निषिध्यते” ||१९||

इत्यवदत् भयशून्य: “महावह्नेऽस्मि किङ्करः |
अन्ध:कारबलादत्र न कदा प्रभविष्यसि ||२०||”

तच्छ्रुत्वा बलरागस्तु दिव्यासिमुपयुक्तवान् |
गन्धाल्पोऽपि प्रकाशस्य वलयेन तु वेष्टितः ||२१||

बलरागः हतबल: प्राभवन्नात्र चासिना |
पादाक्रान्तं तदा सेतुं कर्तुं सः आगतोऽग्रतः ||२२||

महाक्रोशेण क्रोधेण गन्धाल्पः जल्पते तथा |
“नैवागच्छ नैवागच्छ गच्छ गच्छ हि पृष्ठत:” ||२३||

तदानीं सेतुभागं च गन्धाल्पस्तु अताडयत् |
सेतुर्नष्टो बलरागस्तेन स: पतितो ह्यधः ||२४||

बलरागप्रतोदेण बद्ध्वा गन्धाल्पमत्र सः |
बलरागो हि अगृह्णात् अधः तेन सह त्वहो ||२५||

तत्पश्चाद्घटना: नैका: अभवन् तास्त्वहम् ननु |
कथयिष्यामि अत्रैव समयेऽन्ये यथामति:||२६||

|| इति श्री मुद्रिकाभारते प्रथमे मुद्रिकानाशकचमूनाम्नि पर्वे मौर्यखन्याध्यायः समाप्तः ||

Posted in कविता-बिविता | यावर आपले मत नोंदवा

|| बिर्याणीस्तोत्रम् || The hymn of Biryani.

अथ ध्यानम्|

ओदनं प्रथमं स्मृत्वा तत्पश्चात् कुक्कुटं स्मरेत्|
स्मरेत् खाद्यरसाँश्चैव स्वादो यैश्च प्रदीयते ||1||

एराने वै पुरा कल्पे अजायत् प्रथमं हि सः |
तस्मात्कलियुगे शीघ्रं प्रविष्टो भारतेऽपि सः||2||

कलौ यद्यपि वर्धेत खल्वधर्मो भृशं भुवि |
अभवत्तु शुभं किञ्चित्तथापि पश्यतामहो ||3||

जिह्वेन्द्रो व्रीहिपुत्रोऽयं महास्वादो रसेश्वरः|
सार्धं कुक्कुटमांसेन रसैर्नाना स मण्डितः ||4||

अचिराद्भारतस्तेन जिह्वारसबलाहत: |
शक्नुवन्त न तत्कर्तुं बहवो चक्रवर्तिनः ||5||

बिरियाणीति नाम्ना सः जिह्वानन्दाय राजते |
विलीयन्ते हि सकला: भेदास्तत्सेवने खलु ||6||

ओदनो मांसहीनस्तु बिरियाणीति कथ्यते |
यैस्ते सर्वेऽपि मूर्खाश्च पापिन: सन्ति वै खलु ||7||

विश्वे तु शाकबिर्याणी वर्तते न कदाचन |
इत्यस्ति सत्यमेतत्तु धार्यं मनसि सर्वथा ||8||

तण्डुला: सुभगा: दीर्घा: बासमत्या: हि प्रायशः|
सम्बारै: दधिना स्नातं मृदु मांसं च नीयताम् ||9||

नीत्वा पात्रे रचित्वा च अर्पित्वा वह्निदैवतम् |
यथायोग्येन कालेन त्वाश्चर्यं सृजतेऽग्निना ||10||

द्रविडे लक्ष्मणावत्यां वर्तते आन्ध्रवङ्गयो:|
चत्वारि मूलरूपाणि उपरूपाण्यनेकशः ||11||

ब्रह्मानन्दो महानन्दो सेवनेनास्य प्राप्यते |
खाद्यभक्त्या सह स्याद्वै भक्तिर्दशविधा खलु||12||

अर्पयेत् यस्तु बिर्याणीं एकदाऽपि जनान् भुवि |
स प्राप्नोति महत्पुण्यम् पृथिवीस्वर्गलोकयो: ||13||

असंविभज्य नित्यं तु बिर्याणीं योऽपि खादति |
पापीयान्स भवत्यत्र वर्तते नैव संशयः ||14||

||इति श्री खाद्यपुराणे निखिलकृतं सङ्कटनिवारकं बिरियाणींस्तोत्रं सम्पूर्णम्||

चुका सुधारल्याबद्दल हेमंत(शास्त्री) राजोपाध्ये यांचे अनेक आभार.

Posted in कविता-बिविता | 8 प्रतिक्रिया

Modeling.

“Yeah, so what do you do?”
“Modeling”.
“Oh really?”
“Yeah.”
“Forgive me but…umm..you don’t look like one.”
“See, that is the problem with society. They simply don’t appreciate that many variables go in making a model. It’s a complex thing and no one should consider only one facet of it.”
“Oh, I am so sorry but I mean…models go through a very rigorous routine and you don’t seem to follow one.”
“What?? Who told you that? That guy over there? He is the worst slob I have ever seen. All he knows is a ramp function, whereas I check my procedure if it satisfies all diagnostics. I am very careful to remove all outliers beforehand.”
“So you work out daily huh? little hard to believe, but what do you do in workout, anyway?”
“Well there are many procedures I use everyday. Hill climbing, back-propagation, lasso are some of my favorite methods. I also love random forests as they keep coming in the way.”
“Wow, nice. Can you tell me who is the best designer you know?”
“Taguchi, undoubtedly.”
“Who is this? I don’t recall seeing this name ever. Is he a new guy?”
“Oh no, he is a very well-established player and has a rather niche market which is arrayed rather orthogonally to the usual guys.”
“Umm what about Gucci etc?”
“No, but we find Ricci very useful-esp when the concept is related to a flow.”
“What are the current trends of fashion now a days?”
“Well, many new things are coming up. But mostly all are nonparametric. Some are rather nonstandard but good because they are surreal.”
“Who are your clients?”
“They are a pretty diverse group. From defense guys to bankers, we have it all.”
“Wow, that is very impressive. Can you show me your portfolio?”
“I’m sorry but currently we are in the middle of optimizing it.”
“What do you mean you are optimizing it?”
“Some of the models don’t perform as per expectations, so we have to look for new ones all the time.”
“So where do you look for them?”
“We reach out to the community and constantly look out for anything new that comes up. Not many models perform all that good, actually-despite how they might look good on paper.”
“Damn, it must be tough to be a model. Don’t you feel ever threatened?”
“No (laughs), never. If need be, One can always tweak a model to make it perform better.”
“So you will be ok with alterations? implants? (shocked)”
“Hey chill…blunt accuracy is not the sole thing that matters.”
“So you don’t value human life, you only want stupid performance. That is sick.”
“Well, take a pick.”
“What is there to pick?”
“Between precision and accuracy. It’s not as one-sided as you think. One has to think of bigger issues also. Is this line of modeling any good? Will it extend to other domains? Does it scale up?”
“Now I am satisfied. I will tell my friends that modeling is not as hectic.”
“Oh and don’f forget to tell them to study hard-esp Math”
“Umm okay but why?”
“How can you go for modeling if you don’t know your Math?”
“So what kind of modeling are we talking here?”
“Mathematical modeling, of course-what did you think?”
“&^%%%$$$$!!!!”

Posted in Uncategorized | 2 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

प्रस्तावना

हा कथाभाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे. अख्ख्या कथेचा क्लायमॅक्स या भागात पहावयास मिळतो. ओडीसिअसचे लोकोत्तर चातुर्य, ग्रीकांची अपरिमित हाव आणि क्रूरता तसेच ट्रोजनांची त्यांच्या दुर्दैवाने उडालेली दैना हे सर्व या भागात एकवटलेले आहे. पोस्टहोमेरिकामधील बुक क्र. ११ ते १३ मधील, तर ग्रीक एपिक सायकलमधील लिटल इलियड व इलियू पर्सिस या दोन काव्यांमधील कथाभाग यात येतो.

फायनल लढाया, अनिर्णित शेवट.

आता पॅरिस मेला होता, पण तरीही त्याच्या थडग्यापाशी जाऊन शोक करायला ट्रोजन स्त्रिया धजावत नव्हत्या. साहजिकच आहे म्हणा- ट्रॉयच्या मजबूत दगडी भिंती ओलांडून बाहेरच्या गोमगाल्यात कोण कशाला जाईल फुक्कट मरायला? ग्रीकांचा आवेश तर कमी व्हायचे नाव घेत नव्हता.

अकिलीसपुत्र निओटॉलेमस फुल फॉर्मात आला होता. पहिल्यांदा त्याने लाओदामस नामक ट्रोजनाला ठार मारले. त्याच्या लगत पाठोपाठच निरस नामक ट्रोजनाच्या जबड्यातून आरपार भाला खुपसला. तो जबडा, जीभ पूर्ण आरपार भेदून पुढे घुसला. निरस जागीच कोसळला. कसातरी भेसूरपणे किंचाळत तो मरत असताना त्याच्या तोंडातून भळभळ रक्त वाहू लागले. त्यानंतर त्याने भाला फेकून एव्हेनॉर नामक ट्रोजनाचं यकृत बाहेर काढलं. त्यानंतर त्याने इफितिऑन आणि हिप्पोमेदॉन नामक ट्रोजनांनाही लगेच यमसदनी धाडले.

इकडे एनिअसनेही ब्रेमॉन आणि अँद्रोमाखस नामक ग्रीकांना लोळवले. दोघांना रथातून खाली ओढले. ब्रेमॉनच्या गळ्यात भाला खुपसून त्याला ठार मारले, तर अँद्रोमाखसच्या कपाळावर एक मोठ्ठा धोंडा फेकून त्याची कवटीच फोडली. त्या दोघांच्या रथांचे घोडे घाबरून सैरावैरा धावू लागले. एनिअसच्या सहकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले.

ग्रीक धनुर्धारी फिलोक्टॅटेसने पिरासुस नामक ट्रोजनाला तो पळायच्या तयारीत असताना त्याच्या गुडघ्याच्या मागच्या बाजूवरील स्नायूवर बरोब्बर नेम धरून बाण मारला आणि त्याला जायबंदी केले. ते पाहून एका ग्रीकाने तलवारीने पिरासुसचे डोकेच उडवून टाकले. ते उडवलेले डोके फुटबॉलसारखे दूर पडले. त्याचे ओठ शेवटपर्यंत विलगच राहिले.

हेक्टरचा भाऊ अन नेहमी शहाणपणाचा सल्ला देणारा पॉलिडॅमस यानेही आज पराक्रम चालवला होता. युरिमॅखस आणि क्लिऑन नामक ग्रीकांना त्याने भाल्याच्या सहाय्याने लोळवले.

इथाकानरेश ओडीसिअसनेही आपल्या तलवारीने पॉलिडोरस तर भाल्याने एइनस या ट्रोजनांचा बळी घेतला. स्थेनेलस या ग्रीक योद्ध्याने आबास नामक ट्रोजन योद्ध्याला खांद्यात भाला फेकून ठार मारले. डायोमीडने लाओदोकस नामक ट्रोजनाचा प्राण घेतला, तर आगामेम्नॉनकडून मेलियस नामक ट्रोजन योद्धा मरण पावला. प्रिआमपुत्र डेइफोबसने आल्किमस आणि द्रिआस या ग्रीकांना ठार मारले, तर आगेनॉर या ट्रोजनाने हिप्पासस नामक ग्रीकास हेदिससदनी पाठवले. थोआस या ग्रीकाने लिंकस आणि लामुस या ट्रोजनांना मारले, तर मेरिओनेस आणि मेनेलॉस या दोघांनी अनुक्रमे लिकॉन आणि आर्किलोखस या ट्रोजनांना ठार मारले. थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ अन श्रेष्ठ धनुर्धारी ट्यूसरकडून मेनोएतेस नामक ट्रोजन योद्धा वीरगतिस प्राप्त झाला. युरिआलस नामक डायोमीडच्या सहकार्‍याने एक भलामोठा धोंडा घेऊन तो ट्रोजन सैन्यावर फेकला. ट्रोजन सैन्यात फुल खळबळ उडाली आणि मेलेस नामक ट्रोजनाच्या हेल्मेटवर त्याचा जोरात आघात होऊन तो जागीच कोसळला.

अशाप्रकारे सगळीकडे नुसती बोंबाबोंब चालू होती. ट्रोजनांची पिछेहाट होतेय असे वाटत असतानाच एनिअस आणि युरिमाखस हे दोघे ट्रोजन योद्धे एकदम फॉर्मात आले. इतके पेटले की ग्रीकांचे त्यांच्यापुढे काहीच चालेना. ग्रीक सैन्य पाय लावून पळत सुटले. पण तेवढ्यात एक ग्रीक योद्धा शत्रूशी मुकाबला करायला त्याच्याकडे वळला. तो पुढे येणार एवढ्यात आगेनॉर नामक ट्रोजनाने त्याच्या खुब्यात भाला खुपसून त्याचा हातच तोडला आणि त्याला ठार मारले. पण त्याच्या हाताने जो लगाम पकडला होता त्याची पकड इतकी घट्ट होती, की तो जरी मेला तरी घोड्याच्या लगामाला तो हात तसाच घट्ट पकडून धरलेला होता. ते भेसूर दृश्य पाहून सर्वांना कळायचं बंद झालं.

इकडे एनिअसने फेकलेला भाला आन्थालस नामक ग्रीकाच्या बेंबीतून आत घुसला. असह्य वेदनेने किंकाळी फोडत आंथालस कोसळला. त्याची आतडी बाहेर आली. ग्रीक आता लैच घाबरले होते. जुवाखाली बैल दबावेत तसे दबून गेले होते. तेवढ्यात अकिलीसपुत्र निओटॉलेमस ओरडला, “भित्रटांनो! जरा मर्दागत वागा! काय लाज आहे की नाही आँ?”

त्याने घातलेल्या शिव्या ऐकून ग्रीक पेटले. निओटॉलेमस आणि मॉर्मिडन सैन्य एखाद्या वादळागत झंझावाती कत्तल करीत सुटले होते. निओटॉलेमस आणि एनिअस यांचा सामना न होता, दोहोंनी एकमेकांचा नाद सोडून अनुक्रमे ट्रोजन आणि ग्रीकांची यथेच्छ कत्तल केली.

त्यानंतरही अव्याहत लढाई सुरुच राहिली, पण मग एकदम वादळ आले त्यात कोण आपला, कोण परका काहीच कळेना. जो जवळ येईल त्याला मारायचे इतकेच धोरण सर्वांनी ठेवले. जवळ ग्रीक आहे की ट्रोजन याची पर्वा न करता दोन्ही बाजूंच्या लोकांनी लै लोक मारले. सर्वांना कन्फ्यूजननं कळायचं बंद झालं होतं. काही वेळ असाच गेल्यावर मग वादळ विरले आणि शत्रू-मित्र सर्व काही धडपणे दिसू लागले. मग पुनरेकवार नव्या जोमाने कत्तलखाना सुरू राहिला. ग्रीकांची हळूहळू सरशी होत होती. ट्रोजन्स मागे हटू लागले. त्यांतले काही थोडेच धडपणी ट्रॉयमध्ये आत शिरले. त्यांच्या जखमांना जळवा लावून त्या नीट धुतल्या गेल्या, गरम पाण्याने आंघोळ करायची व्यवस्था केली गेली आणि शांतपणे त्यांना निजवले गेले. ग्रीकही आपल्या जहाजांकडे परतले.

ट्रॉयमध्ये घुसण्याचा ग्रीकांचा प्रयत्न अयशस्वी ठरतो.

दुसर्‍या दिवशी पुन्हा लढाईला तोंड लागले. ट्रॉयला इडायन आणि स्कीअन असे दोन दरवाजे होते. त्यातल्या स्कीअन दरवाज्यासमोर कापानेउसपुत्र आणि डायोमीडने हल्ला चालवलेला होता. त्याला विरोध करायला डेइफोबस आणि पॉलितेस हेही तत्पर होते. इडायन दरवाजासमोर अकिलीसपुत्र निओटॉलेमसचा दंगा चालला होता. त्याला अडवण्याची हेलेनस आणि आगेनॉर हे दोघे पराकाष्ठा करीत होते. दरवाजे तोडून घुसण्याची ग्रीकांची खटपट चालली होती- आज पहिल्यांदाच ग्रीक सैन्य ट्रॉयच्या इतक्या जवळ इतक्या बहुसंख्येने येऊ शकले होते. त्यांच्या मदतीस ओडीसिअस, युरिआलस आणि ट्यूसर हे होते, तर भिंतींवरून दरवाजांचे रक्षण करण्यासाठी एनिअस झगडत होता. बाण, भाले, यांचा दोन्ही बाजूंनी हिमकणांसारखा वर्षाव होत होता.

त्यात ओडीसिअसने आपल्या बेरकी डोक्यातून एक शक्कल लढवली. बर्‍याच योद्ध्यांना त्याने एकत्र केले आणि प्रत्येकाने आपापली ढाल आपल्या डोक्याच्या बरोब्बर वरती धरायला लावली. त्यामुळे ढालींचे एक छतच तयार झाले. तशा पोझिशनमध्ये ते ट्रॉयच्या बुरुजापाशी आले. वरून ट्रोजनांनी ते छत भेदायचा आटोकाट प्रयत्न केला. लै बाण मारले, कितीतरी भाले फेकले, पण ढालींचे कवच अभेद्य राहिले. ते पाहून आगामेम्नॉन आणि मेनेलॉस दोघेही आनंदले. सर्व योद्ध्यांनी एकत्र एका दमाने ट्रॉयच्या दरवाजाला धडक दिली, पण दरवाजा काही तुटला नाही. त्यांना बॅटरिंग रॅमची कन्सेप्ट माहिती नसावी, नैतर असला यावनी प्राणायाम केला नसता. शेवटी हा प्रकार एनिअसच्या नजरेला पडलाच. त्याने धोंड्यांमागून धोंडे ग्रीकांच्या ढालींवर फुल वेगाने एकदम जीव खाऊन मारायचा सपाटा लावला. साहजिकच ग्रीकांची फाटली आणि ते पळू लागले. दगडांच्या मार्‍याने ति फळी पूर्णच मोडून पडली. पळणार्‍यांचा पाठलागही एनिअसने एकदम कुतून केला अन लै ग्रीक मारले.

इकडे धाकटा अजॅक्सही आपल्या धनुर्विद्येने बहुत ट्रोजनांस हेदिससदनी धाडता जाहला. त्याचा एक लोक्रियन सैनिक आल्किमेदॉन एकदम जोशात आला. त्याने सरळ एक शिडी घेतली आणि ट्रॉयच्या तटाला लावली. हातात एक भाला घेऊन तो शिडी चढू लागणार एवढ्यात दूरवरून एनिअसने ते पाहिले आणि त्याच्या डोक्यावर एक भलाथोरला धोंडा असा काही फेकून मारला, की आल्किमेदॉन जागीच खलास झाला. त्याच्या मेंदूचे तुकडे खाली मैदानात इतस्ततः विखरून पडले. आपल्या सहकार्‍याची अशी अवस्था पाहून लोक्रियन सैनिक घाबरले.

ते पाहून ग्रीक अश्वत्थामा फिलोक्टॅटेसने एनिअसवर नेम धरून एक बाण सोडला, परंतु तो त्याच्या चिलखताला चाटून गेला. जाता जाता तो मेदॉन नामक एका ट्रोजनाला लागून तो बुरुजावरून खाली कोसळला. आपला मित्र मेला हे पाहून एनिअसने एक धोंडा वरून खालि फिलोक्टॅटेसच्या दिशेने फेकला, परंतु तो त्याला न लागता तोक्साएख्मेस नामक त्याच्या एका सहकार्‍याला लागून त्याची कवटी फुटली अन तो गतप्राण झाला. तेव्हा चिडून फिलोक्टॅटेसने एनिअसला समोरासमोर युद्ध करण्याचे आव्हान दिले, पण एनिअस काही बोलला नाही. त्या दिवशीचे युद्ध लै रेंगाळले. बराच वेळ कुणालाही कसलीच विश्रांती मिळाली नाही.

ओडीसिअसचे जबरी डेरिंग, वेषांतर करून ट्रॉयमध्ये प्रयाण.

इतके युद्ध करूनही ट्रोजन्स काही बधेनात. ग्रीकांना कळायचं बंद झालं. शेवटी शक्तीऐवजी युक्ती वापरावी असा निर्णय घेतला गेला. त्यातच ग्रीकांच्या पथ्यावर पडणारी एक गोष्ट घडली. पॅरिस मेल्यानंतर हेलेनबरोबर लग्न करण्यासाठी हेलेनस आणि डेइफोबस या दोघा भावांमध्ये चुरस सुरू झाली. त्यात डेइफोबससी सरशी झाल्यावर हेलेनस चिडून ट्रॉयच्या बाहेर निघून गेला. हे कळल्याबरोब्बर ओडीसिअसने दबा धरून इडा पर्वताजवळ त्याला पकडले, व त्याची फुल धुलाई करून त्याच्याकडून माहिती काढून घेतली. तोही चांगला भविष्यवेत्ता होता. त्याने सांगितल्याप्रमाणे ट्रॉयमध्ये अथीना देवीचा लाकडी पुतळा (Palladium) जोपर्यंत होता तोपर्यंत ग्रीकांना जय नव्हता.

मग ओडीसिअस वेषांतर करून एका भिकार्‍याच्या वेषात ट्रॉयमध्ये गेला. गेला तो डैर्रेक्ट हेलेनपर्यंतच गेला.

“भिक्षा वाढा हो माई!”

हेलेनने त्याला पाहताक्षणी ओळखले.

“अय्या ओडीसिअस तू! इथे काय करतोयस?”
“चूप गं हेलेन, जरा हळू! ट्रोजनांना कळालं मी इथं आहे तर मला भाजून खातील.”
“अरे किती वर्षांनी आपण भेटतोय! इथं ट्रॉयमध्ये इतकी वर्षं राहून आता कंटाळा आलाय. पॅरिसही मेला, मला आता घरची आठवण येतेय.”
“बरं मला सांग ते अथीना देवीचं पॅलाडियम कुठंय?”
“….”

ओडीसिअस आणि डायोमीड पॅलाडियम चोरतात.

त्याचा ठावठिकाणा ओडीसिअसने माहिती करून घेतला. हेलेनचे या कामी त्याला चांगलेच सहकार्य मिळाले. वाटेत काही ट्रोजनांना ठार मारून तो परत जहाजांकडे आला. नंतर एका गुप्त मार्गाने ओडीसिअस आणि डायोमीड परत आत शिरले. वाटेतील ट्रोजनांना गुपचूप ठार मारले अन तसेच कुणाला पत्त्या लागू न देता परत जहाजांकडे आले.

ट्रोजन हॉर्स

पॅलाडियम तर चोरलं. आता मुख्य बेत आखायचा होता. इथेही ओडीसिअसच मदतीला धावून आला. त्याने आपली बेरकी युक्ती सांगितली. “ट्रोजनांना गंडवायचं असेल तर मी सांगतो तसं करा. एक मोठ्ठा लाकडी घोडा बनवा आणि त्यात आपले जगातभारी योद्धे आत बसतील अशी व्यवस्था करा. आपण परत ग्रीसला निघून गेलो असे भासवा, सगळे तंबूबिंबू जाळा आणि जवळच्या टेनेडॉस बेटाकडे चला. म्हणजे ट्रोजनांना इथून आपण दिसणारही नाही आणि आपल्याला जवळच बसताही येईल. अन मग ट्रॉयमध्ये आजिबात माहिती नसलेल्या कुणा एका ग्रीकाला घोड्यापाशी ठेवा. त्याच्या अंगात मात्र डेरिंग पाहिजे. ट्रोजनांनी कितीही त्रास दिला तरी त्याने फक्त इतकंच सांगायचं की ग्रीकांनी परतीच्या प्रवासासाठी म्हणून देवांना हा घोडा अर्पण केलाय आणि मला सोडून गेलेत. ट्रोजनांनी तो घोडा ट्रॉय शहरात नेईपर्यंत त्याने त्यांना कन्व्हिन्स केलंच पाहिजे. अन एकदा का तो घोडा ट्रॉयमध्ये गेला, की मग आतले वीर त्यातून उतरून तटबंदीवर चढतील आणि मशालींनी सिग्नल देतील. ते पाहून आम्ही ट्रॉयकडे येऊ अन रात्रीच्या अंधारात शिरून बेसावध ट्रोजनांची चटणी उडवू.”

हा प्लॅन ऐकल्यावर सर्व ग्रीकांनी “पॉली काला!” अर्थात “लै भारी” च्या गर्जनांनी आसमंत दुमदुमविला. सर्वांना प्लॅन लैच पसंत पडला होता. काल्खसभट्टाने ओडीसिअसची लैच प्रशंसा केली. पण अकिलीसचा मुलगा निओटॉलेमस मात्र लढाईसाठी अजून फुरफुरतच होता. “लढणे हाच शूरांचा धर्म असतो. ट्रोजनांना घाबरल्यामुळे चालल्यात गमजा गंडवायच्या! अरे सरळ बोला की, घाबरलाय म्हणून!”

यावर ओडीसिअस उत्तरला, “पोरा, लै फुरफुरू नको. तुझा बाप इतका जगातभारी असला तरी त्यालाही ट्रॉय उध्वस्त करणं जमलं नाही. त्यामुळं गप मी सांगतो ते ऐक. काल्खस म्हणतोय तसं आपण आता जहाजांकडे जाऊ आणि इडा पर्वतावरून लाकूडफाटा आणून इथे टाकू. एपियस हा आपल्याकडचा सर्वश्रेष्ठ सुतार आहे, त्याला हा घोडा बनवायला देऊ. तो छान घोडा बनवेल.”

तरीही निओटॉलेमस अन फिलोक्टॅटेस दोघेही लढाईसाठी फुरफुरतच होते-त्यांनी आपल्या सैनिकांना ट्रॉयकडे जाण्यास फर्मावले. ते गेलेही असते, पण आकाशात विजांचा लखलखाट झाल्याने हा झ्यूसचा निषेध समजून ते गप्प बसले.

दुसर्‍या दिवशीची पहाट झाली. आगामेम्नॉनने इडा पर्वतावर चपळ लाकूडतोडे पाठवले. त्यांनी मोठी अन छोटी अशी सर्वप्रकारची अनेक झाडे तोडली. ते ओंडके वाहून आणताना खेचरांच्या अन त्यांना आवरता आवरता ग्रीकांच्या पाठी भरून आल्या. एपियसच्या नेतृत्वाखाली काम जोरात सुरू झाले. कोणी ओंडक्यांवरच्या लहानसहान फांद्या छाटू लागले, कुणी ओंडके तासून नीट आकारात आणू लागले तर कोणी त्यांच्या फळ्या बनवू लागले. फळ्यांना रंधा मारून अंमळ गुळगुळीत करू लागले. करवतींच्या आवाजांनी आसमंत भरून गेला. यथावकाश तासलेल्या लाकूडफळ्यांचा ढीग तयार झाला. कुशल एपियसने मग पहिल्यांदा घोड्याचे भक्कम चार पाय तयार केले. नंतर त्याचे पोट अन मागील भाग त्या पायांवर नीट उभा राहील अन पूर्ण चिलखतासकट ग्रीक योद्ध्यांचे वजन पेलू शकेल इतके भक्कम व तेवढेच मोठे बनवले. नंतर मग गळा, डौलदार मान आणि त्याचे डोके हे बनवले. अथीना देवीच्या कृपेने घोडा वट्ट तीन दिवसांत बनून तयार झाला. अन एकदम खर्‍याखुर्‍या घोड्यागत देखणा दिसू लागला. मग एपियसने त्याच्या रक्षणासाठी अथीना देवीची प्रार्थना केली. सर्व ग्रीकांनी तो घोडा पाहून एपियसची लैच प्रशंसा केली. हा एपियस अकिलीस अन पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्समध्ये बॉक्सर म्हणून नावाजलेला आहे.

आता घोडा तयार झाला. पण त्या घोड्यापाशी थांबून ट्रोजनांना गंडवणार कोण? हे काम अतिशय महत्त्वाचे होते. याच्या यशावरच ग्रीकांची भिस्त होती. हा फार मोठा जुगार होता. लागला तर जॅकपॉट, पण नै लागला तर क्रॅकपॉटच होणार होता. मग सर्वांना बोलावून ओडीसिअस म्हणाला, “ग्रीकहो, नीट ऐका. हा क्षण हुमदांडगेपणा करण्याचा नाही, तर डोक्याने विचार करण्याचा आहे. धाडस आणि चातुर्याच्या बळावरच आपल्यापेक्षा ताकदवान शत्रूलाही धूळ चारता येते. इतकी वर्षे आपल्या घरादारापासून दूर आपण आलो आहोत ते ट्रॉयचा खातमा करण्यासाठीच. उतावळा विचार केलात, तर मेलात. मगाशी सांगितल्याप्रमाणे काहीजण घोड्याच्या आत बसा, एकजण बाहेर थांबेल अन बाकीचे टेनेडॉस बेटावर जा आणि आमची वाट बघा. घोड्याच्या बाहेरच्याचे काम सर्वांत महत्त्वाचे आहे. काही केल्या त्याने ट्रोजनांना आपला खरा हेतू कळू देता कामा नये.”

यावर सिनॉन नामक एक ग्रीक शिपाई पुढे आला. “हे इथाकानरेश ओडिसिअस, हे काम मी करीन. जरी त्यांनी माझे हालहाल केले, जरी मला आगीत फेकले, तरी मी त्यांना आपले रहस्य कळू देणार नाही.”

सिनॉनच्या या धाडसाची सर्व ग्रीकांनी तोंड भरून प्रशंसा केली. हे काम करायला तयार होणे म्हणजे खरोखर लोकोत्तर धाडसाचेच काम होते.

आता घोड्यात कोणी बसायचे हे ठरणार होते. यवनभीष्म नेस्टॉरने आवाहने केले, “ग्रीकहो, आपल्या पराक्रमाला सिद्ध करण्याची याहून अधिक चांगली संधी ती कुठली असणार? मी अजून तरणा असतो तर मीही बसलो असतो. पण माझं वय झालं, ती ताकद नाही राहिली आता.”

त्यावर अकिलीसच्या मुलाने-निओटॉलेमसने त्याची प्रशंसा केली आणि घोड्यात बसणार्‍यांपैकी पहिला व्हॉलंटिअर आपण असल्याचे जाहीर केले. नेस्टॉर त्याला कौतुकाने म्हणाला, “अगदी बापाचा पोरगा शोभतोस खरा!” मग त्यांत अजून जरा परस्परस्तुती होऊन निओटॉलेमस त्या घोड्यात जाऊन बसला. पाठोपाठ अनेक ग्रीक वीर त्यात जाऊन बसले. क्विंटस स्मिर्नियसप्रमाणे ट्रोजन हॉर्समध्ये शिरलेले ग्रीक खालीलप्रमाणे:

अकिलीसपुत्र निओटॉलेमस,मेनेलॉस, ओडीसिअस, स्थेनेलस, डायोमीड, ग्रीक अश्वत्थामा फिलोक्टॅटेस, मेनेस्थेउस, अँटिक्लस, थोआस, पॉलिपोएतेस, धाकटा अजॅक्स, युरिपिलस, नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेस, क्रीटाधिपती इडोमेनिअस, मेरिओनेस, वैद्यराज अन भालाईत पॉदालिरियस, युरिमॅखस, थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर, इआल्मेनस, थाल्पियस, अँटिमाखस, लेओन्तेउस, युमेलस, युरिआलस, अँफिमाखस, देमोफून, आगापेनॉर, अकॅमस, मेगेस, अन घोडा बनवणारे सुतारभौ बॉक्सर एपियस.

(काही ठिकाणी ३०, काही ठिकाणी ५० तर नंतर स्टँडर्डाईझ्ड लिस्ट मध्ये ४० अशी संख्या दिलेली आहे.)

एपियसलाच ठाऊक होते की घोड्यात ओपनिंग कुठे आहेत आणि कसे खोलता येईल इ.इ. त्यामुळे तो सर्वांत शेवटी चढला आणि त्याने आपल्यामागे घोड्याचा दरवाजा बंद केला.

(मिकोनॉस नामक बेटात सापडलेला हा बुधला. इसपू ६७०.)

मग बाकीचे ग्रीक सैन्य कामाला लागले. लगबगीने आपले तळ गुंडाळले, तंबूंना आगी लावल्या आणि जहाजांत बसून आगामेम्नॉन व नेस्टॉर यांच्या अध्यक्षतेखाली टेनेडॉस बंदरात पोहोचले व ग्रीक सैन्याकडून सिग्नल कधी येतो याची शांतपणे पण अधीरपणे वाट बघत बसले.

ट्रोजन हॉर्स ट्रॉयमध्ये नेला जातो. लाओकून अन कसांड्राचा संशय व अपशकुन.

इकडे ट्रोजनांनी हेलेस्पाँट खाडीजवळ धूर येत असलेला पाहिला. पण काय आश्चर्य! रोज त्यांच्या काळजात धडकी भरवणारी शेकडो ग्रीक जहाजे आज कुठेच दिसत नव्हती. एक मोठ्ठा लाकडी घोडा आणि त्याजवळ एक गरीब भासणारा एक ग्रीक शिपाई तेवढे शिल्लक होते. परम आश्चर्य वाटूनही ते जस्ट इन केस म्हणून सशस्त्रच घोड्याकडे गेले. सिनॉनला पाहताक्षणी ट्रोजनांनी त्याच्याभोवती कडे करून त्याला ग्रीकांबद्दल विचारले. सुरुवातीला सरळपणे विचारले अन नंतर धमक्या देणे सुरू केले तरी त्याचा आपला एकच हेका सुरू. आगीचे चटके दिले, चाबकाचे फटकारे दिले, नाकातून रक्त काढले तरीही तो एकच सांगत राहिला-“ग्रीक सैन्य ट्रॉय सोडून गेलेय अन परतीच्या प्रवासासाठी त्यांनी हे पोसायडन देवाला अर्पण केलेय. हा सगळा ओडीसिअसचा बेत आहे. मलाही बळीच देणार होते पण मी तिथून कसाबसा पळालो अन इथे आलो.”

अखेरीस त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. पण लाओकून नाकम ट्रोजनाला संशय आला होता. “हे फार मोठं फ्रॉड आहे! हरामखोर ग्रीक इतक्या सहजासहजी ट्रॉय सोडून जाऊच शकत नाहीत. हा घोडा लौकरात लौकर जाळून टाका!” असे म्हणत असताना जणू देवीचा कोप व्हावा तसे झाले अन अचानक लाओकून आंधळा झाला. त्याची ती अवस्था बघून ट्रोजनांना त्याची दया आली. सिनॉनलाही त्यांनी ट्रॉयमध्ये आत नेले. लाकडी घोड्याच्या पायांखाली एपियसने लाकडी रोलर्स अगोदरच बसवले होते, त्यामुळे दोरखंड लावून त्याला ट्रॉयमध्ये ओढत नेताना ट्रोजनांना कसलीच अडचण पडली नाही. त्यांनी तो घोडा ट्रॉयमध्ये नेला, फुलांच्या माळांनी तो सजवला. ट्रोजन स्त्रियांनी आनंदाच्या चीत्कारांनी त्याचे शहरात स्वागत केले.

(लाओकून आणि त्याचे दोन मुलगे.)

पण तरीही लाओकून ओरडून सांगतच होता की घोड्याला जाळून टाका म्हणून. त्या घोड्याभोवती जमलेल्या गर्दीत अचानक दोन साप आले आणि त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली.सगळे ट्रोजन्स सैरावैरा पळू लागले आणि फक्त लाओकून व त्याचे दोन मुलगे एवढेच तिथे राहिले. सापांनी दोघा मुलांना दंश करून खाऊन टाकले अन ते आले तसे गुप्त झाले. सर्व ट्रोजन्सना कळायचं बंद झालं. ते घाबरून गट्ट झाले. लाओकून पुरता स्तंभित झाला होता. त्याच्या अश्रूंना खळ नव्हता. मग ट्रोजनांनी त्यांचं थडगं बांधलं आणि लाओकूनसकट सर्व ट्रोजन्स तिथे विलाप करू लागले.

आता इथे असा शोक चालला असताना बाहेर सर्व अपशकुन होत होते, पण आत ट्रोजनांना त्याची गंधवार्ताही नव्हती. त्यांनी जोशात अपोलोला बळी अर्पण करण्याचा सपाटा लावला खरा, पण आज त्यांचं काही खरं नव्हतं. वाईन अर्पण केली तर तिचं रक्त झालं, देवाच्या मूर्तीतून रक्त येऊ लागलं. हे अपशकुन पाहून अर्व ट्रोजन विलाप करू लागले. आकाशात ढग नसतानाही तार्‍यांभोवती आवरण तयार झाले. कोल्हे व लांडगे ट्रॉयच्या दरवाजांजवळ येऊन रडू लागले. वातावरण मोठं भेसूर झालं होतं.

पण प्रिआमची मुलगी कसांड्रा बधली नाही. तिने सर्व ट्रोजनांना शिव्या घातल्या, “मूर्खांनो, तुम्हांला इतकीही अक्कल कशी काय नाही? तो ग्रीक घोडा आत गावात आणल्यामुळेच एवढे सगळे अपशकुन होताहेत हे तुम्हांला कळत कसं नाही? तुम्हीस अर्वजण फुकट मरणार.”

हे ऐकून एक ट्रोजन तिला म्हणाला, “आली मोठी शहाणपणा सांगणारी. तुला काय कळतं गं याच्यातलं? तो लाओकूनही असाच ओरडत होता, त्याचं काय झालं पाहिलंस ना?” त्यापाठोपाठ अनेक ट्रोजनांनी शिव्या घालून तिला गप्प केले. घोड्यात बसलेल्या ग्रीकांना आनंद झाला, पण त्याचबरोबर कसांड्राला आपला बेत कसा कळाला याचे आश्चर्यही वाटले.

आपले कोणीच ऐकत नाही हे पाहून कसांड्रा तिथून पळत सुटली आणि अथीनाच्या देवळात जाऊन बसली.

ट्रॉयचा विनाश.

ग्रीक सैन्य अखेर ट्रॉयपर्यंत पोचते आणि गाफील ट्रोजनांच्या कत्तलीचा सपाटा सुरू होतो.

लाओकून आणि कसांड्रा यांच्या सुचवणीनंतरही ट्रोजन्स त्यांच्याकडे लक्ष न देता नाचगाणे-मेजवानीत दंग होऊन गेले. “मूर्ख ग्रीक अखेर एकदाचे पळाले!” म्हणत वाईनचे अँफोरेच्या अँफोरे रिचवले जाऊ लागले. अख्खे ट्रॉय शहर फुल झिंगून झोपले.

तेव्हा सिनॉनने ट्रॉयच्या तटबंदीवर जाऊन मशाल पेटवून टेनेडॉस बेटात बसलेल्या ग्रीकांना संदेश दिला. ग्रीक सैन्य लगबगीने जहाजे वल्हवू लागले. सिनॉनने हळूच मग ट्रोजन हॉर्स ऊर्फ लाकडी घोड्यात बसलेल्या ग्रीक सेनापतींना हाका मारल्या. पहिल्यांदा घोड्याच्या फासळ्यांतून ओडीसिअस बाहेर आला. त्याबरोबर लढाईस आतुर असलेले बाकीचे लोकही उतरले आणि लगबगीने दरवाजांकडे गेले. झोपा काढत असलेल्या द्वारपालांना ठार मारले आणि तिथले मोर्चे सांभाळले.

काही वेळाने ग्रीक सैन्यही टेनेडॉस बेटाकडून ट्रॉयच्या किनारी लागले. हळूहळू जहाजांमधून बाहेर येत गुपचूप ट्रॉयपर्यंत पोचले. ट्रोजन हॉर्समधील लोकांनी अगोदरच ट्रॉयमध्ये पेटवापेटवी सुरू केलेली होती, त्यात परत यांनीही दंगा सुरू केला. हजारोंच्या संख्येने ट्रोजन्स मरू लागले. त्यांच्या प्रेतांचा जमिनीवर खच पडला होता. कुणाचे डोकेच धडावेगळे केले होते, तर कुणाची आतडी बाहेर आलेली होती. स्त्रीपुरुष, म्हातारेकोतारे, लहाण बाळे- कुणाचीही त्या विनाशातून सुटका नव्हती. त्यांच्या करुण किंकाळ्यांनी ट्रॉय दुमदुमले. इकडे ट्रोजनांनीही तोपर्यंत काही ग्रीकांना ठार मारलेले होते. पण प्रत्येक ग्रीकाने रात्रीच्या अंधारात नीट दिसावे म्हणून हातात मशाल घेतलेली असल्याने ट्रॉयभर नुसते आगीचे साम्राज्य होते.

त्या हल्ल्यात डायोमीडने कोरोएबस, युरिडॅमस, इलिओनेउस आणि युरिकून या चारांना ठार मारले. धाकट्या अजॅक्सने अँफिमेदॉनला मारले, तर आगामेम्नॉनने दामास्तर नामक ट्रोजनाच्या पुत्रास हेदिससदनी पाठविले. क्रीटाधिपती इडोमेनियसने मिमास याला तर मेगेसने देइओपितेस या ट्रोजनाला ठार मारले.

ट्रॉयनरेश प्रिआमचा अंत.

अकिलीसपुत्र निओटॉलेमसने पॅम्मॉन, पॉलितेस व अँटिफोनस या प्रिआमपुत्रांना ठार मारले. आगेनॉर नामक ट्रोजन योद्ध्यासही मारले. अखेरीस तो ट्रॉयचा वृद्ध राजा प्रिआमसमोर आला. प्रिआमने त्याला बघताक्षणी ओळखले अन म्हणाला,”हे अकिलीसपुत्रा, मला ठार मार अन या जगण्यातून माझी मुक्तता कर. माझ्या डोळ्यांदेखत माझे मुलगे मेले, माझे राज्यही गेले. आता जगायची मला आजिबात इच्छा नाही. उगीच दया वगैरे दाखवू नकोस.”

हे ऐकून निओटॉलेमसने तलवारीच्या एका फटक्यात प्रिआमचे डोके धडावेगळे केले. ते गडगडत जाऊन दुसरीकडे पडले. त्याचे ओठ अजूनही हलत होते. प्रिआमचे धड तसेच अन्य ट्रोजनांच्या गर्दीत जाऊन पडले. तलवारीच्या एका घावानिशी ट्रॉयसारख्या महाशक्तिशाली नगरीचा राजा प्रिआम झ्यूसला प्यारा झाला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

हेक्टरपत्नी अन हेक्टरपुत्राची दयनीय दशा.

हेक्टरपत्नी अँद्रोमाखी अन हेक्टरपुत्र अ‍ॅस्टियनिक्स हे दोघेही दिसताच निओटॉलेमसने अ‍ॅस्टियनिक्सला खसकन आईपासून ओढून वेगळे काढले. तो अजून लहान बाळ होता, धड रांगतही नव्हता. त्याला निओटॉलेमसने ट्रॉयच्या तटावरून खाली फेकले. पुढे तो मोठा झाला तर बापाचा बदला घेण्याचा नक्की प्रयत्न करेल, ती ब्याद नको म्हणून आत्ताच उचललेले हे पाऊल! धड सूर्यही न पाहिलेली अशी शेकडो बाळे तेव्हा मारली गेली. अ‍ॅस्टियनिक्सचा मृत्यू आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर अँद्रोमाखी अतीव दु:खाने शोक करू लागली. नवरा मेला, आता मुलगाही मेल्यावर तिची अवस्था निव्वळ दयनीय झाली होती. पण तिला विचारतो कोण? तत्कालीन रिवाजाप्रमाणे निओटॉलेमसला ती बहाल करण्यात आली.

असा विध्वंस चाललेला असताना अँटेनॉर नामक ट्रोजन योद्ध्याच्या महालाजवळ ग्रीक सैन्य आले. त्याला मात्र ग्रीकांनी जिवंत सोडले, कारण पूर्वी मेनेलॉस अन ओडीसिअसची योग्य खातिरदारी त्यानेच केलेली होती. एनिअस हा ट्रोजनही आपल्या वृद्ध बापाला खांद्यावर घेऊन, तसेच छोट्या मुलाचा हात धरून जिवाच्या कराराने तिथून निसटला.

हेलेन मेनेलॉसला परत मिळते.

हेलेनच्या महालाजवळ मेनेलॉस गेला असता त्याला हेलेनचा नवा पती डेइफोबस दिसला. त्याला खच्चून शिव्या घालून त्याने भाल्याने ठार मारले. नंतर त्याला हेलेन दिसली. इतक्या वर्षांनी तिला पाहताना मेनेलॉसची प्रथम प्रतिक्रिया तिला ठार मारावे अशीच होती. साहजिकच आहे म्हणा, गेली दहा वर्षे इतकी उरस्फोड करावी लागली ते कारण समोर दिसल्यावर तसे वाटणारच. पण तिचे सौंदर्य पाहून गडी पाघळला. त्यात परत आगामेम्नॉननेही त्याची समजूत काढली,”नको मारूस तिला. लग्नाच्या बायकोला मारणे बरोबर नाही. दोष तिचा नव्हता, तर त्या पापी पॅरिसचा होता. तो विव्हळत मेलाय तेव्हा राग आवर.”

कसांड्रावर धाकटा अजॅक्स बलात्कार करतो.

(पाँपेई येथील चित्र, इ.स. पहिले शतक)

इकडे ट्रॉयचा असा विनाश चाललेला असताना प्रिआमची मुलगी कसांड्रा अथीना देवीच्या देवळात आर्ततेने प्रार्थना करीत बसली होती.तिला बघून कामज्वराने पागल झालेल्या धाकट्या अजॅक्सने तिच्यावर देवळातच बलात्कार केला. ग्रीक त्यावर लै चिडले, पण अथीनाच्या मूर्तीची कसम वैग्रे दिल्याने शांत झाले, नैतर तो तिथल्या तिथेच मेला असता. हा प्रसंग ट्रोजन युद्धाच्या अतिशय प्रसिद्ध आख्यानांपैकी एक आहे.

ग्रीकांनी कैक ट्रोजन स्त्रिया स्वतःसाठी गुलाम म्हणून ठेवून घेतल्या. असले जिणे नको म्हणून कैकांनी आपल्या बायकापोरांना स्वतः ठार मारून मग आत्महत्या केली. अनेक स्त्रिया भयाने इतस्ततः पळत सुटल्या होत्या, त्यांना घरीच राहिलेल्या बाळांची आठवण आली तेव्हा घरे जळू लागली होती. बाळांबरोबर मग त्याही अग्निसात झाल्या. आगीत जळालेल्या आपल्या बायकापोरांची नावे आळवत कैक ट्रोजन पुरुष इकडे तिकडे फिरू लागले. कैक जण भाजून तसेच मरण पावले.

प्रिआमची मुलगी लाओदिकी हिने गुलामीचे जिणे जगण्यापेक्षा भूमी दुभंग होवो अशी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेला यश येऊन भूमीने तिला आपल्यात सामावून घेतले.

आणि अशाप्रकारे एकेकाळी अख्ख्या जगात सर्वशक्तिमान असलेले ट्रॉय नगर दहा वर्षांच्या वेढ्यानंतर भस्मसात अन बेचिराख झाले.

(क्रमशः)

Posted in ग्रीस | 7 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस(Neoptolemus) याचे आगमन व त्याकडुन ट्यूथ्रॅनियन युरिपिलस(Eurypylus) याचा वध, प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेस(Philoctates) चे पुनरागमन व त्याकडून पॅरिसचा वध.

अंमळ स्पष्टीकरण

मागील भागात आपण पाहिले की थोरल्या अजॅक्सने आत्महत्या केली. यापुढील कथाभाग क्विंटस स्मिर्नियस आणि एपिक सायकल व अन्य सोर्सेस यांमध्ये अंमळ वेगळा आहे. म्हणजे साधारणपणे पाहता घटना त्याच आहेत, पण त्यांचा क्रम बदललेला आहे आणि काही घटनांचे कर्तेही बदललेले आहेत. लिटल इलियड नामक काव्य हा कथाभाग कव्हर करते, पण आता ते लुप्त झालेले असून त्याचा फक्त सारांश तेवढाच उपलब्ध आहे. क्विंटस स्मिर्नियसच्या पोस्टहोमेरिकामधील कथाभाग अंमळ वेगळा असला, एपिक सायकलमधील काही भाग अज्जीच वगळला असला, तरी त्याने पुरेशा डीटेलमध्ये कथा दिलेली आहे. सबब मी दोन्ही स्रोत एकत्र करून कथा सांगणार आहे. शक्यतोवर अंतर्विरोध राहणार नाही याची काळजी घेऊन, दोन्ही स्रोत एकमेकांना पूरक ठरतील असे पाहण्याची काळजी घेतली जाईलच. सो सिट बॅक अँड एंजॉय!

अकिलीसपुत्र निओटॉलेमसला आणण्याची कामगिरी.

मेनेलॉसने ग्रीकांची एक महासभा भरवली आणि म्हणाला, “ग्रीकहो, आता अकिलीस आणि अजॅक्स मेल्यावर मला लढण्यात काही अर्थ वाटत नाहीये. गप जहाजे बाहेर काढू आणि आपापल्या घरी जाऊ. माझ्यामुळे तुम्हांला खूप त्रास भोगावा लागतोय याची मला कल्पना आहे. ती निलाजरी हेलेन आणि तिचा तो टिनपाट यार दोघेही मरेनात का! मला तिची पर्वा नाही, पण तुमची काळजी आहे. चला आपण परत निघू!”

असे तो म्हणाला खरा, पण ते फक्त ग्रीकांना चेतवण्यासाठीच होते. आतून मात्र ट्रॉयचे बुरुज जमीनदोस्त करावेत आणि त्या पॅरिसला ठार मारावे या इच्छेनं त्याचं रक्त उसळत होतं. मग डायोमीड उसळून म्हणाला, “भित्र्या मेनेलॉस, तू आम्हांला काय लहान बाळ समजलास की बाई? शूर आम्ही सरदार आम्हांला, काय कुणाची भीती? जर कोणी मेनेलॉसच्या सांगण्यावरून परत निघाला तर झ्यूसशपथ सांगतो मी त्याचं डोकं उडवून धड कुत्र्यांना व घारींना खायला घालीन. चला, चिलखत चढवा अंगात आणि शस्त्रे घेऊन चला युद्धात. तिथेच कळेल कोण किती श्रेष्ठ ते.”

असे म्हणून डायोमीड खाली बसला. त्यानंतर ग्रीकांचा राजपुरोहित काल्खस म्हणाला, “ग्रीकहो, मी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे आपण दहाव्या वर्षात ट्रॉय ताब्यात घेणार. तशी लक्षणे दिसू लागली आहेत. ग्रीकांना विजय मिळेलच. त्यामुळे ओडीसिअस आणि डायोमीड या दोघांना स्कीरोस बेटावर पाठवू. तिथे अकिलीसचा मुलगा निओटॉलेमस आहे, त्याला लढायला आणले तर तो आपल्याला नक्की विजय मिळवून देईल.”

आता अकिलीसचा मुलगा मध्येच कुठून आला? या लेखमालेच्या अगदी पहिल्या भाग १ मध्ये याचे त्रोटक स्पष्टीकरण दिले आहे. तर अकिलीसला त्याची आई थेटिसने स्कीरॉस नामक बेटात युद्धापासून लपवून ठेवले होते. तिथल्या राजाची राजकन्या देइदेमिया हिच्यापासून अकिलीसला एक मुलगा झाला होता- तोच हा निओटॉलेमस.

मग ओडीसिअस आणि मेनेलॉसने याला संमती दर्शवल्यावर ओडीसिअस आणि डायोमीड हे दोघे एक जहाज घेऊन निघाले. ते दोघे सोडून २० कुशल नावाडी बरोबर घेतले होते. ते स्कीरोस बेटाकडे निघून गेल्यावर बाकीचे ग्रीक तयार झाले. सकाळची न्याहारी केली आणि चिलखत अंगावर चढवून निघाले.

ट्यूथ्रॅनियन युरिपिलसचे ट्रोजनांच्या बाजूने आगमन व पराक्रम, ग्रीकांची गाळण उडते.

इकडे ट्रोजनांच्या मदतीला युरिपिलस आणि त्याची मोठी सेना आली. युरिपिलसला सर्व ट्रोजन आश्चर्याने पाहत होते. पॅरिसने त्याचे स्वागत केले. भेटी एक्स्चेंज केल्या आणि मेजवानी देण्यात आली. युरिपिलसच्या सैन्याने बाहेर तंबू ठोकून तळ मांडला होता. त्यांच्या त्या कँपफायर्स पाहून ग्रीकांना अंमळ आश्चर्य वाटले. तशातच रात्र झाली. ट्रोजन सैनिक आता जहाजे पेटवून देतात की काय अशा भीतीने ग्रीकांनी आळीपाळीने गस्त घालावी असे ठरले.

दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडताच युरिपिलस आन्हिके उरकून चिलखत परिधान करून बाहेर निघाला. अकिलीसच्या ढालीचे वर्णन करण्यात होमरने जसे अर्धेअधिक बुक खर्ची घातले आहे, तसेच इथेही युरिपिलसच्या ढालीचे वर्णन करताना क्विंटस स्मिर्नियस शंभरेक ओळी सहज खर्च करतो.

मग युरिपिलस पॅरिसला भेटला. पॅरिसने त्याची तोंडभरून स्तुती केली. युरिपिलसही “कसचं कसचं! ये तो मेरा फर्ज है!” वगैरे म्हणाला. त्यानंतर त्याने युद्धासाठी निवडक ट्रोजन वीर निवडले- पॅरिस, एनिअस, पॉलिडॅमस, पाम्मॉन, डेइफोबस, एइथिकस. त्यांमागोमाग बाकीची ट्रोजन सेना ट्रॉयच्या दरवाजांतून वेगाने बाहेर पडू लागली.

इकडे आगामेम्नॉनभोवती ग्रीक सैन्यही गोळा झाले. दोन्ही सैन्यांची गाठ लगेच पडली आणि युद्धाला तोंड लागले. ढालीवर ढाली, चिलखतांवर चिलखते आपटून धातूचा टण्ण खण्ण आवाज जिकडे तिकडे होऊ लागला. तलवारी, भाले शत्रूच्या कमजोरीचा वेध घेऊन तत्परतेने मुडदे पाडू लागले. पहिल्यांदा ग्रीक सैन्याने ट्रोजन सैन्याला मागे रेटले-पण जरासेच. पण मग युरिपिलस फॉर्मात आला. एखादे चक्रीवादळ घोंगावावे तसा तो ग्रीकांवर तुटून पडला. निरेउस नामक एका अतिशय देखण्या ग्रीक योद्ध्याला त्याने बरगडीखाली भाला खुपसून ठार मारले आणि वल्गना केली, “मर आता! इतक्या सौंदर्याचा काय घंटा उपयोग झाला तुला? ताकदीपुढं सौंदर्याचा काय पाड लागणार?”

निरेउस मेल्याचे पाहून एस्कुलापियस या ग्रीक धन्वंतरीचा मुलगा आणि वैद्यराज मॅखॉन त्याच्यावर चालून आला. युरिपिलसच्या उजव्या खांद्यात भाला खुपसून त्याने रक्त काढले! पण युरिपिलस एकदम त्यावर चालून आला आणि त्याने मॅखॉनच्या उजव्या मांडीत भाला खुपसला. हा वार खरेतर जोराचा आणि खोल होता-पण मॅखॉन जरासुद्धा न डगमगता त्यातून सावरला आणि त्याने जवळच पडलेला एक भलामोठा धोंडा उचलला व तो युरिपिलसच्या डोक्यावर दाण्णकन आदळला. युरिपिलस मरायचाच, पण मजबूत हेल्मेटमुळे वाचला नैतर कै खरं नव्हतं त्याचं. मग त्याने मॅखॉनच्या फासळ्यांचा सांगाडा आणि बेंबी यांच्या बरोबर मध्यभागी भाला खुपसून त्याला कोसळवले आणि वल्गना करू लागला.

मरता मरता मॅखॉन उत्तरला, “जास्ती बडबड करू नकोस. तूही काही दिवसांचाच सोबती आहेस.”

त्यावर युरिपिलस अजूनच चिडून म्हणाला, “प्रत्येकजण कधीतरी मरणारच आहे. ते तू कशाला सांगायला पाहिजे वेगळं? तू तरी मेलास.” असे म्हणून त्याने प्रेतात पुन्हा एकदा भाला खुपसला.

मॅखॉन मेल्याचे पाहून थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ धनुर्धारी ट्यूसर ओरडला, “ग्रीकांनो, आपला डॉक्टर मॅखॉन मेला रे!! निरेउस आणि मॅखॉनच्या प्रेतांची विटंबना हे ग्रीक करू पाहतील त्याआधी आपण त्यांना वाचवू चला. जिंकू किंवा मरू!!”

त्यासरशी त्या दोघांच्या प्रेतांजवळ ग्रीक सैन्य आले. ते नसते आले तर त्या दोघांचेही चिलखत ट्रोजनांनी लांबवलेच असते. मॅखॉनचा भाऊ पॉदालिरियस आता पेटला होता. भावाच्या मरणाचा राग ट्रोजनांवर काढत त्याने क्लीटस आणि लास्सस य दोघा ट्रोजनांना भाला फेकून ठार मारले. निरेउस आणि मॅखॉनच्या प्रेतांभोवती तुंबळ युद्ध चालले होते. अखेरीस ग्रीकांनी त्यांची प्रेते ट्रोजनांपासून वाचवली आणि जहाजांपाशी नेऊन गेले. पण असे करताना बरेच ग्रीक मृत्युमुखी पडले आणि युरिपिलसच्या शौर्याला घाबरून बरेचजण जहाजांकडे पळूनही गेले.

इकडे आगामेम्नॉन, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सही फुल त्वेषाने लढत होते. धाकट्या अजॅक्सने पॉलिडॅमस नामक हेक्टरच्या भावाच्या छातीत भाला खुपसल्यावर तो मागे हटला. मेनेलॉसनेही डेइफोबसच्या छातीत भाला खुपसल्यावर तो मागे सरला. स्वत: आगामेम्नॉननेही भाल्याने लै लोक मारले. तो भाल्याचा चँपियन होता हे स्वतः अकिलीसने कबूल केल्याचे इलियडच्या २३व्या बुकात नमूद आहे. आगामेम्नॉन एइथिकस नामक ट्रोजनावर चालून गेला, पण एइथिकस मागे पळून गेला.

आता जहाजांपाशी पळून गेलेल्या ग्रीकांचा पाठलाग सोडून युरिपिलसने आपला मोर्चा आगामेम्नॉन, मेनेलॉस आणि धाकट्या अजॅक्सकडे वळवला. त्याच्या सोबतीला एनिअस आणि पॅरिस तसेच अजूनही बरेच सैन्य होते. एनिअसने एक धोंडा उचलून धाकट्या अजॅक्सच्या हेल्मेटवर फेकला. अजॅक्स कोसळला. यद्यपि मेला नसला तरी त्याला काही सुधरेना. मग त्याच्या सहकार्‍यांनी त्याला मागे नेले. आता मात्र आगामेम्नॉन आणि मेनेलॉसच्या भोवती ट्रोजन सेनेचा गराडा पडला होता. कोणी त्यांच्यावर धोंडे फेकत होते, तर कोणी भाल्यांचा वर्षाव करत होते तर कुणी बाणांचा. दोघे भाऊही अगदी जोशात त्याला प्रत्युत्तर देत होते. त्यांनी बरेच ट्रोजन मारले खरे पण ट्रोजनांच्या संख्याबळापुढे त्यांचा टिकाव लागेना. ट्रोजनांनी त्यांना पेचून मारलेच असते पण तेवढ्यात त्यांच्या मदतीला ट्यूसर, इडोमेनिअस, थोआस, मेरिओनेस आणि नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेस हे सगळे सेना घेऊन आले. हे सर्व अगोदर युरिपिलसला भिऊन जहाजांपाशी गेले होते, पण स्वतः आगामेम्नॉन आणि मेनेलॉस खोपचीत सापडलेत म्हटल्यावर त्यांना जाणे भाग होते. त्या सर्वांनी मग प्राणपणाने युद्ध आरंभले.

ट्यूसरने भाल्याने एनिअसची ढाल भेदली पण एनिअसला कवचामुळे काही नाही झाले तरी तो घाबरून थोडा मागे सरकला. मेरिओनेस या ग्रीक योद्ध्याने लाओफून नामक ट्रोजन योद्ध्याच्या बेंबीखाली ओटीपोटात भाला खुपसून त्याला लोळवले. धाकट्या अजॅक्सचा मित्र अल्किमेदेस याने शिव्या घालून एक धोंडा वेगाने ट्रोजनांमध्ये फेकला. ते पाहून ट्रोजन घाबरले. तो धोंडा लागला पाम्मॉन नामक ट्रोजन सेनापतीच्या सारथ्याला-एकदम भुवईवर-आणि तो जागीच गतप्राण झाला. पाम्मॉनला कळायचं बंद झालं, पण तेवढ्यात एका ट्रोजनाना शिताफीने त्याचे सारथ्य सांभाळले म्हणून तो वाचला.

इकडे नेस्टॉरपुत्र थ्रासीमिदेसने अकॅमस नामक ट्रोजनाच्या गुडघ्यावरच भाला फेकून मारला. असह्य वेदनेने कळवळत अकॅमस मागे हटला. युरिपिलसच्या एका योद्ध्याने एखेम्मॉन नामक ग्रीकाच्या खांद्याखाली भाल्याने खोलवर जखम केली. अतीव वेदनेने कळवळत एखेम्मॉन तिथून पळू लागला. पण युरिपिलसने त्याचा पाठलाग करून त्याची टाच पूर्ण सोलूनच काढली. तो बिचारा जागीच कोसळला आणि खलास झाला. थोआस नामक ग्रीकाने पॅरिसच्या उजव्या मांडीत भाला खुपसला. तो अजून एखादा घाव वर्मी मारणार इतक्यात पॅरिस तिथून पळाला. नंतर इडोमेनिअसने युरिपिलसच्या हातावर नेम धरून एक मोठा धोंडा फेकला. तो त्याला लागला आणि त्याच्या हातातून भाला खाली पडला. ग्रीकांना तेवढीच जरा क्षणभराची उसंत मिळाली. पण तेवढ्यात युरिपिलसच्या योद्ध्यांनी त्याला अजून एक भाला आणून दिला. नव्या जोमाने युरिपिलस ग्रीकांची चटणी उडवू लागला.

आता मात्र कुणाचाच धीर राहीना. युरिपिलस ओरडू लागला, “ट्रोजनहो, ग्रीक बघा कसे घाबरलेल्या शेळ्यामेंढ्यांगत जहाजांकडे भीतीने पळताहेत! चला त्यांचं पूर्ण नामोनिशाणच मिटवूया!” असे म्हणून त्याने बुकॉलिऑन आणि नेसस या मायसीनीत राहणार्‍या कमांडरांना, तर क्रोमिऑन आणि अँटिफस या स्पार्टन कमांडरांना लोळवले. हे सोडूनही त्याने अगणित लोकांना हेदिससदनी धाडले. त्याला भिऊन ग्रीक सैरावैरा जहाजांकडे पळत होते. सगळीकडे नुस्ता सावळागोंधळ चालला होता. सोबतच एनिअसने अँटिमाखस आणि फेरेस या क्रीटन योद्ध्यांना मारले तर आगेनॉर या ट्रोजनाने मोलस नामक ग्रीकाला उजव्या पायातून आरपार जाणारा बाण मारला. त्याचा लिगामेंट टिश्श्यू पूर्ण भेदला गेला आणि हाडांना इजा झाली. अतिशय वेदनादायी असा मृत्यू त्याच्या नशिबी आला. पॅरिसनेही बाण सोडून फोर्किस, मोसिनस आणि क्लेओलॉस या ग्रीकांना ठार मारले. क्लेओलॉसच्या डाव्या छातीत बाण घुसला. सोबतच त्याने एतिऑन नामक ग्रीकाच्या जबड्यातून आरपार बाण मारून रक्त काढून त्याला ठार मारले.

ट्रोजनांनी ग्रीकांना कोंडीत पकडले होते आणि तेव्हाच त्यांनी त्यांची जहाजे पेटवून दिली असती पण तेवढ्यात धुके पडल्याने त्यांना काही दिसेना. मग ग्रीक छावणीपासून थोड्याच अंतरावर युरिपिलस आपल्या सैन्यासह थांबला. ट्रोजनांचे मनोबळ प्रचंड वाढले होते, पण तेव्हा ग्रीक छावणीत मात्र सुतकी वातावरण होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी ग्रीकांनी निरेउस आणि वैद्यराज मॅखॉनचे अंत्यविधी उरकले. मॅखॉनचा भाऊ पॉदालिरियस भावाच्या थडग्यापाशी विलाप करत होता. लोकांनी नानापरीचं सांगून पाहिलं पण ऐकेना. यवनांचा भीष्म पितामह नेस्टॉरने त्याची समजूत काढली पण त्याचा शोक कै थांबेना. शेवटी नेस्टॉरने शोलेमधला तो हुकमी डायलॉग मारला-“एक बाप के कंधे पे सबसे बडा बोझ होता है अपने बेटे के जनाजे का. अगर मै वो ढो सकता हूँ तो तुम्हें परेशानी किस बात की?मरायचं तर सर्वांनाच आहे आणि दु:खं पण सर्वांनाच भोगायची आहेत, पण सावर स्वतःला. तुझा भाऊ नक्कीच स्वर्गात पितरांसोबत असेल याची खात्री बाळग.”

हे ऐकून पॉदालिरियसची समजूत कशीबशी पटली आणि त्याचे मित्र त्याला त्याच्या शामियान्यात घेऊन गेले.

इकडे युद्धाला तोंड फुटले होते. ट्रोजन बाजूने लढणारा योद्धा युरिपिलस आज ग्रीकांवर एकदम बळजोर झाला होता. ग्रीकांना मारमारून त्याचे हात रक्तबंबाळ झाले होते. त्याने ग्रीकांना रेमटवत पार जहाजांपर्यंत नेले होते. ग्रीकांनी जहाजांभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचा आसरा घेतला. भिंतीआडून ग्रीक तर भिं चढायचा प्रयत्न करणारे ट्रोजन्स आणि युरिपिलसचे योद्धे यांच्यात भाले, बाण, दगडधोंडे यांची फुल फेकाफेकी सुरू होती. रात्रभर लढाई सुरू होती, पण पुढचे दोन दिवस लढाई थांबली, कारण ग्रीकांनी ट्रोजनांकडे एक दूत पाठवला आणि मेलेल्या योद्ध्यांचे दहन करण्यासाठी म्हणून दोन दिवसांचा टँप्लीज मागितला. मग ट्रोजनांनीही तेवढ्यात आपल्या मृत योद्ध्यांचे दहन केले. सर्व लोकांना एकाच मोठ्या चितेत दहन केल्यावर एकाच कॉमन थडग्यात सर्वांच्या अस्थी दफन केल्या. हे सर्व होत असताना युरिपिलस मात्र आपल्या सैन्यासह ग्रीक जहाजांजवळच तळ ठोकून होता.

निओटॉलेमस व ओडीसिअस आणि डायोमीडचे जाबसाल, निओटॉलेमसचे ग्रीक सैन्यात आगमन.

इकडे हे चालू असताना स्कीरोस बेटात अकिलीसच्या मुलाला-निओटॉलेमसला आणावयास गेलेले जहाज पोहोचले. डायोमीड आणि ओडीसिअस राजवाड्यात पोचतात न पोचतात तोच त्यांना लढाईचा सराव करणारा निओटॉलेमस दिसला. वेगाने रथाचे घोडे हाकून भालाफेक आणि धनुर्विद्येचा सराव करणार्‍या त्याला पाहून ओडीसिअस आणि डायोमीड दोघेही एकदम आनंदले. निओटॉलेमस दिसायला अन चपळतेत एकदम अकिलीससारखा होता. त्यांना क्षणभर अकिलीसचाच भास झाला.

मग हाय हॅलो झाल्यावर निओटॉलेमसने तुम्ही कोण, अशी पृच्छा केली. मग ओडीसिअस म्हणाला, “मी इथाकाचा ओडीसिअस आणि हा आर्गॉसचा डायोमीड. तुझा बाप अकिलीस आमचा मित्र होता. आम्ही आत्ता ट्रॉयशी युद्ध करतोय, तरी आमची मदत कर. कळायचं बंद झालंय.जर तू आमची मदत केलीस, तर मला मिळालेली अकिलीसची सर्व शस्त्रास्त्रे मी तुला देईन. मेनेलोसही त्याची मुलगी तुला देईल आणि अनेक प्रकारचा खजिना तुला दिला जाईल.”

हे ऐकून निओटॉलेमस खूष झाला आणि त्याने त्या दोघांनाही राजवाड्यात नेले. तिथे अकिलीसची राणी देइदेमिया बसली होती. नवरा मेल्यामुळे ती शोकातच होती. निओटॉलेमसने तिला दोघांची ओळख करून दिली. त्याबरोबर तिला लक्षात आले की सुरुवातीला दहा वर्षांपूर्वी अकिलीसला बाजूस नेणारे हेच ते दोघे. ती अजूनच दु:ख करू लागली.

यथावकाश दोघांनाही मेजवानी देण्यात आली. जेवण करून ते दोघेही झोपले, पण देइदेमियाला झोप येईना. नवरा मेला, त्यात परत मुलाला नेण्यासाठी हे येताहेत म्हटल्यावर साहजिकच तिला अजूनच दु:ख झाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी निओटॉलेमसची जायची वेळ आली तेव्हा मात्र देइदेमियाला राहवेना. निओटॉलेमसला घट्ट मिठी मारून ती विलाप करू लागली, “पोरा, इतका कोवळा तू, युद्धात कसा काय जाशील? तुझा बाप स्वतः एका देवीचा मुलगा होता, तरी तो मेला. तू कसा काय वाचशील? आईला उगीच दु:खात नको लोटू, इथेच रहा कसा!”

यावर निओटॉलेमस म्हणाला, “आई, शोक आवर. नशीब कुणालाच चुकलेलं नाही. माझ्या नशिबात जर युद्धात मरण लिहिलं असेल, तर मी मोठा पराक्रम गाजवल्याशिवाय मरणार नाही.”

तोवर तिथे देइदेमियाचा बाप, निओटॉलेमसचा सासरा आणि स्कीरोस बेटाचा राजा लायकोमेदेस आला. “तुझ्या बापासारखाच तू बलवान आहेस यात संशय नाही. पण लढाई फार घनघोर होणारे, तेव्हा काळजी घे. जहाजातून ट्रॉयला चाललायस, पण आकाशात सप्तर्षी, ध्रुव, इ. तार्‍यांचे स्थान कायम लक्षात ठेवत जा. खडकाला आपटून जहाज कधी फुटेल ते सांगता येत नाही, तेव्हा हे लक्षात ठेव. मृग नक्षत्र, व्याध तारा, इ. तारेही कुठे असतात आणि त्यांच्यावरून दिशा कशी ओळखायची ते कायम डोक्यात ठेव.”

असा उपदेश करून त्याने नातवाचे एक चुंबन घेऊन त्याला निरोप दिला. लढाईत जाण्यासाठी निओटॉलेमस एखादा घोडा फुरफुरावा तसा फुरफुरत होता. त्याचा आवेश पाहून देइदेमियाला आपल्या पोराचा अभिमान वाटला. वारंवार चुंबन घेऊन तिने अखेरीस त्याला निरोप दिला. तो गेल्यावर ती त्याच्या कॉटवर पडून विलाप करू लागली. त्याची लहानपणची खेळणी, त्याने मारलेला अन चुकून राजवाड्यात पडलेला एक बाण, तो लहानपणी खेळताना ज्या खांबाला रेलून उभा राहिला तो खांब, अशा कुठल्याही गोष्टींना उराशी कवळून आपल्या पोराच्या आठवणीने देइदेमिया विलाप करू लागली. पोरगा कुणाच्या घरी मेजवानीला गेला तरी आईला कसनुसे होते, इथे तर तो युद्धालाच गेला होता. मग टेन्शन न आले तरच नवल.

इकडे जहाजावर निओटॉलेमस इकडेतिकडे पहात होता. देइदेमियाने त्याच्याबरोबर आपले एकदम विश्वासू असे वीस लोक दिले होते. त्याला पाहून समुद्रात आजी थेटिसनेही मनोमन आनंद व्यक्त केला.

हळूहळू रात्र झाली आणि समुद्र खवळला. पण सुकाणूवरचा नावाड्याचा हात एकदम पक्का होता. त्याने त्यातून कौशल्याने जहाज रेमटवले. यथावकाश पहाट अन मग सकाळ झाली. ट्रॉयजवळचा किनारा दिसू लागला होता. टेनेडॉस नामक बेट दिसले, अन ट्रॉयसमोरचे मैदानही दिसू लागले. मैदानावर कैक लोकांची थडगी दिसत होती. ट्रोजन योद्धा प्रोटेसिलिआस तसेच अकिलीसचे थडगेही दृष्टिक्षेपात आले. पण ओडीसिअसने ते निओटॉलेमसला दाखवले नाही, कारण बापाचे थडगे पाहून पोरगा जरा हतवीर्य होईल अशी त्याला भीती वाटली.

अखेरीस ते ग्रीकांच्या जहाजांपाशी आले. जहाजांभोवतीची तटबंदी दिसू लागली. तटबंदीभोवती युरिपिलस आणि त्याचे साथीदार बाण व भाले मारमारून ग्रीकांचा कोथळा बाहेर काढत होते ते दिसल्याबरोबर डायोमीड म्हणाला, “चला लौकर. फुल बोंबाबोंब सुरू आहे. चिलखत वैग्रे चढवा अन चला लढायला. आत्ता वेळ गमवाल तर उद्या जीव गमवाल अन सगळ्यांची थडगी इथेच बांधावी लागतील. चला!!!”

निओटॉलेमसचा पराक्रम, ग्रीकांचे मनोबल वाढते.

भराभरा ते सर्वजण जहाजातून खाली उतरले आणि तडक ओडीसिअसच्या शामियान्यात गेले. तिथे बरीच चिलखते ठेवलेली होती, त्यांतच एक अकिलीसचे चिलखतही होते. ओडीसिअसने ते निओटॉलेमसला दिले. निओटॉलेमसने ते घातले आणि काय आश्चर्य!! बापाचे चिलखत त्याला एकदम फिट्ट बसत होते. हेफायस्टस देवाची करामत शेवटी. विश्वकर्माच होता तो, त्याला अशक्य काय असणार म्हणा.

अकिलीसचे चिलखत घालून अन शस्त्रे घेऊन निओटॉलेमस उभा राहिला तेव्हा सर्व ग्रीकांना एकदम अकिलीसच पुन्हा प्रकट झाल्याचा भास झाला. त्याची चण एकदम त्याच्या बापासारखी होती. शामियान्यातून तो बाहेर निघाला आणि लढाईत सर्वांत जास्ती गदारोळ जिथे उठला होता तिथे गेला, कारण इतका आवाज येतोय त्याअर्थी तटबंदी तिथेच सर्वांत कमकुवत आहे असे त्याला वाटले. तिथे युरिपिलस आणि त्याचे साथीदार एक बुरुज चढून येण्याचा प्रयत्न करीत होते. ओडीसिअस, डायोमीड, निओटॉलेमस आणि लेऑन्तेउस या चौघांनी भाल्यांचा मारा करून युरिपिलस आणि त्याच्या सेनेला तिथून हाकलले. पण युरिपिलस लै खौट होता. जरा उगीच दूर झाला इतकेच. थोड्या वेळाने जवळच पडलेला एक धोंडा घेऊन त्याने त्या बुरुजावर नीट नेम धरून फेकला. तटबंदी बह्वंशी मातीचीच असल्याने त्या दगडाच्या मार्‍याखाली तो बुरुजही कोसळला. घाबरून ग्रीक सैरावैरा पळू लागले, आणि युरिपिलस जहाजे पेटवून देतो की काय अशी स्थिती निर्माण झाली. युरिपिलस ग्रीकांना चिडवू लागला, “ग्रीक कुत्र्यांनो! तुमच्या टिनपाट बाणांनी मला घंटा काहीही होणार नाही. इथून परत जा नैतर सगळेजण माझ्याकडून फुक्कट मराल.”

तेव्हा ट्रोजनांनी निओटॉलेमसला पाहिले आणि अकिलीसच परत आल्याचा त्यांना भास झाला आणि त्यांची पुनरेकवार गाळण उडाली.पण ते त्यांनी युरिपिलसला सांगितले नाही. युरिपिलसही मग लढू लागला. ग्रीकांच्या तटबंदीपाशी शर्थीने लढाई चालली होती. निओटॉलेमस फॉर्मात आला आणि त्याने लै लोक मारले. लढताना आजिबात थकला नाही. ग्रीक सैन्याला ते बघून हुरूप आला, विशेषतः मॉर्मिडन सैन्याला आपला राजा असा लढताना पाहून आनंद वाटला. त्याने केल्टस नामक ट्रोजनाच्या छातीत भाला खुपसला, तर युबियस नामक ट्रोजनाच्या हेल्मेटवर एक जड धोंडा उचलून आदळला. डोसके फुटून तो जागीच कोसळला. त्याच्या आसपासही त्याने अनेक ट्रोजनांना ठार मारले. त्याचे शौर्य पाहून म्हातारा मॉर्मिडन कमांडर फीनिक्स तिथे आला आणि युद्धाच्या भरात असतानाच निओटॉलेमसला मिठी मारून त्याची प्रशंसा करू लागला. “अरे एवढासा होता तुझा बाप तेव्हापासून त्याला मीच सांभाळलंय! मीच त्याची आई अन बाप दोन्ही होतो त्याच्यासाठी. तुला पाहून त्याचीच आठवण येतेय रे पोरा. बापासारखेच लढून त्या युरिपिलसला ठार मार आणि ग्रीक व मॉर्मिडन सैन्याला दिलासा दे.”

निओटॉलेमस उत्तरला, “फीनिक्सकाका, लढाईचा निकाल तर युद्धाचा देव एरेस आणि नशीब हे दोघेच ठरवतील.”

असे त्यांचे सवालजवाब चालतात तोवर सूर्यास्त झाला आणि युद्ध थांबले. दोन्ही बाजूंचे योद्धे आपापल्या शामियान्यात परत आले. स्वतः आगामेम्नॉन निओटॉलेमसशी बोलला आणि त्याची त्याने प्रशंसा केली, “एकदम तुझ्या बापागतच दिसतोस की रे! मला तर हेक्टरला मारताना निघालेल्या अकिलीसचीच आठवण झाली. असाच लढलास तर ट्रॉयवर आपला कब्जा निश्चित आहे! अकिलीस देवाघरी गेलेला असला तरी ग्रीकांना विनाशापासून वाचवण्यासाठी त्यानं तुला पाठवलं.”

यावर निओटॉलेमस उत्तरला, “मी जिवंत असतानाच माझ्या बापाला भेटू इच्छितो. त्याच्या नावाला बट्टा लागेल असं मी काहीही करणार नाही. देवांची इच्छा असेल तर तेही होईल!” हे ऐकून सर्व ग्रीकांनी निओटॉलेमसच्या मर्यादशीलपणाबद्दल संतोष व्यक्त केला. आगामेम्नॉनबरोबर मेजवानी आटोपल्यानंतर निओटॉलेमस आपल्या-पूर्वी अकिलीसच्या-शामिन्यान्यात आला. तेथील गुलाम बायका आणि मारलेल्या ट्रोजन सैनिकांची चिलखते पाहून बापाच्या आठवणीने त्याने एक हुंदका दिला. त्याला पाहून ब्रिसीसलाही अकिलीसची आठवण येऊन ती अंमळ हळवी झाली.

इकडे ट्रोजनांनीही ग्रीकांची खोड मोडल्याबद्दल युरिपिलसची हेक्टरसारखी स्तुती केली. दोन्ही बाजूंचे लोक यथावकाश डाराडूर झोपून गेले.

निओटॉलेमसच्या हस्ते ट्यूथ्रॅनियन युरिपिलसचा वध.

निओटॉलेमसने मॉर्मिडन लोकांना चेतवले आणि म्हणाला, की लोकांना अकिलीस जिवंत असल्याचा भास झाला पाहिजे. त्याने पेटून सर्व मॉर्मिडन सैनिक निघाले. अन्य ग्रीक सैन्यही सोबत निघाले. मधमाशा घोंगावाव्यात तसे निओटॉलेमसभोवती योद्धे चालले होते. त्याच्या रथाचे घोडेही एकदम जोषात फुरफुरत होते. ट्रोजन बाजूला युरिपिलसही जोषात होता.

दोन्ही बाजू एकमेकांना भिडल्या. निओटॉलेमस एकदम फॉर्मात आला होता. आल्याआल्या त्याने मेलानेउस आणि अल्किडॅमस या दोघांना ठार मारले. त्यानंतर मेनेस, भालापटू मोरीस, पॉलिबस आणि हिप्पोमेडॉन या ट्रोजनांनाही त्याने हेदिससदनी धाडले. दिसला ट्रोजन उडव मुंडकं, दिसला शत्रू खुपस भाला असं त्याचं चाललं होतं. ट्रोजनांच्या सैन्याची त्याच्यापुढे भीतीने गाळण उडाली. अख्खे मैदान ट्रोजनांच्या प्रेतांनी भरून गेले. निओटॉलेमस आपल्या पासारखेच शौर्य गाजवीत होता.

इकडे ट्रोजन सेनापती एनिअसने अ‍ॅरिस्टोलोखस नामक ग्रीकाच्या डोक्यावर मोठा धोंडा जोरात आदळला. त्याचे हेल्मेट अन डोके दोन्हीही फुटले आणि तो जागीच ठार झाला. डायोमीडने चपळ ट्रोजन योद्धा युमेयसला ठार मारले. मायसीनीनरेश आगामेम्नॉननेही स्ट्रॅटसला तर मेरिओनेस या ग्रीक सेनापतीने ख्लेमस या ट्रोजनाचा प्राण घेतला.

ग्रीकांनी अशी कत्तल उडवलेली असताना युरिपिलस काही स्वस्थ बसला नव्हता. त्यानेही आपला कत्तलखाना सुरूच ठेवला होता. युरिटस आणि मेनोशियस या दोघा ग्रीकांना आणि त्यासोबर ओडीसिअसचा मित्र हर्पालस यालाही ठार मारले. हर्पालसला मारल्याचा अँटिफस नामक ग्रीकाला राग आला आणि त्याने युरिपिलसवर भाला फेकला. युरिपिलसने वाकून तो चुकवला, तो मेलॅनियन नामक युरिपिलसच्या साथीदाराला लागून तो गतप्राण झाला. आपला मित्र मेल्याचे पाहून युरिपिलस चिडला आणि अँटिफसवर धावून गेला, पण आपल्या लोकांआड अँटिफस दडल्याने तो युरिपिलसपासून वाचला. मग युरिपिलस इतर ग्रीकांमागे धावून त्यांची चटणी उडवू लागला. वीज पडून एखाद्या दरीत झाडे कोसळावीत तसे त्याच्या भालाफेकीने ग्रीकांची प्रेते मैदानावर पडू लागली. तेवढ्यात अकिलीसच्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले. त्याने ओरडून त्याला आव्हान दिले, “कोण आहेस तू? या युरिपिलसबरोबर समोरासमोरच्या लढाईत आजवर कोणीच टिकलं नाहीये. तू तर आता मेलासच! माझ्याशी जे जे लढले त्यांना कुत्री खँथस नदीकाठी फाडून त्यांची हाडे चघळत बसलीत. माझ्याशी सामना करायची तुझी हिंमत कशी झाली?”

निओटॉलेमसने अगदी छोटेसे उत्तर दिले.” मी परमप्रतापी अकिलीसचा मुलगा आहे.” साहजिकच आहे म्हणा, इतके क्रिडेन्शिअल सांगणे त्याला पुरेसे होते. अजून काही सांगायची गाज नव्हती. त्यानंतर दोघेही रथातून खाली उतरले. युरिपिलसने हातात एक अतिशय मोठा धोंडा घेऊन सरळ निओटॉलेमसच्या ढालीवर फेकला. पण ती अकिलीसची ढाल असल्याने त्याला काही झाले नाही. दोघे एकमेकांवर सिंहासारखे झेपावले. भाले अन तलवारींची जोरदार खणाखणी चालू होती. कधी चिलखतावर तर कधी ढालीवर वार होत होते. बाजूलाच शेकडो ग्रीक व ट्रोजन सैनिकही एकमेकांची आतडी बाहेर काढत होते. अखेरीस अकिलीसचा पेलियन पर्वतावर बनवलेला भाला निओटॉलेमसने युरिपिलसच्या गळ्यात भोसकून त्याला ठार मारले. युरिपिलस कोसळला. त्याला पाहून निओटॉलेमस म्हणाला, “इतकी टिवटिव करत होतास नै का रे ग्रीकांची जहाजं पेटवीन आणि यंव करीन अन त्यंव करीन! पण माझ्या बापाचा भाला आहे हा, कुणालाही आटपणार नाही.”

असे म्हणून त्याने भाला त्याच्या गळ्यातून बाहेर काढला आणि त्याचे चिलखत काढून घेतले. युरिपिलस पडलेला पाहून ट्रोजनांची गाळण उडाली. ते पाठीला पाय लावून पळत सुटले. त्यांचा पाठलाग करताना निओटॉलेमस आणि अन्य ग्रीकांनी लै लोकांची कत्तल उडवली. ट्रोजन्स ट्रॉयच्या गेटाआड दडू पाहणार इतक्यात हेलेनस नामक ट्रोजनाने त्यांना शिव्या घालून लढायला प्रवृत्त केले आणि लढाईला पुनरेकवार तोंड लागले.

निओटॉलेमस भलताच फॉर्मात होता. त्याने पेरिमेदेस, सेस्ट्रस, फालेरस, पेरिलाउस, मेनाल्कास, या ट्रोजनांना एकापाठोपाठ एक ठार मारले. हेक्टरचा भाऊ डेइफोबस याने लिकॉन नामक ग्रीकाच्या जांघेच्या वरती भाला खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. एनिअस या ट्रोजन सेनापतीने डायमस नामक ग्रीकाला ठार मारले, तर युरिआलस नामक डायोमीडच्या मित्राने एक लहान भाला छातीत फेकून आस्त्राएउस नामक ट्रोजनाला ठार केले. आगेनॉर नामक ट्रोजन सेनापतीने ट्यूसरचा मित्र असलेल्या हिप्पोमेनेस नामक ग्रीकाच्या गळा व खांदा यांदरम्यान वार करून त्याला ठार मारले. आपल्या मित्राला मारलेले पाहताच ट्यूसर चिडला आणि त्याने धनुष्याची प्रत्यंचा सरसावली आणि बाण सोडला. पण आगेनॉर वाकला आणि त्याने तो चुकवला. तो बाण देइओफोन्तेस नामक ट्रोजनाला जाऊन लागला. तो त्याच्या डाव्या डोळ्याच्या बुबुळात घुसून उजव्या कानातून आरपार बाहेर आला. असह्य वेदनेतही तो तसाच उठून उभा राहिला तेव्हा ट्यूसरने त्याच्या गळ्यावर नेम धरून दुसरा बाण सोडला. मानेचे स्नायू भेदले गेले आणि देइओफोन्तेस खलास झाला.

निओटॉलेमसला आता युद्धाची चटक लागली होती. अगदी बापाप्रमाणेच त्याने युद्धभूमीवर नुसता आकांत मांडला होता. वातावरण लैच टाईट झाले होते. ट्रोजन्स घाबरून शेवटी ट्रॉयच्या भिंतींआड जाऊन बसल्यावर युद्ध काहीकाळ थांबले. ग्रीकांनी आता नवीन प्लॅन केला होता. इलियडपासून आत्तापर्यंत पाहिले असेल की जेव्हा जेव्हा त्रोजन्स बळजोर होतात तेव्हा ते ग्रीकांच्या जहाजांभोवतीची तटबंई मोडायचा प्रयत्न करतात. हेक्टरनेही तेच केले आणि युरिपिलसनेही तेच केले. ग्रीकांनी आता ठरवले, की ट्रोजनांवर त्यांचाच प्रयोग करायचा. ट्रॉयच्या भिंती पूर्ण दगडी असल्याने भिंती फोडणे तोफा नसताना अशक्य होते, पण लाकडी दरवाजे फोडणे जमले असते. मग ग्रीक लोक ट्रॉयच्या दरवाजांपाशी जमले आणि दरवाजे फोडण्याचा प्रयत्न करू लागले. ट्रोजनांनी भिंतीवरून आणि बुरुजांवरून भाले, बाण आणि दगड खाली फेकण्याचा सपाटा लावला. मेरिओनेस या ग्रीक योद्ध्याने फिओलोडॅमस या ट्रोजन योद्ध्याच्या गळ्यात बाण मारून त्याचा प्राण घेतला. तो मेल्यावर त्याने पॉलितेस नामक ट्रोजनावरही दुसरा बाण सोडला पण त्याने बाजूला होऊन तो बाण चुकवला.

असा सगळा गदारोळ उठला असताना वातावरण जरा ढगाळ झाले. धुके आले आणि आकाशात विजांचा गडगडाट होऊ लागला. मग नेस्टॉर म्हणाला की हा झ्यूसदेवाचा मेसेज आहे. आपण परत गेलेलंच बरं नैतर त्याचा कोप होईल. मग ग्रीकांनी त्याचा सल्ला मानला व परत गेले. युद्धात मेलेल्या आपल्या मित्रांची प्रेते तिथेच खड्डा खणून पुरली. मग आपापल्या तंबूंत परत गेले आणि चिलखत वैग्रे काढून समोरच्या हेलेस्पाँट खाडीत उडी मारून सर्व रक्त, जखमा, इ. धुवून टाकल्या. निओटॉलेमसही आगामेम्नॉन आणि अन्य बड्या लोकांबरोबर दाबून जेवला आणि आपल्या शामियान्यात परत आला आणि झोपून गेला. बाकीचे ग्रीकही एकदम निवांतपणे झोपले. निओटॉलेमसच्या शौर्यामुळे ते आता निश्चिंत झाले होते. त्यांची भीती नष्ट झाली होती.

दुसर्‍या दिवशीची लढाई, डेइफोबसच्या हल्ल्यापुढे ग्रीकांचा जोर कमी पडतो.

दुसर्‍या दिवशी पहाट झाल्याबरोबर ग्रीकांना ट्रॉयच्या भिंती दिसू लागल्या. ट्रोजन योद्धा अँटेनॉर आकाशाकडे पाहून हात उभावून फ्रस्ट्रेट होऊन म्हणाला,

“मारावेचि अम्हां असे मनि वसे रे झ्यूसदेवा खरे,
तैं आम्ही मरु, मारि सत्वरि परी, ताणू नको दु:ख रे”

पण त्या दिवशी युद्धाला तोंड लागले नाही. कारण ट्रॉयराज प्रिआमने मेनोएतेस नामक आपला दूत आगामेम्नॉनकडे पाठवला की मेलेल्या ट्रोजन योद्ध्यांचे दहन करणे बाकी आहे तरी प्लीज ते आटपेस्तोवर युद्ध थांबवले तर बरे. आगामेम्नॉनने होकार दिल्यावर मग मेनोएतेस ट्रॉयमध्ये परत गेला. ट्रोजनांबरोबरच ग्रीकही आपल्या मरण पावलेल्या योद्ध्यांना आणि प्रिय घोड्यांना अग्नी देऊ लागले. ट्रोजनांनी युरिपिलसचे दहन करून त्याच्या अस्थी ट्रॉयच्या दार्दानियन दरवाज्यासमोर खँथस नदीकाठी पुरल्या आणि त्याच्यासाठी शोक करू लागले. एकूण वातावरणाचा परिणाम पाहून अकिलीसपुत्र निओटॉलेमसही बापाच्या थडग्याला मिठी मारून रडू लागला. कळतेपणी कधीच न पाहिलेल्या बापाच्या आठवणींनी त्याचे मन व्याकूळ झाले होते. त्याला पाहून जुना जाणता मॉर्मिडन कमांडर फीनिक्सही त्याच्याबरोबर अकिलीसच्या शोकात सहभागी झाला. त्याने आणि १२ मॉर्मिडन योद्ध्यांनी मिळून निओटॉलेमसची समजूत काढली आणि अकिलीस व अन्य गतप्राण योद्ध्यांची स्तुतीस्तोत्रे गात गात त्याला तंबूत नेले.

यथावकाश रात्र झाली आणि ब्रेडबीड खाऊन ग्रीक व ट्रोजन शांत झोपले. दुसर्‍या दिवशी पहाट झाली तसे ग्रीक सैन्य उठले आणि चिलखत घालून फुल फॉर्मात युद्ध करायला बाहेर पडले. त्यांचा आवेश पाहून ट्रोजनांना कापरे भरले. पण हेक्टरचा भाऊ डेइफोबसने त्यांना धीर दिला,”ट्रोजनांनो, घाबरायचं नाही आजिबात! तुम्ही फक्त पॅरिस किंवा हेलेनसाठी लढत नाही एवढं लक्षात घ्या! मातृभूमीच्या रक्षणासाठी, आपापल्या बायकापोरांसाठी, आपापल्या वडीलधार्‍यांसाठी आपण लढतो आहोत. आपल्यासमोर उभा असलेला तो ग्रीक अकिलीस नाहीये. तो केव्हाच झ्यूसला प्यारा झाला! आगीने त्याचा घास कधीच घेतला. समोर अकिलीस येवो नैतर त्याचा काका येवो, इतक्या शर्थीने लढा की शत्रूला कळायचं बंद झालं पाहिजे!! प्राणपणाने लढाल, तर नंतर सुख पावाल.”

त्याचे भाषण ऐकून ट्रोजनांच्या अंगात वीरश्री संचारली. अख्ख्या ट्रॉयभर लोकांची सज्ज होण्यासाठी एकच झुंबड उडाली. बायका रडत रडत का होईना, आपल्या नवर्‍यांपाशी त्यांची शस्त्रे आणून ठेवू लागल्या. लहान पोरे बापाला हेल्मेट देऊ लागली, तर म्हातारेकोतारे तरण्याताठ्यांना लढाईत विजयी भव चा आशीर्वाद देऊ लागले. आपल्या छातीवरील जुने वण दाखवत त्यांना अजून चेतवू लागले.

असे वीरश्रीने भारलेले ट्रोजन सैन्य ट्रॉयच्या दरवाजांतून बाहेर आले तेव्हा ग्रीक सैन्याशी त्यांची गाठ पडली. ढालतलवारींचा खणखणाट, मरणार्‍यांचा चीत्कार तर मारणार्‍यांची गर्जना यांनी वातावरण भरून गेले. रक्त लागून लागून तलवारी, भाले लाल झाले. चिलखतेही रक्तात न्हाली. सूं सूं करत दोन्ही बाजूंनी अनेक बाणही फेकले गेले. त्यांनी अनेकांच्या कंठाचा वेध घेतला. ट्रॉयमधील म्हातारेकोतारे आणि बायका हे सर्व काही तटावरून पाहत होत्या आणि अपोलो देवाकडे आपापल्या नवर्‍यां-पोरांसाठी प्रार्थना करीत होत्या. हेलेन मात्र लाज वाटून तिच्या दालनात एकदम खिन्न होऊन तिच्या सख्यांसोबत बसली होती.

लढाईत पहिला बळी डेइफोबसने घेतला. यवनभीष्म नेस्टॉरचा सारथी त्याने भाल्याने टिपून ठार मारला. नेस्टॉरने घोड्यांचे लगाम हातात घेतले पण त्याला मारणे सहज शक्य होते. ही अडचण ओळखून मेलँथियस नामक ग्रीक योद्धा चटकन नेस्टॉरच्या रथावर झेपावला आणि त्याने लगाम हातात घेतले व नेस्टॉरला सुरक्षित ठिकाणी नेले. तेव्हा नेस्टॉरचा नाद सोडून डेइफोबस अन्य ग्रीकांकडे वळला. त्याने मारलेल्या ग्रीकांचे रणभूमीवर ढीग पडले. डेइफोबसला घाबरून ग्रीक सैरावैरा झाले. ट्रोजनांनी त्यांपैकी काहींचा पाठलाग गेला, तर स्वतः डेइफोबसने खँथस नदीत घुसून कैकांना अणकुचीदार दांड्याने खुपसून मासे मारावेत तसे टिपून टिपून मारले. त्यांच्या रक्ताने खँथसचे पाणी लाल झाले.

डेइफोबसने चढवलेल्या जोरदार हल्ल्यापुढे ग्रीक हतबलच झाले असते पण अकिलीसपुत्र निओटॉलेमस त्यांच्या मदतीला धावून आला आणि त्याने कत्तलखाना आरंभला. आमिदेस नामक घोडेस्वार ट्रोजनाच्या बेंबीतून आरपार पाठीच्या कण्यापर्यंत भाला खुपसून त्याने त्याला घोड्यावरून खाली पाडले. आमिदेस खलास झाला. पाठोपाठ त्याने आस्कानियस नामक ट्रोजनाच्या वरून पाचव्या बरगडीखाली, तर ओएनोप्स नामक ट्रोजनाच्या जस्ट गळ्याखाली भाला खुपसून ठार मारले. त्याचा भाला एकापाठोपाठ एक योद्ध्यांचे रक्त पिऊन लालेलाल झाला होता. सोबत आगामेम्नॉन, डायोमीड, इ. अन्य ग्रीक योद्धेही खच्चून लढत होते.

अखेरीस डेइफोबसला घाबरून पळणार्‍या ग्रीकांकडे निओटॉलेमसचे लक्ष गेले. तडक तो डेइफोबसकडे गेला. सारथी ऑटोमेडॉनने निओटॉलेमसला सांगितले, “हा तुझ्या बापाला बघून घाबरून पळून गेला होता. आत्ता कशी काय डेरिंग झाली काय की.” डेइफोबस आणि निओटॉलेमसची बाचाबाची झाली आणि निओटॉलेमस त्याच्यावर भाला फेकणार इतक्यात डेइफोबस मागे पळाला. त्याला अस्सल मायसीनियन ग्रीकमधील चार शिव्या घालून निओटॉलेमसने आपला मोहरा दुसरीकडे वळवला.

नंतर ग्रीकांचा राजपुरोहित व ज्योतिषी काल्खस याच्या सल्ल्यानुसार ग्रीक परत फिरले.

प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेसचे ग्रीक सैन्यात पुनरागमन.

त्याने नवीन भविष्य वर्तवले, की लेम्नॉस बेटावर असलेल्या फिलोक्टॅटेस नामक धनुर्धार्‍याला परत आणल्याशिवाय आपल्याला विजय मिळणे अशक्य आहे. मग आगामेम्नॉनने नेहमीप्रमाणे डायोमीड आणि ओडीसिअस या द्वयीला त्याला आणायच्या कामगिरीवर पाठवले. ते दोघे जहाजात बसून लेम्नॉस बेटाकडे निघाले. तोपर्यंत आगामेम्नॉननेही युद्ध थांबवले.

आता हा फिलोक्टॅटेस कोण आणि त्याचा इथे काय संबंध हे सांगणे अवश्यमेव आहे. तर ट्रॉयवर स्वारी करायची म्हणून ग्रीक सैन्य होते त्याबरोबर हा फिलोक्टॅटेस देखील होता. थेसली येथील म्हणजेच साधारणपणे ग्रीसच्या मध्य-उत्तर भागातल्या मेलिबोएआ नामक राज्याचा राजा पोएआस याचा तो मुलगा होता. अन ग्रीकांचा भीम हर्क्युलस याच्याशी याचा क्लोज काँटॅक्ट होता. हर्क्युलसच्या दोन मुख्य लव्हर्सपैकी हा एक मानला जातो. हर्क्युलसच्या शवाला अग्नी याने किंवा याचा बाप पोएआस याने दिला असे मानले जाते. आणि मुख्य म्हणजे हर्क्युलसचे धनुष्यबाण फिलोक्टॅटेसकडे होते. वाटेत त्याच्या पायाला जखम झाली. बहुतेक साप चावून ती जखम झाली असावी. पण काही केल्या ती जखम बरी होईना. गळू झाले, ठणकले, फुटले, सगळा पू वाहिला, तरी जखम बरी होईना. सगळे ग्रीक अपशकुन अपशकुन करत बोंबलू लागले तेव्हा त्याला बिचार्‍याला एकट्याला लेम्नॉस बेटावर उतरवले आणि त्याचे सैन्य मात्र ट्रॉयला मेडॉन नामक कमांडरखाली नेले गेले. पूर्ण दहा वर्षे त्याचा अश्वत्थामा झाला होता. धनुर्धारी तर तो होताच- शिवाय जखमही बरी व्हायचे नाव घेत नव्हती. लेम्नॉस बेटावरच्या एकाकी गुहेत त्याने जवळपास दहा वर्षे काढली. ग्रीकांवर, विशेषतः ओडीसिअसवर त्याचा जास्त दात होता, कारण ओडीसिअसने आगामेम्नॉनचे कान भरून फिलोक्टॅटेसला लेम्नॉस बेटावर राहण्यास भाग पाडले होते.

जहाज लेम्नॉस बेटाच्या किनार्‍याला लागले. या लेम्नॉस बेटाचीही मजाच होती. नवर्‍यांनी थ्रेशियन गुलाम बायकांजवळच राहणे पसंत केल्याने तिथल्या सर्व बायकांनी चिडून एका रात्री सर्व पुरुषांचा खून केला आणि विधवा राष्ट्राचा जन्म झाला. ट्रोजन युद्धाच्याही लै आधीची गोष्ट.

तर फिलोक्टॅटेसला भेटायला ओडीसिअस आणि डायोमीड निघाले. थोड्या स्मरणाने ती गुहा त्यांच्या लक्षात आली आणि ते गुहेच्या तोंडाशी लगेच चढून गेले.
फिलोक्टॅटेसची अवस्था पाहून त्यांना कळायचं बंद झालं. गुहेच्या बाहेर आणि आत सगळीकडे पक्ष्यांच्या पिसांचा नुसता खच पडला होता. त्याने त्या पिसांचाच एक शर्ट बनवला होता. थंडीत तोच एक उपयोगी पडत असे. पक्ष्यांच्या मांसावरच फिलोक्टॅटेस कसाबसा जिवंत राहिला होता. सोबतच जखमेचा पू गुहेच्या जमिनीवरती सांडून कैक ठिकाणी साकळला होता. त्याचा लालसर रंग आणि उग्र दुर्गंध सगळीकडे पसरला होता. फिलोक्टॅटेसच्या पायावर झालेल्या जखमेवरती अनेक प्रकारचा औषधी झाडपाला लावूनही तो असह्यरीत्या ठणकत होता. त्याच्या शरीराची रया गेलेली होती. हाडांचा सापळा दिसत होता. गालफडे खोल गेलेली होती आणि त्याच्या केसांची झुलपे केविलवाणेपणाने लोंबत होती. डोळे भेसूर दिसत होते. त्याने आंघोळ केल्यालाही कैक वर्षे लोटली असावीत. सापळ्यात पाय अडकलेल्या कुणा रानटी जनावरागत तो दिसत होता.

ओडीसिअस आणि डायोमीडला पाहिल्यावर फिलोक्टॅटेसचा जुना राग उफाळून आला आणि त्याने हर्क्युलसचे धनुष्य उचलून त्यांवर बाणाचा नेम धरला. पण हळूहळू तो राग निवळला. त्याच्या दोन्ही बाजूस ते दोघे बसले, आणि त्याने दहा वर्षे काय हालअपेष्टा भोगाव्या लागल्या, त्यांचे साद्यंत वर्णन त्यांच्यापुढे केले. त्यांनीही ते सहानुभूतीने ऐकून घेतले आणि ओडीसिअस त्याला म्हणाला, “जर तू आमच्याबरोबर ट्रॉयला परत आलास, तर तुझी जखम बरी करू शकणारे वैद्यराज आहेत तिकडे. ग्रीक सैन्याची अवस्था सध्या बिकट झालेली आहे. नियतीमुळेच तुला तिकडं रहावं लागलं, नैतर आमच्यापैकी कुणाचीही इच्छा नव्हती तुला इकडं ठेवायची.”

म्हणजे बघा गरज आल्यावर अचानक कसा पुळका आला ते. खरेतर आत्ता गोड बोलणारा हा ओडीसिअसच तेव्हा त्याला हाकलण्यात अग्रभागी होता. ग्रीक सेनेबरोबर वैद्यराज मॅखॉन तेव्हाही होताच, पण तेव्हा नै सुचली ही बुद्धी. माज तर करायचा,पण वाट लागली अन गरज भासली की पुन्हा लाळघोटेपणा करायचा ही राजकारणी वृत्ती लै जुनी आहे याचे अजून एक प्रत्यंतर आले या घटनेवरून.

तर असे म्हणून त्या दोघांनी ही फिलोक्टॅटेसला उचलून जहाजावर नेले. त्याला आंघोळ घातली, आणि खायला ताजे मांस दिले. जेवण झाल्यावर सगळेजण झोपून गेले.

यथावकाश जहाज ट्रॉयच्या किनारी हेलेस्पाँट खाडीला लागले. वैद्यराज मॅखॉन मरण पावला होता. त्याजागी आता त्याचा भाऊ पॉदालिरियस काम पाहत होता. त्याने आपला बाप अन ग्रीक धन्वंतरी एस्कुलापियसचे स्मरण करीत एक नामी औषधी त्याच्या जखमेवर लावली आणि काय आश्चर्य! त्याची जखम बरी झाली. त्यासरशी त्याच्या अंगात जणू हजार हत्तींचे बळ संचारले. सर्व काळजी, खिन्नपणा त्याने आता सोडून दिला होता.

स्वतः आगामेम्नॉन व मेनेलॉस हे खासे त्याला भेटायला आले. त्याला पाहून मरून पुनर्जन्म झालेल्यास पहावे तितके आश्चर्य त्यांना वाटले. टिपिकल पॉलिटिशियन देतो तसे एक लंबेचवडे भाषण देऊन आगामेम्नॉनने त्याला सात बायका, चाळीस घोडे व बारा तिवया भेट दिल्या. त्याने फिलोक्टॅटेसही खूष झाला आणि त्या भेटवस्तूंसकट आपल्या सैन्याजवळच्या शामियान्याकडे गेला. यथावकाश रात्र झाली आणि जेवण करून लोक झोपले.

दुसर्‍या दिवशी ग्रीकांनी आपापल्या भालेबरच्यांना आणि बाणाच्या टोकांना धार लावली, घोड्यांना वैरण खिलवली. फिलोक्टॅटेस त्यांना म्हणाला, “चला तयार व्हा! ट्रॉयच्या भिंती पाडू आणि त्याचा पूर्ण खातमा करू!” ते ऐकून ग्रीक सैन्यही एकदम पेटून युद्धाला निघाले.

फिलोक्टॅटेस व अन्य अनेकविध ग्रीक-ट्रोजनांचा पराक्रम, फिलोक्टॅटेस पॅरिसला वर्मी बाण मारतो.

आता ट्रॉयमध्ये भरलेल्या एका महासभेत पॉलिडॅमस नामक ट्रोजन परत म्हणाला, “ग्रीकांचा जोर फारच जास्ती दिसतोय. किती झालं तरी चढाई करून येतच आहेत. उगीच त्यांच्याशी लढण्यापेक्षा आपण आपल्या भिंतींआड लपून राहू. काही झालं तरी आपल्या भिंती फोडणे ग्रीकांना शक्य नाही.”

ते ऐकून ट्रोजन सेनापती एनिअस लै चिडला. “डोक्यावर पडलायस काय? तुला कोण शहाणं म्हणतंय मला कळेना बॉ. तुला काय वाटतंय, आत लपून राहिलो म्हणून काय ग्रीक चढाई करायचे बाकी राहतील काय? ते कायम हल्ला करतच राहतील. शिवाय बाहेर जाता आलं नाही तर त्या भिंतींचा तरी काय घंटा उपयोग आहे? उपासमारीनं मरू फुकट. त्यापेक्षा जोर एकवटून लढाई करू, जे होईल ते होईल. झ्यूसची मर्जी असेल तर आपण जिंकू, पण नसेल तर पितृभूमीसाठी लढून मगच मरू.”

हे ऐकून गर्जना करून ट्रोजनांनी त्याचा जयजयकार केला आणि युद्धासाठी निघाले. इकडे ग्रीक सैन्यही निघाले आणि युद्धाला तोंड लागले. सर्वप्रथम एनिअसने हर्पालिऑन नामक ग्रीकाच्या कमरेखाली भाला खुपसून त्याला हेदिससदनी पाठवले. त्यानंतर हिल्लस नामक ग्रीकाचेही प्राण घेतले. तो मेलेला पाहून क्रीटाधिपती इडोमेनिअसला लै दु:ख झाले.

इकडे अकिलीसपुत्र निओटॉलेमसने ट्रोजनांची अनावर कत्तल चालवली होती. एका फटक्यात त्याने केब्रस, हर्मॉन, पासिथेउस, हिस्मिनस, स्खेदियस, इंब्रासियस, फ्लेगेस, म्नेसाएउस, एन्नोमस, आम्फिनस, फासिस, गालेनस या बारा ट्रोजन वीरांना लोळवले.

त्यानंतर एनिअसचा साथीदार युरिमेनेस याने बरेच ग्रीक मारले. इतके, की त्याच्या भाल्याचे टोक वाकून गेले! मग मेगेस नामक ग्रीक धनुर्धार्‍याने त्याच्या बरगडीवर बाण मारला. रक्त ओकत युरिमेनेस कोसळला. त्याचे चिलखत काढून घेण्यासाठी दिलेऑन आनि अँफिऑन हे दोघे ग्रीक पुढे सरसावले, पण एनिअसने त्या दोघांनाही त्याआधीच ठार मारले.

डायोमीडने मेनॉन आणि अँफिनूस या ट्रोजनांना ठार मारले, तर पॅरिसने देमोलिऑन नामक स्पार्टन योद्ध्याला छातीत उजवीकडे बाण मारून ठार मारले. ग्रीक धनुर्धारी ट्यूसरनेहि झेखिस नामक ट्रोजनाला लोळवले, तर मेगेस या ग्रीक योद्ध्याने अल्काएउस नामक ट्रोजनाला एकदम हृदयाजवळ भाला खुपसून ठार मारले. ट्रोजन योद्धा ग्लॉकसचा सहकारी स्किलाकेउसला ओडियस नामक ग्रीकाच्या मुलाने त्याची ढाल भेदून खांद्यात भाला खुपसला, पण तो मेला नाही. नंतर ट्रॉयमधल्या बायकांनी त्याला ठार मारले. परत गेल्यावर त्यांनी आपापल्या पोरानवर्‍यांची चौकशी केल्यावर ते सगळे मेले असे तो म्हणाल्यावर त्या चिडल्या आणि त्यांनी जमावाने त्याच्यावर दगडफेक करून ठार मारले.

आता हर्क्युलसचे धनुष्य धारण करणारा फिलोक्टॅटेसही फॉर्मात आला होता. त्याने देइओनेउस आणि अकॅमस या दोघा ट्रोजनांना लोळवले. त्यांसोबतच अजूनही अनेक लोकांना त्याने ठार मारले. त्यातच त्याला पॅरिस दिसला.

दोघे आमनेसामने आले. पॅरिसने फिलोक्टॅटेसवर एक बाण सोडला. फिलोक्टॅटेसने बाजूला होऊन तो बाण चुकवला. तो क्लिओडोरस नामक ग्रीकाच्या खांद्याचे स्नायू भेदून गेला. क्लिओडोरसच्या खांद्यात अगोदरच पॉलिडॅमस या ट्रोजनाने भाला खुपसला होता तरी तो युद्धाला तयार होता. पण आता बाणही आरपार गेल्यावर तो कोसळला आणि असह्य वेदनांमध्ये त्याने प्राण सोडला. ते पाहताच फिलोक्टॅटेस चिडला आणि पॅरिसला म्हणाला, “कुत्र्या! माझ्याशी बरोबरी करतोस काय! मी आता तुला ठार मारणार म्हणजे मारणारच!!”

असे म्हणून आकर्ण प्रत्यंचा ताणून त्याने पॅरिसवर बाण सोडला. तो त्याच्या मनगटाला चाटून गेला. मग लगेच त्याने दुसरा बाण सोडला, तो मात्र पॅरिसच्या जांघेजवळ लागला.

पॅरिसचा मृत्यू- दोन व्हर्जन्स- पॅरिसची प्रथम पत्नी ओएनोनीचे उपाख्यान.

क्विंटस स्मिर्नियस सांगतो त्याप्रमाणे पॅरिस पुन्हा ट्रॉयमध्ये निघून गेला. पण एपिक सायकलनुसार पॅरिस युद्धभूमीवरच मेला आणि मेनेलॉसने त्याच्या प्रेतावर रागाने तलवारीचे घाव घातले, पण ट्रोजनांनी ते प्रेत परत ट्रॉयमध्ये नेले.

यानंतरही पॅरिसची जखम भरून निघाली नव्हती. ग्रीक सैन्य जहाजांकडे निघून गेले, ट्रोजन सैन्यही ट्रॉयमध्ये परत आले. पण पॅरिसचं दुखणं थांबलं नव्हतं. जुनी भविष्यवाणी आता खरी ठरली होती- पॅरिसला त्याची अगोदरची बायको ओएनोनी हीच फक्त वेदनांपासून मुक्तता देऊ शकत होती.

ही ओएनोनी कोण? तर पहिल्या भागात पॅरिसचा जन्म होताक्षणी त्याला बाहेर टाकून दिले होते हे वाचले असेल. कारण याच्यामुळे ट्रॉयचा विनाश होईल असे भविष्य वर्तवले गेले होते. त्याला आगेलाउस नामक धनगराने पाहिले आणि वाढवले. पॅरिस धनगर असताना तो ओएनोनीच्या प्रेमात पडला आणि त्यापासून तिला एक मुलगाही झाला-कॉरिथस नावाचा. पुढे जेव्हा पॅरिसला ट्रॉयमध्ये परत घेतले गेले, तेव्हा मात्र त्याने तिचा त्याग केला. हेलेन मिळाल्यावर तर तो तिला पूर्णच विसरून गेलेला होता. आता जिवावर बेतल्यावर त्याला तिची आठवण आली होती.

पॅरिस इडा पर्वताजवळ तिच्याकडे गेला आणि निर्लज्जपणे विनवले की मला बरे कर, माझ्यावर राग धरू नकोस, इ.इ. यावर ओएनोनी खवळली. साहजिकच आहे म्हणा, इतक्या वर्षांनी फक्त कामानिमित्त आठवण आली तर कसं चालायचं? “अरे हरामखोरा, बायकोची आत्ता आठवण झाली होय रे तुला!!! त्या हेलेनपायी मला सोडून गेलास मग आत्ता तरी कशाला माझ्याकडे आलास? जा जा तिच्या मिठीत! नालायका, जा चालता हो माझ्या घरासमोरून आत्ताच्या आत्ता! मुडदा बशिवला तुझा, तुझ्यापायी इतक्या लोकांना मारलंस फुकट, काही लाज आहे की नाही???”

शेवटी इडा पर्वतावरच तळमळत पॅरिसने प्राण सोडला. एका धनगराने प्रिआमची पत्नी हेक्युबा हिला पॅरिस मेल्याचे सांगितल्यावर ती त्याच्यासाठी विलाप करू लागली. प्रिआमलाही हे कळले, पण पॅरिसबद्दल त्याला इतके दु:ख झाले नाही. तो रडत रडत हेक्टरच्या थडग्यापाशी बसला होता. हेक्टरवर त्याचे इतर कुणापेक्षाही जास्त प्रेम होते. अन तेही उघड होते म्हणा.

इकडे हेलेनही मोठ्याने रडत होती, पण तिचे दु:ख पॅरिससाठी कमी अन स्वतःच्या पापांसाठी जास्त होते. पॅरिस मेल्यावर ट्रॉयमध्ये आपली काय गत होईल, या विचारानेच तिला कापरे भरले होते.तिच्याबरोबर बाकीच्या स्त्रियादेखील शोक करू लागल्या-पण तो शोक पॅरिससाठी नव्हता. प्रत्येकजण आपापले दु:ख आठवून रडत होती.

पॅरिस मेल्याचे दु:ख जर कुणाला झाले असेल तर ओएनोनीला. तो मेल्याचे कळताच, रात्री तिचा बाप अन अन्य सर्वजण झोपल्याचे पाहून, दाराला कडी लावून ती दरदर इडा पर्वत उतरून ट्रॉयकडे आली. वाटेतले खाचखळगे, दर्‍या, वन्य पशू, इ. कशाकशाची तमा न बाळगता ती ट्रॉयजवळ आली आणि त्याची चिता पाहून तिने सरळ त्या चितेवर उडी घेतली. ते पाहणार्‍यांना त्यामुळे परम आश्चर्य वाटले. स्वर्गातल्या अप्सरा आपापसांत बोलू लागल्या,
“पॅरिस महाभिकारचोट होता. इतकी एकनिष्ठ बायको सोडून बाहेर शेण खायला जावं कशाला? त्याच्यामुळं अख्ख्या ट्रॉयचं तळपट होऊ घातलंय.”

चितेत दोघेही जळून खाक झाले. वाईनने आग बुजवून ट्रोजनांनी दोघांच्या अस्थी बाहेर काढल्या आणि एका मोठ्या सोन्याच्या बरणीत ठेवल्या आणि त्याभोवती एक मोठा चबुतरा उभारला. त्याच्याजवळ दोन खांब उभारले-दोघांच्या नात्याचे प्रतीक म्हणून.

इथे पोस्टहोमेरिकाच्या १४ बु़कांपैकी १०वे बुक संपते.

(क्रमशः)

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

अकिलीसच्या शवाभोवतीची तुंबळ लढाई- थोरल्या अजॅक्सचा महापराक्रम आणि ओडीसिअसची समर्थ साथ.

अकिलीस मृतावस्थेत पडला तरी ट्रोजन सैनिक घाबरून त्याच्या जवळ येत नव्हते. पण मग पॅरिसने त्यांना ओरडून धीर दिला, “आजवर ट्रॉयचे अन ट्रोजन लोकांचे सर्वांत जास्त नुकसान करणारा अकिलीस अखेर एकदाचा मेला! कुत्रीगिधाडे खातील त्याला फाडून. आज एकतर लढाईत जिंकू किंवा मरू. अकिलीसला हेक्टरच्याच रथाला बांधून नेऊ फरपटत, मग ट्रोजन बायका येऊन त्याला फुल शिव्या घालतील. माझा बाप म्हातारा राजा प्रिआम आणि बाकीची शीनियर मंडळीदेखील खूप आनंदित होतील. तेव्हा चला, याचे प्रेत नेऊ ट्रॉयमध्ये.”

हे ऐकल्यावर ट्रोजनांना जरा हुरूप आला आणि ग्लॉकस, आगेनॉर, एनिअस या ट्रोजन सेनापतींनी अकिलीसच्या शवाला गराडा घातला. पण अकिलीसचा चुलतभाऊ थोरला सांड अजॅक्स अकिलीसच्या डेड बॉडीची इज्जत राखायला पुढे आला. कुणालाही क्षणभराची उसंत घेऊ देईना. आपली सात थर कातडी अन आठवा थर ब्राँझचा असलेली भलीथोरली ढाल आणि लांब भाला घेऊन त्याने फुल्ल कापाकापी सुरू केली. आपल्या पोळ्याभोवती कुणी माणूस आला तर त्याला चहूबाजूंनी नांग्या मारून हैराण करावे तसे ट्रोजन्स अजॅक्सला भिडू लागले आणि त्या माणसाने माश्यांची पर्वा न करता त्यांचे पोळे कापून त्यातून मध काढावा तसा अजॅक्स एकेका ट्रोजनाला ठार मारू लागला. त्याने पराक्रमाचा सपाटा लावला होता. आगेलाउस नामक ट्रोजनाला छातीत भाला खुपसून त्याने ठार मारले. त्यानंतर थेस्टॉर, ऑकिथूस, आगेस्ट्रॅटस, आगानिप्पस, झोरस, नेस्सस, एरिमास यांना एकापाठोपाठ एक हेदिससदनी पाठवले. एरिमासला मारल्यावर ग्लॉकस चिडला, कारण तो त्याचा सहकारी होता. त्याने अजॅवर नेम धरून भाल्याचा वार केला. अजॅक्सची ढाल भेदून भाला आरपार गेला पण अम्गातल्या चिलखतामुळे त्याला काही झाले नाही. मग ग्लॉकसने त्याला शिव्या घातल्या, “स्वतःला लै मोठा समजतोस काय रे आँ? पण आज तू माझ्या हातून मरणार एवढे नक्की!!!”

त्यावर अजॅक्सनेही शाब्दिक वाराची यथास्थित परतफेड केली,” अरे फाटक्या, तुझी लायकी ती काय आणि माझ्याशी असं बोलतोस!!!तो हेक्टर तुझा बाप होता त्यालाही मी आटपलो नाही. डायोमीडच्याही बरोबरीने मी लढलोय. तू म्हणजे किस झाडकी पत्ती! अकिलीसच्या शवाभोवती माश्यांसारखे पडलेल्या ट्रोजनांतच तूही आता जमा होशील. मी काही तुला जिवंत सोडणार नाही.”

असे म्हणून अजॅक्सने भाल्याने ग्लॉकसचा प्राण घेतला. अकिलीसच्या शवाभोवतीची ट्रोजनांची गर्दी जरा मागे हटली. ग्लॉकस पडल्याचे पाहून एनिअस नव्या दमाच्या सेनेसकट तिथे आला. पण युद्धात अजॅक्सने एनिअसच्या उजव्या हातातून भाला आरपार खुपसला. असह्य वेदनेने कळवळत एनिअस लढाईतून मागे हटला. त्याच्या जखमेला जळवा लावून उपचार केले गेले.

वीज चमकावी तसा अजॅक्स भाला शत्रूच्या अंगांगांत खुपसत होता. आता त्याच्या मदतीला इथाकानरेश ओडीसिअसदेखील आला. दोघे खुंदल खुंदल के लढाई करू लागले. मायनालुस, अॅटिम्नियस आणि प्रोटियस या तिघा ट्रोजनांना ओडीसिअसने एकमेकांलगतच लोळवले. अल्कॉन नामक ट्रोजनाने ओडीसिअसच्या उजव्या गुडघ्याजवळ भाला खुपसून रक्त काढले खरे, पण त्या जखमेची पर्वा न करता ओडीसिअसने तसेच अल्कॉनची ढाल भेदून आरपार भाला खुपसून त्याला ठार मारले.

जखमा होऊनही दिसणारा ओडीसिअसचा पराक्रम पाहून इथाकाहून आलेले ग्रीक सैनिकही पुढे झाले. अकिलीस आणि अजॅक्स यांच्या शौर्यामुळे तेही त्या दोघांप्रति एकदम एकनिष्ठ होते. ट्रोजनांची चटणी उडवू लागले. ट्रोजन सैन्यात हलकल्लोळ उडलेला पाहताच थोरल्या अजॅक्सवर बाण मारावा म्हणून पॅरिस बाण लावून आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणून सोडणार इतक्यात अजॅक्सने चपळाई करून एकदम शिताफीने एक भलाथोरला धोंडा सरळ पॅरिसच्या डोक्यावर नीट नेम धरून फेकला. नेम अचूक लागला. पॅरिसला कळायचं बंद झालं. त्याच्या डोळ्यांपुढे एकदम अंधारी आली आणि तो जागीच कोसळला. हातातून धनुष्य खाली पडले, बाणांचा भाताही मोकळा झाला, त्यातले बाण इतस्ततः पडले. मरायचाच, पण थोडक्यात वाचला हेल्मेटमुळे. पॅरिसला बाकी ट्रोजनांनी तत्परतेने मागे नेले म्हणून वाचला, नैतर उससे तो ना हो पाता ये सब.
ते पाहून अजॅक्स रागाने म्हणाला, “कुत्र्या, मरण्यापासून आज वाचलास तू!!पण लौकरच कुणा ग्रीक योद्ध्याकडून तुझे मरण निश्चित आहे. मीच मारला असता आत्ता तुला, पण अकिलीसच्या शवाची अब्रू कायम राखण्याचं महत्त्वाचं काम आहे मला.”

अजॅक्सच्या आवेशाला घाबरून ट्रोजन सैन्य पळत सुटले. पार ट्रॉयपर्यंत गेले तेव्हा त्यांचा पाठलाग करण्याचा नाद त्याने सोडून दिला आणि मृतदेहांनी खचाखच भरलेले मैदान तुडवत तो परत आला. इतकी प्रेते मैदानभर पडली होती, की येताना एकदाही त्याच्या पायाचा स्पर्श जमिनीला झाला नाही!

अखेरीस अकिलीसचे पार्थिव त्याच्या शामियान्यात परत आणले गेले.

अकिलीसचा अंत्यविधी.

(अकिलीसच्या थडग्यासमोर अलेक्झांडर)

अख्खे मॉर्मिडन सैन्य आणि अन्य ग्रीक राजेमहाराजे त्याच्या शवाभोवती विलाप करू लागले. साहजिकच होतं म्हणा ते. गेल्या दहा वर्षांत ११ शहरे आणि १२ बेटे ग्रीकांच्या ताब्यात आणून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारा, नवव्या वर्षाच्या शेवटी ग्रीक सैन्य उठाव करून परत जाण्याच्या बेतात असताना त्यांचे मन वळवणारा, जिवाला जीव देणारा आणि लढाईत देवांनाही न आटपणारा असा हा ट्रोजनांचा कर्दनकाळ हेदिसच्या घरी कायमचा निघून गेल्यावर आयत्यावेळी ब्रह्मास्त्र विसरलेल्या कर्णासारखीच ग्रीकांची अवस्था झाली होती. “आता आपलं काही खरं नाही, ट्रोजनांकडून आपण मारले जाऊ” या विचाराने ग्रीक अजूनच हमसून हमसून रडत होते. समुद्रापलीकडे असलेल्या आपल्या बायकापोरांची आठवण येऊन त्या शोकाला अजूनच उठाव मिळत होता.

सर्व मॉर्मिडन सैनिक रडत होते. अजॅक्स आणि शीनियर मॉर्मिडन सेनापती फीनिक्स या दोघांनी मुक्तकंठाने विलाप केला. पाठोपाठ आगामेम्नॉनही एकदम ब्रेकडाऊन झाला तेव्हा पुत्रवधाचे दु:ख वागवत असलेल्या शहाण्या नेस्टॉरने त्याला समज दिली, “बाबारे, शोक तर आपण नंतरही यथावकाश करूच. अगोदर अकिलीसच्या शवाला नीट आंघोळ घाला. प्रेताला असं कितीवेळ सडवणार?”

मग मॉर्मिडन लोकांनी अकिलिसची डेड बॉडी नीट स्वच्छ केली. सगळे रक्त आणि जखमा नीट धुवून काढल्या आणि नवीन पोषाख घातला.अकिलीसने युद्धात मिळवलेली आणि अकिलीस व आगामेम्नॉन यांमधील युद्धास कारण ठरलेली ब्रिसीसही इतर गुलाम स्त्रियांसह शोक करू लागली, कारण अकिलीस तिला गुलामासारखे वागवत नव्हता, तर उलट पत्नीचा दर्जा दिला होता.ब्रिसीसने शोकापायी आपल्या छातीला नखाने लाल होईस्तवर ओरखडे काढले.

त्यानंतर समुद्रातून अन्य अप्सरांसह अकिलीसची अमर आई थेटिस आली आणि शोक करू लागली. “माझी इच्छा नसतानाही एका मर्त्य मानवाशी माझं लग्न लावून दिलं. ते एक असोच, पण पेलिअसदेखील आता बघता बघता म्हातारा झाला. पण त्याच्यापेक्षाही अकिलीसचं दु:ख मला जास्त वाटतं. माझ्या मुलाची कीर्ती दिगंतात पोचेल असं झ्यूसनं वचन दिलं होतं ते पाळलं, पण त्याचं आयुष्य अगदीच कमी ठेवलं!!!!”

थेटिस असा विलाप करीत असताना कॅलिप्सो नामक दुसर्या एका अप्सरेने तिला धीर दिला, “बाई गं, धीर धर. अगं मी अमर असले तरी माझाही मुलगा मेलाच की. त्याचं दु:ख मी आजवर वागवतेय. आणि काळजी करू नकोस, ट्रोजन्स आता थोड्या दिवसांतच नष्ट होतील.”
असे नानापरीचे समजुतीचे बोल अप्सरा एकमेकींना ऐकवीत होत्या. त्यातच रात्र झाली आणि सर्व ग्रीक झोपी गेले, पण थेटिस जागीच होती. साहजिकच आहे म्हणा, मुलगा मेल्यावर कुठली आई स्वस्थ बसू शकेल?

दुसर्या दिवशी सकाळी ग्रीक लोक उठले आणि आन्हिके आटपून जवळच्या इडा पर्वताहून लाकूडफाटा आणण्याच्या कामाला लागले. स्वतः आगामेम्नॉन आणि मेनेलॉस या खाशांचे हुकूम होते की भरपुर लाकूडफाटा आणा-जेणेकरून अकिलीसच्या पार्थिवाचे लौकर दहन होईल-आणि तोही जल्द अज जल्द. तो सर्व लाकूडफाटा आणला. चितेच्या मध्यभागी अकिलीस, सभोवती कामी आलेल्या अनेक योद्ध्यांचे चिलखत ठेवले. त्यांवर अनेक ट्रोजन योद्ध्यांचा आणि त्यांसोबत अनेक घोड्यांचाही बळी दिला गेला. शिवाय बळी दिलेले अनेक बैल, मेंढ्या व डुकरे हेही बाजूस मांडण्यात आले.गुलाम स्त्रियांनी अनेक कपडे आणले, तसेच सोने व अॅंबरपासून बनलेले अनेक बहुमोल दागदागिने व रत्ने ठेवण्यात आली. स्वतः ब्रिसीसने अकिलीसच्या पार्थिवावर काही सदरे ठेवले. मॉर्मिडन प्रथेप्रमाणे पॅट्रोक्लसच्या वेळेस जसे आपापल्या केसांची एक बट कापून प्रेतावर ठेवण्यात आली, तसेच याही वेळेस प्रत्येक मॉर्मिडन सैनिक व कमांडर लोकांनी आपापले केस भादरून अकिलीसच्या प्रेतावर ठेवले. ब्रिसीसनेही आपल्या केसांच्या बटा त्या पार्थिवावर ठेवल्या. शिवाय तेलाचे अनेक बुधले त्यावर ओतण्यात आले. त्यासोबतच अनेक जार भरून मध, वाईन आणि शिवाय सुगंधी वासाची द्रव्येही ओतली गेली.
अशा जय्यत तयारीनंतर स्वतः झ्यूसदेवाने अकिलीसवर ऑलिंपस पर्वतावरून अँब्रोशिया ऊर्फ अमृत ओतले आणि उत्तर व पश्चिमेच्या वार्यांना अकिलीसच्या चितेवर वाहण्याची आज्ञा केली. स्वतः झ्यूसच्या आज्ञेनुसार मग अकिलीसची चिता धडाधडा पेटू लागली.

जेव्हा अखेरीस अग्नीने सर्व आहुतींचा घास घेतला, तेव्हा मग उरलेल्या हाडांवर वाईन टाकून मॉर्मिडन लोकांनी ती विझवली. चितेच्या मध्यभागी असलेली अकिलीसची हाडे ओळखण्यात त्यांना काहीच अडचण आली नाही. एखाद्या राक्षसासारखी मोठी होती आकाराने. मॉर्मिडन लोकांनी सर्व हाडे ताब्यात घेतली आणि मध व गायींची चरबी त्यांभोवती ठेवली. पॅट्रोक्लसच्या अस्थी ज्या बरणीत होत्या त्याच बरणीत अकिलीसची हाडेदेखील ठेवण्यात आली आणि दहनस्थळी एकदम एका टोकाला त्यावर एक चबुतरा उभारण्यात आला.

इकडे अकिलीसच्या रथाचे अमर घोडेदेखील मालकासाठी झुरत होते. पण त्यांना आता मर्त्यलोकात थोडे दिवसच काम होते. ते झालं की परत देवलोकात त्यांची रवानगी होणारच होती.नंतर समुद्रातून वरुणदेव पोसायडन वरती आला आणि त्याने थेटिसला पुन्हा दिलासा दिला. त्याने समाधान पावून थेटिस आपल्या अप्सरा मैत्रिणींसोबत पुन्हा समुद्रतळाशी निघून गेली. पोसायडनसुद्धा अदृश्य झाला आणि शोक करत ग्रीक सैन्य पुन्हा जहाजांपाशी आले.

अकिलीसचे फ्यूनरल गेम्स.

यथावकाश रात्र झाली अन सर्वजण झोपून गेले. दुसर्या दिवशी सकाळी ग्रीक सैन्य तयार झाले तेव्हा डायोमीड सर्वांना उद्देशून म्हणाला, “ग्रीकहो, अकिलीस मेला म्हणून आपल्या लढण्यात कसलीही उणीव शत्रूला दिसता कामा नये. चिलखत,शस्त्रे,रथ-सगळं घेऊन या, विजयश्री आपली वाट पाहतेय!”

यावर थोरला अजॅक्स म्हणाला, “डायोमीड, तू म्हणतोस ते सोळा आणे सच आहे. लढलं तर पाहिजेच. पण रीतिरिवाज भी तो एक चीज है! अकिलीस परवापरवाच मेला, त्याचे फ्यूनरल गेम्स खेळण्याची वेळ झालीये आता. अकिलीसची आई थेटिस स्वतः मला म्हणाली की ती इथे येऊन जातीने जिंकणार्यांना बक्षिसे देणारे म्हणून.”

डायोमीडने याला रुकार दिल्यावर समुद्रातून थेटिस आली. सर्व योद्ध्यांमध्ये तिने तिच्याकडच्या भेटवस्तू मांडल्या आणि ग्रीकांमधील व्हॉलंटियर लोकांना पाचारण केले. तिचे स्वागत करायला वृद्ध नेस्टॉर पुढे आला.

नेस्टॉर वृद्ध असल्याने पळापळी किंवा भोसकाभोसकी करू शकत नसे, पण योग्य वेळी योग्य सल्ले देण्यात त्याचा कुणीच हात धरत नसे. स्वतः आगामेम्नॉनसुद्धा त्याचा प्रचंड आदर करीत असे. तो सभेत गाणे गाऊ लागला.

“देवी थेटिस दिली झ्यूसदेवाने | त्या राजा पेलिअसाला |
खाल्ली मेजवानी देवांनी | आनंद मोठा सगळा झाला |
पुत्र झाला महान तिला | म्हणती लोक पाहू अकिलीसाला |
बारा शहरे नष्टवी ऐसा | आहे कुणी त्याच्या तोडिला रं जी जी रं जी ||
अॅस्टेरोपायुस स्येनुस आणिक | पॉलिडोरस, ट्रॉयलस लियाकॉनाला |
मारले झडकरी शत्रु अनेक | लाल केले खँथस नदिला |
मारि हेक्टर पॅट्रोक्लसाला | चढे घोडियानिशी वधले त्याला |
पेन्थेसिलिआ ये, मेम्नॉनहि आला | मारि तल्वार, फेकुनि भाला |
ऐक थेटिस देवी नीट | गातो अकिलीसाला जी रं जी जी ||
महाचपळ जैसी वीज | ग्रीकलोकीं अन्य कवण न तेज |
अतुर्बळी जैसा झ्यूस | शत्रुतोंडा आणी फेस |
रथ हाकी अकिलीस जैसा | अपर न करू धजावे तैसा |
नेलियसाचा नेस्टॉर गाई | अकिलीसकवना, आइक त्याचे आई ||”

नेस्टॉरच्या चपखल शब्दयोजनेमुळे सर्व ग्रीक भारावून गेले आणि स्वतः थेटिसने खूष होऊन नेस्टॉरला अकिलीसच्या रथाचे घोडे भेट दिले. शुक्रिया शुक्रिया म्हणत नेस्टॉर हळूहळू आपल्या जागेवर जाऊन बसला.

आता फ्यूनरल गेम्सचे इव्हेंट जाहीर झाले. पहिला इव्हेंट होता रनिंग रेसचा. थेटिसने रेस जिंकणार्याला दहा गायी तर सहभागी झालेल्या प्रत्येकाला एक वासरू असे बक्षीस जाहीर केले. ही गुरे स्वतः अकिलीसने इडा पर्वतावर ट्रोजनांच्या हातून हिसकून आणली होती.

थोरला अजॅक्स, त्याचा भाऊ ट्यूसर आणि धाकटा अजॅक्स हे तिघे रनिंग रेससाठी तयार झाले. आगामेम्नॉनने त्यांना रेसचा अंतिम फिनिशिंग पॉइंट दाखवला. मुख्य चुरस होती धाकटा अजॅक्स आणि ट्यूसर यांच्यामध्ये. रेस सुरू झाल्यावर कधी ट्यूसरचे चाहते त्याला चीअर करत होते, तर कधी धाकट्या अजॅक्सचे सपोर्टर त्याला चीअर करत होते. पण धावता धावता मध्येच ट्यूसरचा पाय एका झुडुपात अडकला आणि घोट्याला जखम झाली. शिरा तटाटून रक्त आले. असह्य वेदनेने तो खाली कोसळला. त्याचा चीत्कार ऐकून त्याचे मित्र धावत धावत तिथे आले आणि त्यांनी त्याला बाजूला नेले. जळवा लावून उपचार करण्यात आले. त्यानंतर काही औषधी उटणी लावून मग पोटीस बांधले गेले आणि त्याचे दुखणे जरा कमी झाला. इकडे धाकटा अजॅक्स तराट पळतच होता. रेस अपेक्षेप्रमाणे तोच जिंकला आणि बक्षीसादाखलच्या दहा गायी घेऊन आपल्या शामियान्याकडे गेला.

आता पुढचा इव्हेंट होता कुस्ती!!! शड्डू ठोकत तरुण आर्गिव्ह पैलवान डायोमीड आणि यवनकेसरी थोरले अजॅक्सअण्णा सलामीकर हे दोघे मैदानात आले.मैदानात आल्याबरोबर लगेच कुस्तीला तोंड लागले. बराच वेळ कोणीच कुणाला आटपेना. मग अखेरीस अजॅक्सने डायोमीडच्या शरीराभोवती आपली वज्रमिठी घातली. पण त्या विळख्यातून डायोमीड लगेच सुटला. त्याने आपली मांडी अजॅक्सच्या खाली ठेवून त्याला उचलले. जरा वर उचलून मग आडवे केले आणि खांद्याला एक झटका देऊन अजॅक्सला बाजूस फेकले आणि त्यासोबत स्वतःही खाली पडला. ग्रीकांमध्ये एकच चीत्कार उठला. पण अजॅक्स चिडला आणि त्याने डायोमीडला परत गर्जना करून आव्हान दिले आणि ते दोघेही पुन्हा एकमेकांना भिडले. एकमेकांना कधी ढकलताहेत, कधी उचलू पाहताहेत, पण कोणीच कुणाला आटपेना. डायोमीड अजॅक्सच्या मांड्या उचलून त्याला फेकू पाहत होता, तर अजॅक्स आपल्या वजनाचा वापर करून रेटू पाहत होता. डायोमीडला त्याने कधी उजवीकडे, तर कधी डावीकडे गरगरा फिरवले. लोक कधी अजॅक्सच्या नावाचा, तर कधी डायोमीडच्या नावाचा जयजयकार करीत होते. अखेर एकदाचा डायोमीड खोपचीत घावल्याबरोब्बर अजॅक्सने त्याच्या कमरेला विळखा घालून उचलले आणि एखादा दगड फेकावा तसे सरळ जोरात फेकून दिले. एकदम घाप्पकन आवाज झाला. तरी डायोमीड लगेच उठून उभा राहिला आणि ते तिसर्यांदा भिडणार एवढ्यात नेस्टॉर म्हणाला, “लोकहो थांबा. आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही किती भारी आहात ते. उगीच ताकद वाया घालवू नका.”

मग दोघेही थांबले. त्यांनी आपापल्या कपाळीचा घाम पुसला आणि एकमेकांचे एक चुंबन घेतले. मग थेटिसने त्या दोघांना प्रत्येकी दोन अशा चार बायका भेट दिल्या. त्या चारही बायका सुंदर होत्या. त्यांच्याकडे दोघेही क्षणभर पाहातच राहिले. अकिलीसने लेस्बॉस बेटावर हल्ला केला होता तेव्हा तिकडून त्या पकडून आणल्या होत्या. त्यांना घेऊन दोघेही आपापल्या जहाजांकडे निघून गेले.

पुढचा इव्हेंट होता बॉक्सिंग!! क्रीटाधिपती इडोमेनियस उभा राहिला. बॉक्सिंगकलेत त्याचे प्रावीण्य सगळ्यांना ठाऊक असल्याने त्याला आव्हान द्यायला कोणीच उभे राहिले नाही. कोणीच च्यालेंज देईना म्हटल्यावर थेटिसने त्याला पॅट्रोक्लसचा रथ आणि घोडे भेट दिले. तेव्हा मॉर्मिडन कमांडर फीनिक्स म्हणाला,”ग्रीकहो, इडोमेनियस बॉक्सिंगमध्ये जगातभारी आहेच. त्यासाठी त्याला बक्षीस मिळालं हे ठीकच झालं, पण तुम्हा तरुण पोरांसाठी बॉक्सिंगचे अजून एक बक्षीस आहे. या पुढं! अकिलीसच्या आत्म्याला जरा बरं वाटू दे!”

तरीही कोणी पुढे येईना म्हटल्यावर नेस्टॉर उभा राहिला आणि शिव्या घालू लागला, “च्यायचे भित्रे साले! आजकालची तरुण पोरं ही अशीच! मी तरुण असताना काय बॉक्सिंग खेळायचो, एकदा एकाला सर्रळ आडवा केला होता बुक्क्या मारमारून!! अरे कुणाच्यात काही दम आहे की नाही??????”

त्या शिव्यांचा परिणाम होऊन एकजण पुढे आला. त्याचे नाव एपियस. हा प्राणी पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्सच्या वेळीही लढला होता बॉक्सिंगमध्येच. तो पुढेही येणार आहे. यानेच तो विख्यात ‘ट्रोजन हॉर्स’ बनवला होता. हाही विना आव्हानाचे बक्षीस घेऊन जाणार एवढ्यात अकॅमस नामक ग्रीक योद्धा त्याला च्यालेंज म्हणून उभा राहिला. बॉक्सिंगला लगेच तोंड फुटले. दोघेही एकमेकांना तुल्यबळ होते. बॉक्सिंग जोरात सुरु झाले. त्यांची अंगे घामाने, तर तोंडे रक्ताने निथळत होती. बैलाच्या कातड्याचे ग्लोव्ह्ज घालून दोघेही एकदम कुतून ठोसे मारत होते. घाम आणि रक्त मिसळून गालांना एक वेगळाच केशरट रंग प्राप्त झाला होता. अकॅमसने एपियसच्या भुवईजवळ पार हाडापर्यंत जाईल इतक्या जोरात एक ठोसा मारला. त्याला प्रत्युत्तर म्हणून एपियसनेही अकॅमसच्या कपाळावर ताकदीने एक ठोसा दिला. त्याच्या आघाताने तो जमिनीवर पडला.तरी अकॅमस लगेच उठला आणि त्याने एपियसला डोक्यावर एक ठोसा दिला. नंतर एपियसने आपल्या डाव्या हाताचा ठोसा सरळ भुवईवर, तर उजव्या हाताचा ठोसा अगदी जीव खाऊन नाकावर मारला. अकॅमस सटपटला, पण तरीही सावरून लढू लागला. पण एकूण रागरंग पाहून ग्रीक ओरडू लागले बास करा म्हणून. मग त्यांनी हातमोजे काढले, घाम टिपला आणि एकमेकांचे एक चुंबन घेऊन लढाई संपवली. थेटिसने त्यांना प्रत्येकाला एक चांदीचे मोठे भांडे भेट दिले आणि पॉदालिरियस नामक वैद्याने त्या दोघांवर उपचार केले.

नंतरचा इव्हेंट होता धनुर्विद्येचा. धाकटा अजॅक्स आणि थोरल्या अजॅक्सचा सावत्र भाऊ ट्यूसर हे दोघे उभे राहिले. मायसीनीराज आगामेम्नॉनने दूरवर एक हेल्मेट ठेवले आणि त्यात पिसे खोवून ठेवली. जो बाण मारून फक्त पिसांचा वेध घेऊन त्यांना हेल्मेटपासून वेगळे करेल तो जिंकेल असा साधा हिशेब होता. पहिल्यांदा धाकटा अजॅक्स सज्ज झाला. त्याने बाण मारला पण तो हेल्मेटला लागून ब्राँझचा टण्णकन आवाज झाला. मग ट्यूसरने बाण मारला तो बरोब्बर पिसाचा वेध घेऊन पलीकडे गेला. बक्षीस म्हणून थेटिसने त्याला प्रिआमपुत्र ट्रॉइलसचे चिलखत भेट दिले.

पुढच्या इव्हेंटमध्ये लोखंडाचा एक मोठ्ठा दांडा दूरवर फेकायची स्पर्धा होती. बर्याच लोकांनी प्रयत्न केला-पण फेकणे तर दूरच, कोणीही तो दांडा धड उचलूही शकले नाही. थोरला अजॅक्स मात्र पुढे आला, आणि लीलया तो दांडा आपल्या हातात पेलून त्याने दूरवर भिरकावला. मग थेटिसने त्याला अकिलीसने मारलेल्या मेम्नॉनचे चिलखत भेट दिले. ते चिलखत पाहून अन्य ग्रीकांनी आश्चर्य व्यक्त केले. मेम्नॉन स्वतःदेखील एकदम सांड होता. त्याच्या चिलखताचा साईझ अजॅक्स सोडून अजून कुणालाच आला नसता. अजॅक्सने ते चिलखत पाहिले आणि आनंदाने हसला. जणू त्याच्यासाठीच बनवले असावे असे वाटण्याइतपत ते त्याला फिट होत होते. ते चिलखत आणि तो दांडा दोन्हीही घेऊन अजॅक्स आपल्या जहाजापाशी गेला.

अजूनही बरेच इव्हेंट बाकी होते. लांब उडीच्या स्पर्धेत आगापेनॉर हा ग्रीक पहिला आला. थेटिसने त्याला सिक्नस नामक योद्ध्याचे कवच भेट दिले.

नंतर छोटा भाला ऊर्फ जॅव्हेलिन फेकण्याच्या स्पर्धेत युरिआलसने भाला इतरांपेक्षा लैच लांब फेकला. लोक म्हणू लागले, की कुणी धनुर्धारी इतक्या लांबवर बाणही फेकू शकणार नाही तितक्या लांबवर युरिआलस भाला फेकतो. मग थेटिसने त्याला चांदीचे बनलेले एक तेलाचे भांडे भेट दिले.

पुढे थोरला अजॅक्स उठून उभा राहिला, “हाय का कोण माझ्याशी कुस्ती खेळणार?” पण कोणीच पुढे आले नाही. अजॅक्सचे टरारून फुगलेले स्नायू पाहूनच लोकांना कळायचं बंद झालं. तरी लोक युरिआलसच्या नावाने चीअर करू लागले, पण युरिआलस म्हणाला, “बाकी कोणीही असता तरी ठीक होतं, पण अजॅक्सबरोबर मी लढू शकत नाही. मला जिवंत रहायचंय की बे शेवटी!!”

हे ऐकून लोक मोठ्याने हसले आणि अजॅक्सच्या अंगावर मूठभर मांस चढले. कोणीच आव्हान न दिल्याने थेटिसने त्याला दोन टॅलेंट भरून चांदी दिली. ती घेऊन तो जात असताना त्याच्या उंच्यापुर्या आकृतीकडे पाहून तिला क्षणभर अकिलीसची आठवण झाली आणि तिने एक हुंदका दिला.

पुढचा इव्हेंट होता रथांच्या शर्यतीचा. मेनेलॉस, पॉलिपोएतेस,युरिपिलस, युमेलस, थोआस हे लोक पुढे आले. रेडी-स्टेडी-गो चा नारा झाल्यावर रथांतून जे सुसाट सुटले की त्या उठलेल्या धुळीपुढे कुणालाच काही दिसेना. जणू उडावे तसे त्यांच्या रथांचे घोडे पळत होते. शर्यतीत मेनेलॉस पहिला आल्याबद्दल थेटिसने त्याला एक सोन्याचा कप दिला. थोआस आणि युरिपिलस हे शर्यतीच्या दरम्यान रथावरून पडून त्यांना जखमा झाल्या होत्या त्यांवर वैद्यबुवा पॉदालिरियसने उपचार केले.

रथांच्या शर्यतीनंतर आता एकेकट्याने घोड्यावर बसून करायच्या रेसचा इव्हेंट होता. स्थेनेलस, इतर काही जण आणि खुद्द यवनराज आगामेम्नॉन हे त्यात भाग घेऊन प्रचंड वेगाने दौडू लागले. प्रत्येकाच्या हातात चाबूक होता. लोक कधी “स्थेनेलस! स्थेनेलस!” तर कधी “आगामेम्नॉन! आगामेम्नॉन!” असे ओरडू लागले. स्थेनेलसचा घोडा बहुतेक रेस जिंकलाच असता, पण त्याला रेस ट्रॅकचा परिसर तितकासा परिचित नसल्याने तो मार्गापासून भरकटला. मग आगामेम्नॉनने रेस पूर्ण केली आणि तो पहिला आला. पण तरी शेवटीशेवटी स्थेनेलसने घोडा असा दामटवला की तो चक्क दुसरा आला!! तरी तो जरा खट्टूच होता, पहिला नंबर आला नसल्यामुळे. लोकांनी आगामेम्नॉनसोबतच स्थेनेलसचीही तोंडभरून स्तुती केली. मग थेटिसने आगामेम्नॉनला पॉलिडोरसचे चांदीचे चिलखत दिले, तर स्थेनेलसला अॅस्टेरोपाइउसचे जड हेल्मेट, दोन भाले आणि लेग-गार्ड दिले. इतर सर्वांनाही अनेक तर्हेच्या भेटी तिने दिल्या. इकडे अकिलीसचे प्रेत ट्रोजनांपासून वाचवताना झालेल्या जखमेमुळे या स्पर्धांत भाग घेता येत नसल्याने ओडीसिअस मात्र खट्टू होऊन हे सर्व पाहत होता.

जजमेंट ऑफ आर्म्स- अजॅक्स व ओडीसिअसची बाचाबाची, अकिलीसची शस्त्रे ओडीसिअसला मिळतात.

आता अकिलीसच्या स्मरणार्थ फ्यूनरल गेम्स खेळून झालेच होते. आता राहिले होते ते म्हणजे त्याच्या शस्त्रांचे वाटप. ग्रीक विश्वकर्मा असलेल्या व्हल्कन ऊर्फ हेफायस्टस देवाने बनवलेली ती जबरी ढाल, तलवार, भाला आणि कवच सर्व ग्रीकांना दिसतील अशी ठेवल्यानंतर अकिलीसची आई थेटिस म्हणाली, “अकिलीसच्या प्रेताची विटंबना रोखण्यात ज्या ग्रीकाने सर्वांत जास्ती पराक्रम गाजवला त्याने पुढे यावे! त्यालाच ही शस्त्रास्त्रे बक्षीस म्हणून मिळतील.”

असे म्हटल्याबरोबर थोरला अजॅक्स आणि इथाकानरेश ओडीसिअस हे दोघेही उठून उभे राहिले आणि आपणच सर्वांत जास्ती पराक्रम गाजवल्याचा दावा करू लागले. अजॅक्स म्हणाला, “क्रीटाधिपती इडोमेनियस, सर्वज्ञानी नेस्टॉर आणि महाराज आगामेम्नॉन या तिघांनी याचा निर्णय घ्यावा. त्या दिवशी युद्धात नक्की काय घडले, हे त्यांना ठाऊक असेल.” ओडीसिअसही म्हणाला, “यांचा निर्णय नि:पक्षपाती असेल असा मलाही विश्वास आहे.”

आता आली का पंचाईत! ग्रीकांमधील दोन सर्वांत प्रबळ योद्ध्यांमध्ये या मुद्द्यावरून फूट पडू पाहत होती. ते नेस्टॉरच्या लक्षात आले आणि तो आगामेम्नॉन व इडोमेनियसला म्हणाला, “हा तर लैच बाका प्रसंग आला आपल्यावर. आता या दोघांमध्ये जो जिंकेल त्याच्या आनंदाला पारावार राहणार नाही कारण अकिलीसची शस्त्रे त्याला मिळतील. पण जो हरेल तो आपल्यावर नाराज होईल आणि युद्धाला तयार होणार नाही. आणि त्यात परत हे दोघेही ग्रीक सेनेतील महान वीर आहेत. दोघांपैकी कुणाचीही नाराजी ओढवणे आपल्या फायद्याचे नाही. त्यामुळे मी सांगतो ते ऐका, आपण पकडून आणलेले ट्रोजन कैदी आहेत त्यांनाच करूदे हा निर्णय. म्हणजे पाहुण्याच्या काठीने साप मारल्यागत होईल.”

हा बेरकी सल्ला ऐकून आगामेम्नॉन लै खूश झाला. “लै भारी रे नेस्टॉर!! नामी शक्कल शोधून काढलीस! असेच करूया.” त्या तिघांची मसलत संपल्यावर त्यांनी जाहीर केले की हा निर्णय ते ट्रोजन कैद्यांवर सोपवतील.

यावर थोरला अजॅक्स रागाने एकदम चिडून लाल झाला आणि ओडीसिअसला म्हणाला, “हरामखोरा, तुझी लायकी काय आणि माझ्याशी बरोबरी करू पाहतोस? अकिलीस मेला तेव्हा सगळ्यांसमोर त्याचे प्रेत तूच ओढून आणलेस असा तरी तुझा दावा नाहीये ना? अरे भित्र्या, तुझी तर युद्धाला यायचीसुद्धा तयारी नव्हती. लपून बसला होतास बिळात घाबरून!! तुला ज्यानं आणलं इथं त्या पालामिदेसलाही तू कपटानं ठार मारलंस! तुझ्या अंगात शौर्य काहीच नाही, नुस्ती दगाबाजी भरलीये. तुझ्या सल्ल्यापायी फिलोक्टॅटेसला लांबवर सोडून यावं लागलं आम्हाला. (हे कॅरेक्टर नंतर येईल. हे महत्त्वाचं आहे.) युद्धात हेक्टरचा समोरासमोर सामनादेखील तू कधी केला नाहीस. त्याला घाबरलास एकदम. मी मात्र त्याचा जिगरीनं सामना केला. अरे, इतका शूर असतास तर सर्व जहाजांच्या मध्यभागी तुझं जहाज कशाला लावलंयस? जहाज जळण्याची भीती आहे म्हणून? मी मात्र अगदी एका टोकाला जहाज लावलंय माझं. कशाचीही भीती नाही मला. हा वाद लढाईच्या वेळेस झाला असता, तर माझं शौर्य बघूनच या वादाचा निकाल लागला असता. इथं मात्र लोकांना गंडवून पराक्रमी वीरांच्या मांदियाळीत जागा घेऊ पाहतोयस? अकिलीसचं चिलखत तर तुझ्या अंगालाही येणार नाही. तुझ्या कमकुवत हातांत त्याचा भालाही पेलवता येणार नाही. पण मला मात्र ते एकदम फिट्ट बसेल. युद्धात मी तुझे प्राण वाचवले होते तरी तुला त्याची आठवण नाही.
पण आपण उगीच भांडतोय कशाला? तुझा भाला घेऊन ये. काय तो कंडका पाडू एकदाचा. चल ये!!! थेटिसनं हे बक्षीस लढाईतल्या कौशल्यासाठी ठेवलंय, तोंडाची नुस्ती वाफ दवडण्यासाठी नाही.”

हे ऐकून ओडीसियस पेटला. “तू नुसताच सांड आहेस पण तुझा मेंदू गुडघ्यात आहे. नुस्ता पराक्रम घेऊन काय चाटायचाय? डोकं नसेल तर सगळं व्यर्थ आहे. इतके ताकदवान बैल असतात, पण माणूस फक्त डोक्याच्या बळावर त्यांना वेसण घालतो. माझ्या बुद्धिचातुर्यावर विसंबूनच मला ग्रीक सैन्यात घेतलं गेलं. जेव्हा बलवान योद्धे कारणाशिवाय झुंजत होते तेव्हा त्यांना मी योग्य शब्द वापरून शांत केलं. शब्दांची ताकद अपरंपार आहे. जेव्हा जेव्हा काही विशेष मोहीम काढायची असे तेव्हा तेव्हा मी कायम पुढे असायचो. माझं जहाज मी कडेला लावलं नाही ते घाबरलो म्हणून नव्हे, तर आगामेम्नॉनला मदत असावी म्हणून. तुझ्यागत वेडेपणाने एकीकडे गेलो नाही. हेक्टरलाही मी कधी घाबरलो नाही, उलट कायम लढण्यात पुढे असायचो. इतकेच नव्हे, तर वेष बदलून भिकार्याच्या फाटक्या कपड्यांत मी स्वतः धाडस करून ट्रॉयमध्ये गेलो आणि त्यांचे मनसुबे जाणून घेतले. बाकी कुणाच्यातही इतकी डेरिंग नव्हती. मला देवांनी ताकद आणि डोकं दोन्हीही दिलंय. आणि अकिलीसच्या प्रेताभोवतीच्या लढाईत तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं मीच मारलीत.”

अजॅक्स परत उत्तरला, “तू लढलास तरी अकिलिसच्या प्रेताजवळ नाही-दुसरीकडेच कुठेतरी लढत होतास. मी सर्वांचे पाय जायबंदी केले आणि पळून जाणार्यांच्या पाठीत भाले खुपसले म्हणून अकिलीसचे प्रेत वाचू शकले. ट्रोजन पळाले ते माझ्या पराक्रमामुळेच. आलाय मोठा मला सांगणारा.”

ओडीसिअस उत्तरला, “अजॅक्स, लढाई असो अथवा सल्लामसलत, मी तुझ्यापेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाही. इतर कुणाही ग्रीकापेक्षा माझी बुद्धी तेज आहे आणि ताकदही तुझ्याइतकीच आहे. पॅट्रोक्लसच्या फ्यूनरल गेम्सच्या वेळची आपली कुस्ती आठवते ना? मी तुझ्या तोडीस तोड होतो.”

अशाप्रकारे त्यांचे भांडण सुरू राहिले. ट्रोजन कैद्यांनी दिलेल्या निर्णयानुसार अकिलीसची शस्त्रास्त्रे ओडिसिअसला देण्यात आली. त्याला अतिशय आनंद झाला. मात्र अजॅक्सला प्रचंड दु:ख झाले.तो जागीच एखाद्या पुतळ्यागत उभा राहिला. त्याच्या मित्रांनी व सहकार्यांनी त्याला कसेबसे जहाजांकडे नेले.

रात्र झाल्यावर सर्व ग्रीक झोपले, पण अजॅक्सचा डोळा लागला नव्हता.

थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

अजॅक्सची हालत खराब झाली होती. झोप-जेवण-बाई यांपैकी कशाचीच शुद्ध त्याला राहिली नव्हती. अकिलीसची शस्त्रे न मिळाल्याचा अपमान त्याच्या इतका जिव्हारी लागला होता की तो रागाने नुसता पागल झाला होता. कधी त्याला वाटे की सगळ्या ग्रीकांची जहाजेच पेटवून देऊ तर कधी वाटे की तलवारीने त्या ओडीसिअसचे सगळे अवयव एकेक करून कापून काढू. त्याच तावात त्याने चिलखत चढवले, हातात तलवार घेतली आणि रागारागाने तो वाट फुटेल तिथे जाऊ लागला. त्याच्या तोंडाला फेस आला होता. एखाद्या जनावरासारखा गळ्यातून गर्जनेचा आवाज तो काढत होता. त्याचा एकूण रागरंग पाहून लोकांची भीतीने गाळण उडाली.

हळूहळू पहाट झाली. ग्रीक लोक झोपेतून जागे झाले, पण अजॅक्स त्या वेडाच्या भरातून अजून बाहेर आला नव्हता. ग्रीक सैनिक समजून तो मेंढ्यांना मारत सुटला होता. त्याने मारलेल्या मेंढ्यांच्या रक्ताने मैदान लाल झाले. लै मेंढ्या त्या वेडाच्या भरात झ्यूसला प्यार्या झाल्या. ग्रीकांना मारल्याच्या समजुतीत अजॅक्स अजूनच उन्मादात कापाकापी करत सुटला होता.

अखेर मेनेलॉस आगामेम्नॉनपाशी आला आणि म्हणाला, “भावा, अजॅक्स ठार वेडा झालाय. तो आपली जहाजे पेटवेल किंवा एकेकाला तंबूत घुसून मारेल. च्यायला, देवांची अवकृपा तरी किती असावी आपल्यावर! त्या थेटिसला तरी हे असलं बक्षीस ठेवायची गरज काय होती? आणि तो ओडीसिअसही शहाणा, आपल्यापेक्षा मोठ्या वीराशी कशाला उगीच स्पर्धा करावी?”

आगामेम्नॉन उत्तरला, “अबे अजॅक्सला नको दोष देऊ, देवच यात दोषी आहेत. साला आपलंच नशीब फुटकं.”

इकडे खँथस नदीजवळच्या झुडुपांत धनगर लोक भीतीने दडून बसले होते. मोठ्याने आरोळ्या ठोकत सांड अजॅक्स त्यांची मेंढरे मारत होता, त्यामुळे त्यांना बिचार्यांना कळायचं बंद झालं होतं. अखेरीस एक मेंढा मारून अजॅक्स त्यावर पाय ठेवून विकट हसून (तो ओडीसिअस आहे असे वेडाच्या भरात समजून) म्हणाला, “मर हरामखोरा! कुत्री आणि घारी तुझा फडशा पाडतील. अकिलीसचं कवचही तुला शेवटी वाचवू शकलं नाही तर! स्वतःपेक्षा भारी माणसाशी उग्गीच स्पर्धा केली की असंच होणार. मर तू इथंच. घरी तुला बायकापोरं भेटणार नाहीत किंवा म्हातारे आईबापही दिसणार नाहीत. तुझ्या देशापासून दूर कुत्री आणि गिधाडे तुझा फडशा पाडतील.”

पण नंतर सकाळच्या त्या उजेडात त्याला त्या अगणित मेलेल्या मेंढ्यांचे मृतदेह दिसल्याबरोबर कळून चुकले की आपण इतका वेळ रागाच्या भरात काय केले ते. ते कळाल्यावर अजॅक्स एकदम स्तंभित झाला. डोंगरात अडकलेला एखादा धोंडा असावा तसा तो जागीच उभा राहिला. एक पाऊल पुढे टाकेना की मागे येईना. मग तो स्वतःशीच शोक करू लागला, “अरेरेरेरे, देव माझा इतका तिरस्कार का बरे करतात? त्यांनी माझे डोके फिरवल्यामुळेच या गरीब बिचार्या निष्पाप मेंढ्यांना मारले मी. त्या हरामखोर ओडीसिअसचे तळपट होवो!! सर्व ग्रीक सैन्याचीही वाट लागो! लढाईतून आगामेम्नॉनला धडपणी परत न जावो! मरूदेत सगळे. जगण्यात आता राम राहिला नाही. खर्या शूर लोकांचा आता ग्रीक सैन्यात सन्मान केला जात नाही. कमअस्सल लोकांचीच चलती आहे सध्या. त्यामुळेच ओडीसिअसला अकिलीसचे कवच मिळाले. मरूदे तेच्यायला, यांच्यात रहायचंय कुणाला? मला तसेही हे लोक विसरलेत, माझे कुठलेच पराक्रम त्यांच्या लक्षात नाहीत.”

असे नानापरीचे बोलून शेवटी हेक्टरने भेट दिलेली तलवार अजॅक्सने आपल्या गळ्यात घुसवली आणि स्वतःचा प्राण घेतला. तो धराशायी झाला. जमिनीवर त्याच्या रक्ताचे पाट वाहू लागले.

अजॅक्स पडलेला पाहून ग्रीक सैन्य तिथे धावत आले. पण भीतीने कोणी त्याच्या जवळ जाईना. बर्याच जणांनी डोक्यावर माती ओतली आणि मोठ्याने विलाप करू लागले. अजॅक्सचा सावत्र भाऊ आणि प्रख्यात धनुर्धारी ट्यूसर तिथे आला. अजॅक्सला पडलेले पाहताक्षणी तलवार उपसून तोही स्वतःचे प्राण घेऊ पाहत होता, पण लोकांनी त्याचा हात आवरला. तो शोक करू लागला, “भावा, तू अचानक असा कसा वेडा झालास? ट्रोजनांना दु:खापासून दिलासा मिळावा आणि ग्रीक मरावेत अशीच ईश्वरी योजना आहे की काय कोण जाणे. आता लढाईत लढताना कुणाचेही डेरिंग राहणार नाही. संकटापासूनची ग्रीकांची ढाल आता राहिली नाही. आईबाबांना तोंड कसे दाखवू आता परत सलामीसला जाऊन? तू मेल्यावर माझीही आता हीच जागा.”

ट्यूसर रडत असतानाच अजॅक्सची गुलाम पण नंतर पत्नी झालेली टेकमेसा तिथे येऊन विलाप करू लागली. हिच्यापासून अजॅक्सला युरिसाकेस नामक पुत्रही झाला होता. सर्व बाबतींत तो बापासारखा होता. त्याचा जन्म इथेच ट्रॉयजवळ झाला होता-या शेवटच्याच वर्षात. “गुलाम असूनही तू मला राणीसारखं वागवलंस! सलामीसला परत गेल्यावर तू मला राणी म्हणून घोषित करणार होतास, पण हाय! ते आता शक्य नाही. बाळ युरिसाकेस आता पोरका झाला. बाप मेला की पोरक्या पोराचे हाल कुत्रा खात नाही. मीही आता कुणाची तरी गुलामच होईन बहुतेक. तू मेलास, माझं आता काहीच शिल्लक नाही राहिलं.”

ते ऐकून आगामेम्नॉन तिला म्हणाला, “बाई, ट्यूसर आणि मी जित्ते आहोत अजून. तुला कसल्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही एवढं लक्षात घे. तुझा पूर्वीप्रमाणेच सन्मान केला जाईल.”

अजॅक्स मेल्याचे ओडीसिअसलाही दु:ख झाले. तो म्हणाला, “ग्रीकहो, राग बहुत बुरी बला है. रागामुळेच अजॅक्स शेवटी कुणा ट्रोजनाकडून नव्हे, तर स्वतःच्याच हाताने मरण पावला. कुठे विजय मिळवावा म्हणून नाही, कुणा स्त्रीसाठी, शहर अथवा अन्य धनसंपत्तीसाठीही मी स्पर्धेत उतरलो नाही. माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न नसता तर मी स्वतःच्या हाताने ती शस्त्रास्त्रे अजॅक्सला भेट दिली असती. असे भावनेच्या आहारी जाणे योग्य नाही. शहाण्या माणसाने सर्व आघात धीराने सोसले पाहिजेत, स्वतःच्याच लोकांचा असा रागराग करू नये.”

हा शोक चालू असताना शेवटी नेस्टॉर म्हणाला, “लोकहो, आपल्या दु:खांना अंत नाही असेच दिसतेय. अकिलीस, माझा मुलगा अँटिलोखस आणि अजॅक्स हे तिघेही काही दिवसांच्या अंतराने पटापट लागोपाठच वारले. इतरही अनेक ग्रीक हेदिससदनी गेले. पण दु:ख उगाळण्यात अर्थ नाही. अजॅक्सचे अंत्यविधी बाकी आहेत अजून. ते करा चला.”

अजॅक्सचे प्रेत त्यांनी स्वच्छ धुवून जखमा आणि रक्त नीट पुसून काढले आणि त्याला नवीन वस्त्र परिधान केले. मग ग्रीकांनी इडा पर्वताहून अनेक झाडे तोडून लाकूडफाटा आणला. तो अजॅक्सच्या प्रेताभोवती नीट मांडला. भोवती त्याने मारलेल्या शत्रूंची चिलखते मांडून ठेवली. अनेक गायी व मेंढ्याही ठेवल्या. अनेक अंगरखे, अँबर रत्ने, चांदी, हस्तिदंत, आणि तेलाचे अनेक बुधले ठेवले. शिवाय बाकीही अनेक वस्तू ठेवल्या आणि मग शवास अग्नी दिला.

भडाडा अग्नी पेटला. अजॅक्सचे पार्थिव त्यात दहन झाल्यावर ग्रीकांनी वाईनने आग बुजवली. अजॅक्सची हाडे एकत्र करून एका सोन्याच्या बरणीत ठेवली आणि जवळच र्होएटियम नामक शहराजवळ एक मोठ्ठा चबुतरा बांधला. हे सर्व झाल्यानंतर ग्रीक आपापल्या जहाजांत गेले आणि रात्रीचे जेवण करून झोपायच्या तयारीला लागले. पण अजॅक्स गेल्याचे दु:ख सगळ्यांनाच झाले होते. इलियडमध्ये तर अजॅक्सचा उल्लेख कायम ‘बुलवार्क ऑफ द एखिअन्स’ अर्थात ग्रीकांची संरक्षक भिंत असाच येतो. अकिलीसखालोखाल ग्रीकांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ योद्धा होता शिवाय अकिलीसचा तो चुलतभाऊही होता. अजॅक्स मेल्याचा फायदा घेऊन ट्रोजन रात्री चढाई करतात की काय अशा चिंतेत रात्र कशीबशी पार पडली.

(अजॅक्सचे थडगे)

मी देताना क्विंटस स्मिर्नियसची व्हर्जन दिलीय पण एपिक सायकल अन अन्य संदर्भांत काही वेगळ्या व्हर्जन्सही आहेत. त्यानुसार अजॅक्सने वेडाच्या भरात दोन मेंढ्यांना आगामेम्नॉन अन मेनेलॉस समजून ठार मारले. अजॅक्सला पश्चात्ताप झाल्यावर त्याने हेक्टरने भेट दिलेली तलवार आपल्या काखेत खुपसून आरपार नेली आणि स्वतःचा प्राण घेतला. एका अल्टरनेट व्हर्जनप्रमाणे थोरल्या अजॅक्सला ट्रोजन काही करू शकत नसल्याने त्यांनी त्याला चहूबाजूंनी माती थापून हलता येईनासे केले आणि तो शेवटी अन्नपाण्याविना तळमळत मरण पावला. शिवाय प्राचीन ग्रीक कवी पिंडार याच्या मते ओडीसिअसला शस्त्रे देण्याचा निर्णय ग्रीकांनी आपापसातच गुप्त मतदानाने घेतला. पण सर्व व्हर्जन्समध्ये शस्त्रे शेवटी ओडीसिअसलाच दिली जातात-यद्यपि अ‍ॅरिस्टोफेनेसच्या एका टीकेनुसार ट्रोजन कैद्यांपैकी एक मुलगी अजॅक्सच्या बाजूने बोलत असूनही शेवटी ओडीसिअसच्या बाजूने निर्णय घेतला गेला. असे का झाले असावे? ओडीसिअसने नेहमीप्रमाणे काही बेरकीपणा करून लाच वगैरे दिली असेल काय कुणाला? शक्यता नाकारता येत नाही. मला याबद्दल शोध घेताना काही अजून तरी सापडले नाही, सापडल्यास अवश्य अ‍ॅड करेन. शिवाय पालामिदेसला लाच खाल्ल्याच्या आरोपावरून ठार मारल्याचा उल्लेख अजॅक्स-ओडीसिअसच्या बाचाबाचीत अजॅक्सकडून होतोच म्हणा.

(क्रमशः)

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | 4 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

ग्रीक एपिक सायकल- पार्श्वभूमी.

मागील भागात पाहिल्याप्रमाणे हेक्टरच्या मरणानिशी इलियड संपते, तर ट्रॉयचा पाडाव झाल्यानंतर ओडीसिअस त्याच्या घरी इथाका येथे १० वर्षांनंतर पोहोचतो तो १० कालखंड ओडिसीमध्ये आलेला आहे. पण मधल्या काळात ज्या सर्वांत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यांचे ओडिसीमध्ये अगदीच संक्षिप्त रूपात वर्णन येते. मग यांमधल्या काळासाठी अजून माहिती कुठे मिळणार? एपिक सायकल या नावाने एकत्रित प्रसिद्ध असलेली पाचसात काव्ये आहेत. आता त्यांपैकी कुठल्याही काव्याचे हस्तलिखित मिळालेले नाही, त्यामुळे आधीचे इलियड वाचून एक्साईट झालेल्यांना हा मोठा केएलपीडीच आहे. परंतु परम सुदैवाने यांचा सारांश कुणा एव्तिखियस प्रॉक्लस नामक वैयाकरणीने इ.स. दुसर्या शतकात काढलेला असल्याने सारांशरूपाने का होईना, वर्णने वाचावयास मिळतात. नंतरच्या अनेक काव्यनाटकांमध्ये जे उल्लेख मिळतात त्यांवरूनही या मधल्या सर्वांत महत्त्वाच्या पार्टची कथा थोडी रीकन्स्ट्रक्ट करता येते.

ट्रोजन युद्धाशी संबंधित जुन्या काव्यांना एकत्रितपणे एपिक सायकल असे म्हटले जाते. त्याबद्दल थोडेसे लिहिणे इथे अवश्यमेव आहे. इलियड अन ओडिसी सोडून बाकीच्या काव्यांचे रचयिते होमर सोडून दुसरे कवी आहेत. इलियड अन ओडिसी धरून एकूण काव्ये खालीलप्रमाणे:

सायप्रिआ: युद्धाची पहिली नऊ वर्षे कव्हर करते. कवी स्टॅसिनस. ११ अध्याय.

इलियडः युद्धाचे दहावे वर्ष, हेक्टरच्या मरणापर्यंत. कवी होमर. २४ अध्याय.

एथिओपिसः हेक्टरच्या मरणानंतर अॅमेझॉन पेन्थेसिलिआ आणि इथिओपियन मेम्नॉन व शेवटी अकिलीसच्या मरणापर्यंत. कवी आर्क्टिनस. ५ अध्याय.

लिटल इलियडः अकिलीसच्या मरणानंतर ट्रोजन घोडा तयार करण्यापर्यंत. कवी लेश्चेस. ४ अध्याय.

इलियू पर्सिसः ट्रॉयचा ग्रीकहस्ते झालेला विनाश. कवी आर्क्टिनस. २ अध्याय.

नोस्तोई: ट्रॉय नष्ट केल्यावर ग्रीक आपापल्या घरी परततात. आगामेम्नॉन व मेनेलॉस अनुक्रमे मायसीनी व स्पार्टाला परततात तिथपर्यंत. कवी आगियास अथवा युमेलस. ५ अध्याय.

ओडिसी: ओडिसिअस इथाकाला घरी परततो आणि त्याची राणी पेनेलॉपच्या स्वयंवरास जमलेल्या सर्वांचा मुडदा पाडतो तिथपर्यंत. कवी होमर. २४ अध्याय.

टेलेगॉनी: ओडीसिअसच्या अजून काही मोहिमा आणि त्याच्या मृत्यूपर्यंत. कवी एव्गाम्मॉन. २ अध्याय.

ही सर्व काव्ये आज फक्त प्रॉक्लसने काढलेल्या सारांशामुळे माहिती आहेत. रचनाकाल होमरच्या नंतर शेदोनशे वर्षे असावा.पण मधल्या एथिओपिस ते इलियू पर्सिस पर्यंतच्या काव्यांमधील कथाभागच मुख्य आहे यात दुमत नसावे. तस्मात नेमका हाच कथाभाग पोस्टहोमेरिका किंवा फॉल ऑफ ट्रॉय नामक तब्बल १४ बुकांचे काव्य अस्तित्वात असल्याचे नेटवर पाहताना कळाले, तेव्हा जीव भांड्यात पडला. मधल्या सर्व घटना अगदी इत्थंभूत अन सविस्तर दिलेल्या असल्याने ते वाचायला मजा आली. एपिक सायकलचा सारांश अन यात काही ठिकाणी अंतर्विरोध आहे पण त्यातल्या त्यात सुसंगत व्हर्जन लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल.

तर आता काव्याकडे जाऊ. हे काव्य सध्याच्या तुर्की देशातील स्मिर्ना नामक पश्चिम किनार्‍यावरील बंदरात राहणार्‍या क्विंटस स्मिर्नियस नामक कवीने इ.स. ३५० च्या आसपास लिहिलेले आहे.

http://www.theoi.com/Text/QuintusSmyrnaeus1.html

इथे याचे इंग्रजी भाषांतर वाचावयास मिळेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवीचे नाव लॅटिन स्टाईल असले तरी काव्य मात्र ग्रीक भाषेत लिहिले आहे. याचीही शैली उत्तम आहे. होमरची मजा यात नाही असे बरेच लोक म्हणतात पण मला तरी भाषांतर वाचताना मजा आली. अर्थात प्राचीन ग्रीक भाषा मला येत नसल्याने माझा निर्णय भाषांतरकाराच्या कौशल्यावर अवलंबून आहे हे स्वयंस्पष्टच आहे. असो.

अ‍ॅमेझॉन वीरांगना राणी पेन्थेसिलिआचा महत्पराक्रम.

हेक्टरच्या अंत्यविधीच्या वर्णनापाशी इलियड संपते तिथून पुढे हे काव्य सुरू होते. १२ दिवसांच्या सुतकानंतर त्याचा अंत्यविधी झाला, तोपर्यंत युद्ध करायचे नाही असे उभयपक्षी ठरले होते. तो कालावधी पार झाल्यावर पुढे युद्ध सुरू झाले. अकिलीसच्या पराक्रमामुळे ट्रोजनांची भीतीने गाळण उडाली होती. त्याने ट्रोजनांची कशी चटणी उडवली, नदीत घुसून कसे ट्रोजनांना मारले, हेक्टरचे प्रेत रथाला बांधून कसे सगळ्यांसमोरून फरपटत नेले, हे आठवून ट्रोजन अजूनही भीतीने थरकापत होते.

त्यातून त्यांना दिलासा मिळाला तो पेन्थेसिलिआ नामक अॅमेझॉन राणीमुळे. ती ट्रॉयमध्ये राजा प्रिआमच्या भेटीस आली आणि ट्रोजनांच्या बाजूने युद्ध करण्याचा इरादा जाहीर केला. इथे हे अॅमेझॉन नक्की काय प्रकर्ण होते ते सांगणे अवश्यमेव आहे. अॅमेझॉन हा शब्द प्राचीन ग्रीक पुराणांत फक्त स्त्रीयोद्ध्यांच्या राज्याला उद्देशून वापरला जातो. त्यांच्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. पुराणांत अनेक उल्लेख सापडतात त्यानुसार सिथिया नामक प्रांतात यांचे वास्तव्य असे. सिथिया म्हणजे काळ्या समुद्राजवळचा मध्य आशियाचा भाग समजला जातो. तत्कालीन ग्रीक जगताच्या सीमारेषेजवळ हा भाग होता. यांच्या राज्यात फक्त आणि फक्त स्त्रिया असत आणि वंशसातत्यासाठी वर्षातून एकदा त्यांची टोळी पुरुषांशी संबंध ठेवायला बाहेर पडत असे. गर्भ राहून मुलगी झाली, तर तिला वाढवले जाई आणि मुलगा असेल तर एक तर जन्मतःच त्याची हत्या तरी केली जाई किंवा गुलाम तरी बनवले जाई. काही ठिकाणी या गुलामांशीही या स्त्रिया संबंध ठेवीत असे नमूद आहे. त्यांच्याबद्दलची सर्वांत फेमस दंतकथा म्हणजे भालाफेक आणि तिरंदाजी नीट करता यावी म्हणून त्या उजवा स्तन कापून टाकत. तत्कालीन शिल्पांमध्ये मात्र असे काही दिसत नाही.

इलियडमध्येही ‘पुरुषांप्रमाणे लढणार्या’ म्हणून अॅमेझॉन योद्ध्यांचे वर्णन आलेले आहे. बहुतेक वेळेस त्या ज्ञात जगताच्या सीमारेषेवर असलेल्या दिसतात. पण तुर्की आणि अन्यत्र काळ्या समुद्राच्या आसपास जी उत्खनने झाली तिथे “कुर्गन” म्हणजेच मृतदेह पुरून त्याभोवती चबुतरे उभारले जात ते सापडले आहेत. जितकी कुर्गन्स सापडलीत त्यांपैकी किमान एकचतुर्थांश तरी स्त्री योद्ध्यांची आहेत. योद्ध्यांची आहेत असे म्हणण्याचे कारण मृतदेहासोबत धनुष्य-तलवार इ. शस्त्रे पुरलेली आहेत. त्यामुळे ग्रीक पुराणांतील दंतकथांना काहीएक आधार नक्कीच होता हे स्पष्ट होते. काही टोळ्यांमधील मातृसत्ताक रिवाजांचा उगम या अॅमेझॉन समाजात असावा असाही तर्क लढवला जातो. या विषयावर बरेच संशोधन झालेले आहे ते विकीवर आणि अन्यत्र पाहता येईलच. इंग्रजीतही त्यामुळे लढाऊ अन धट्ट्याकट्ट्या स्त्रीस ‘अॅमेझॉन’ म्हणण्याचा प्रघात आहे.

तर अशी ही थर्मोडॉन प्रदेशाची अॅमेझॉन राणी पेन्थेसिलिआ ट्रोजन युद्धात ट्रोजनांच्या बाजूने सहभाग घेण्यास आली. पण तिला असं काय नडलं होतं यायला फुकाफुकी? तर तिच्या राज्यात एकदा हरणाची शिकार करायला पेन्थेसिलिआ तिच्या बहिणी अन सहकार्यांबरोबर गेली होती. पेन्थेसिलिआने हरणावर फेकलेला भाला गफलतीने तिच्या हिप्पोलाईट नामक बहिणीला लागून ती जागीच खलास झाली. आता परत जावे तरी पंचाईत, कारण लोक म्हणणार की राज्यलोभाने पेन्थेसिलिआने आपल्या बहिणीचा काटा काढला. तिच्यासाठी तत्कालीन रिवाजानुसार प्रायश्चित्त म्हणून “सन्मानाने मृत्यू” हा एकच मार्ग उपलब्ध होता. अन युद्धात वीरगती मिळवण्यावाचून दुसरा सन्मानाचा मार्ग तो कुठला? आपल्या जवळच ट्रोजन युद्ध चाललेय हे तर तिला ठाऊक होतेच. मग आपल्या बरोबर १२ मुख्य सहकारी अन अजून सेना घेऊन ती ट्रॉयराज प्रिआमकडे आली. तिच्या बरोबर क्लोनी, पॉलिमूसा, डेरिनो, एव्हान्द्रे, अन्तान्द्रे, ब्रेमूसा, हिप्पोथो, हर्मोथो, अल्किबी, देइमाखिआ, अँटिब्रोटे अन थर्मोदोसा या मुख्य सहचारिणी होत्या.
ट्रॉयच्या रस्त्यांमधून आपापल्या रथ-घोड्यांवर मोठ्या डौलात बसून येणार्या या महिला चमूकडे सर्व ट्रोजन लोक मोठ्या आश्चर्याने पाहत होते. फुल चिलखत घातलेल्या, हातात तलवार-भाले वागवणार्या अन पुरुषासारखे ताकदवान शरीर असलेल्या पण त्याचबरोबर सौंदर्यात कुठेही कमी नसलेल्या त्या अॅमेझॉन्सना पाहून ट्रोजनांना कळायचं बंद झालं. प्रिआमने पेन्थेसिलिआचे स्वागत केले अन मेजवानी दिली, शिवाय तिला बर्याच महागड्या भेटवस्तूही दिल्या. बदल्यात तिनेही ट्रोजनांच्या शत्रूंचा नायनाट करण्याचे आश्वासन दिले. अकिलीसलाही आपल्या भाल्याने ठार मारून ग्रीकांची जहाजे पेटवते असे भरघोस आश्वासन तिच्याकडून ऐकल्यावर प्रिआम लैच खूष झाला. पण ते ऐकून हेक्टरपत्नी अँद्रोमाखी खिन्नपणे स्वतःशीच म्हणाली, “माझा नवरा हिच्यापेक्षा लाख पटीने श्रेष्ठ होता युद्धात आणि त्यालाही अकिलीसने मारला. हिचा काय घंटा पाड लागणारे त्याच्यापुढे?”

जेवण झाल्यावर पेन्थेसिलिआ झोपली. झोपेत तिचा बाप स्वप्नात येऊन तिला म्हणाला की मोठा पराक्रम गाजवशील उद्या. ते पाहून पेन्थेसिलिआ एकदम खूष झाली. आन्हिके उरकून चिलखत अंगावर चढवून उजव्या हातात एक परशू आणि डाव्या हातात भाला घेऊन ती जोषातच लढायला बाहेर पडली. तिला पाहून बाकीच्या ट्रोजन सेनेलाही स्फुरण चढले आणि तिच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्य चढाई करून येऊ लागले. पेन्थेसिलिआच्या नेतृत्वाखाली ट्रोजन सैन्य एकदम चढाई करून येताना ग्रीकांनी पाहिले आणि त्यांना एकदम आश्चर्य वाटले. साहजिकच आहे म्हणा, परवापरवापर्यंत अकिलीसाचा अ उच्चारला तरी ट्रॉयच्या भिंतीआड दडणारे ट्रोजन्स एकदम इतके चेकाळले तर चर्चा तर होणारच.

मग युद्धाला तोंड लागले आणि पेन्थेसिलिआ आणि तिच्या बरोबरच्या अॅमेझॉन सैन्याने कत्तलखाना सुरू केला.
पेन्थेसिलिआ: हिने मोलिऑन, पर्सिनूस, एलिसस, अँटिथेउस, हिप्पाल्मस, एलासिप्पस या ग्रीकांना आपल्या भाल्याने ठार मारले.
देरिनो: हिने लाओगोनस नामक ग्रीकाला मारले.
क्लोनी: हिने मेनिप्पस नामक ग्रीकाला यमसदनी धाडले.
ते पाहून पॉदार्केस नामक ग्रीक योद्धा पुढे आला आणि त्याने क्लोनीच्या ओटीपोटात भाला खुपसला. तिची आतडी बाहेर आली आणि ती मरण पावली. ते पाहून पेन्थेसिलिआ पेटली आणि तिने त्याच्या उजव्या हातात खोलवर भाला खुपसला. त्यामुळे शीर उघडी पडली आणि तीतून रक्ताचे कारंजे उडू लागले. पॉदार्केस असह्य वेदनेने कळवळला आणि थोडे अंतर मागे पळून मरण पावला.

यानंतर क्रीटाधिपती इडोमेनिअसने ब्रेमूसाच्या छातीत भाला खुपसून तिचा प्राण घेतला आणि एव्हान्द्रे व थर्मोडोसा या दोघींना मेरिओनेसने अनुक्रमे छातीत व नितंबांत भाला खुपसून ठार मारले.धाकट्या अजॅक्सने डेरिनोच्या गळा व खांद्यांमधील भागात भाला खुपसून मारले, तर डायोमीडने अक्लिबी आणि देरिमाखिया या दोघींची मुंडकी उडवली.
अॅमेझॉन सैन्य सोडूनही अन्य मारामार्या चालल्याच होत्या. स्थेनेलस नामक ग्रीकाने काबिरुस नामक ट्रोजनाला मारले. ते पाहून पॅरिस चिडला आणि त्याने स्थेनेलसवर एक बाण सोडला. स्थेनेलसने तो चुकवला आणि एव्हेनॉर नामक ग्रीकाला जाऊन लागला. एव्हेनॉर कोसळला व मेला. मेगेस नामक ग्रीक योद्ध्याने इटिमॉनस आणि हिप्पासस या दोघा ट्रोजनांचे प्राण घेतले. त्याने हे दोघे सोडूनही लै लोक मारले.

अशाप्रकारे सगळी बोंबाबोंब चालू होती. पेन्थेसिलिआवर ग्रीक योद्धे झेपावत होते आणि तिचा आवेश पाहून मागे हटत होते. ती कुणालाही आटपत नव्हती. एखाद्या सिंहिणीने गायी माराव्यात तशी ती त्यांच्यावर झेपावत होती. आपल्या घोड्यावर बसून परशू परजत ती ग्रीकांना भाल्याने असे काही मारत होती की शिशिरऋतूतील पानगळीप्रमाणे ग्रीक योद्धे पटपट मरत होते. तिने ग्रीकांना खिजवले, “कुत्र्यांनो, प्रिआमला दिलेल्या त्रासाचा पुरेपुर बदला मी घेणारे!!सगळ्यांना कोल्ह्याकुत्र्यांकडून खाववेन. कुठे गेले तुमचे योद्धे? कुठे गेला डायोमीड, कुठे गेला तो सांड अजॅक्स आणि कुठाय तो सर्वशक्तिमान अकिलीस??? एकाच्या अंगात दम नाही. थू:तिच्यायला!!”

पेन्थेसिलिआने शौर्याची कमाल चालवली होती. तिच्या शौर्याने प्रेरित होऊन ट्रोजन सैन्यानेही ग्रीकांची चटणी उडवणे सुरू केले होते. ट्रॉयच्या बुरुजांवरून तिचा व तिच्या सैनिकांचा पराक्रम पाहून पाहून तिसिफोनी नामक ट्रोजन म्हैला एकदम चेकाळली. सर्व बायकांना हाकारून म्हणाली,”पाहिलं काय त्या बायका कशा लढताहेत ते!! पुरुष झक मारले त्यांच्यापुढे. चला, आपणपण जाऊ लढायला.” असे म्हणून चिलखत वैग्रे घालून त्या बायका लढायला निघणार एवढ्यात थिअॅनो नामक ट्रोजन त्यांना म्हणाला, “बायांनो, काय मूर्खपणा चालवलाय हा आँ? हातात कधी तलवार तरी धरलीय का याआधी, चाललाय लढायला एकदम ते? त्या अॅमेझॉन बायकांचं सोडा, त्यांना रोजची सवय आहे लढायची. पुरुष काय लढेल असं लढतात त्या. त्यांच्यासाठी हे नेहमीचंच आहे सगळं. पण तुमच्या अंगात दम आहे का जरा तरी? चला गप आत जा. आणि तसेही आपलं सैन्य आज जिंकतंय, बायकांनी लढण्याजोगी परिस्थिती अजून आलेली नाही.”
थिअॅनोचे बोलणे बायकांना पटले आणि त्या ट्रॉयच्या बुरुजांवर बसून लढाई पाहू लागल्या.

अकिलीसकडून पेन्थेसिलिआचा वध.

हे सर्व चालू असताना थोरला अजॅक्स आणि अकिलीस मात्र लढाईत नव्हते. पॅट्रोक्लसच्या कबरीपाशी दोघेही दु:ख करीत बसले होते. पण पेन्थेसिलिआने ग्रीकांची कत्तल उडवली आणि ग्रीक आपापल्या जहाजांकडे पळून येऊ लागले आणि जहाजे जाळण्याइतपत ट्रोजन्स जवळ येतात तोपर्यंत थोरला अजॅक्स अकिलीसला म्हणाला, “अबे आवाज ऐकलेस काय? लै लोकांचे आवाज यायला लागलेत. काय भानगड आहे बघू चल लौकर. न जाणो ट्रोजन्स आपल्या जहाजांपर्यंत पोचले आणि जहाजे पेटवून दिली तर लोक शिव्या घालतील की आपल्या दोघांचा उपयोग काय म्हणून, तेव्हा चल लौकर.”

त्यानंतर दोघेही चिलखत घालून युद्धाला निघाले. त्यांना पाहताच ग्रीक सैन्याचे मनोबळ क्षणार्धात वाढले आणि पुनश्च नव्या जोमाने कापाकापी सुरू झाली. अजॅक्सने देइओखस आणि हिल्लस व युरिनोमस या ट्रोजनांना मारले, तर अकिलीसने आन्तान्द्रे, पॉलिमूसा, अँटिब्रोटे, हिप्पोथो, हर्मोथो या अॅमेझॉन योद्ध्यांना मारले. या दोघांना पाहताच पेन्थेसिलिआ पेटली आणि त्यांना सामोरी गेली. तिने अकिलीसवर एक भाला फेकला, पण तो त्याच्या ढालीला तटून खाली पडला. दुसरा भाला तिने अजॅक्सवर फेकून मारला आणि म्हणाली, “अरे जवळ या असे!! भिता की काय मला? तुम्ही दोघे स्वतःला कितीही मोठे समजत असला तरी मीही काही कमी नाहीये, खरेतर कुणाही पुरुषापेक्षा माझं बळ जास्तच आहे, काय समजलेत!!!”

तिची वल्गना ऐकून दोघेही तुच्छतेने हसू लागले. अजॅक्सवर फेकलेला भाला त्याच्या पायाला बांधलेल्या चांदीच्या पॅडला लागून तटला. अजॅक्सला काही झाले नाही, पण त्याने पेन्थेसिलिआचा नाद सोडला आणि अन्य ट्रोजनांमागे तो निघाला. आता अकिलीस विरुद्ध पेन्थेसिलिआ असा सामना होणार होता. अकिलीस तिला म्हणाला, ” ए मूर्ख बाई, कशाला उगीच वेडेपणा करतीयेस? माझा पराक्रम तुला ठाऊक नाही का? मी मारलेल्या ट्रोजनांच्या मृतदेहांचे ढिगारे पाहिले नाहीस काय? मरायची इतकीच घाई असेल तर ठीके.”

असे म्हणून अकिलीसने तिच्यावर एक भाला फेकला तो बरोब्बर तिच्या छातीत घुसला. लालभडक रक्त एखाद्या कारंजागत उसळले आणि पेन्थेसिलिआ कोसळली. रागाच्या भरात अकिलीसने तिच्या घोड्यालाही भाल्याने ठार मारले. अकिलीस तिला घोड्यावरून खाली ओढायच्या बेतात असताना तिच्या मनात विचार चालू होता, पुन्हा लढावे की अकिलीसपाशी अभयदान मागावे? पण काही न बोलता ती वीरगतीस प्राप्त झाली. पेन्थेसिलिआ कामी आलेली पाहताच ट्रोजन घाबरले आणि सरळ ट्रॉयच्या भिंतींमागे लपले.
मेलेल्या पेन्थेसिलिआकडे बघून अकिलीस म्हणाला,”कुत्रे खातील तुला आता फाडून! कुणी सांगितलं होतं माझ्याशी लढाई करायला?” पण त्यानंतर मेलेल्या शत्रूचे चिलखत काढून घेत असताना अकिलीसने तिचे हेल्मेट काढले आणि तो स्तब्ध झाला. पेन्थेसिलिआ तरुण आणि सुंदर होती. तिच्या चेहर्याकडे पाहताना अकिलीस तिच्या प्रेमातच पडला, भान विसरून एकटक तिकडे पाहू लागला. बाकीचे मॉर्मिडन सैनिकही तिच्याकडे पाहत होते. आपल्या बायकाही अशाच सुंदर असाव्यात, असे त्यांना क्षणभर तिच्याकडे पाहून वाटले. अकिलीसला तिला मारल्याबद्दल अतीव दु:ख झाले.

तेव्हा थर्सितेस नामक एक ग्रीक अकिलीसला चिडवू लागला, “मूर्खा, लंपटपणाचा कहर आहे हा. जरा तरी कंट्रोल करशील की नाही? वेळकाळप्रसंग काही आहे की नाही? डोकं बाजूला ठेवू नको. कोण कुठली अॅमेझॉन आणि तिच्यासाठी इतकं पागल व्हायचं कारणच काय??” हा थर्सितेस आगाऊ म्हणून प्रसिद्ध होता. इलियड बुक २ मध्येही आगामेम्नॉनला तो असाच बोलला तेव्हा ओडीसिअसने धमकी दिल्यावर मगच गप्प बसला होता.

पण इथे गाठ अकिलीसशी होती. थर्सितेसचे बोलणे ऐकून अकिलीस इतका चिडला की त्याने जोरात त्याच्या कानफडात मारली. झटका असह्य होऊन रक्त ओकत थर्सितेस जमिनीवरच कोसळला. त्याचा जबडाच बाहेर आला. ते पाहून बाकीचे ग्रीक म्हणाले, “बरी अद्दल घडली. अंगात नाही दम आणि उगीच राजामहाराजांशी पंगे घ्यायचे, मग असंच होणार.” घडवून आणला. पण अकिलीसचा राग अजूनही शमला नव्हता. “मर साल्या कुत्र्या! आपल्या कर्माने एकदाचा मेलास ते बरंच झालं.” पण डायोमीड चिडला, कारण थर्सितेस त्याचा सख्खा चुलतभौ होता. आता अकिलीस आणि डायोमीड यांच्यात भांडणे होणार इतक्यात लोकांनी समेट घडवून आणला.

आता पेन्थेसिलिआला पाहून आगामेम्नॉन आणि मेनेलॉस हे दोघेही प्रभावित झाले होते. प्रिआमकडून एक दूत आला तेव्हा त्याच्याकडे तिची आणि अन्य अॅमेझॉन योद्ध्यांच्या डेड बॉडीज सुपूर्द केल्या गेल्या. प्रिआमचा बाप लाओमेडॉन याच्या कबरीशेजारीच त्यांचे दहन करून चबुतरा उभारला गेला. इकडे ग्रीकांनीही पॉदार्केसचा अंत्यविधी केला आणि थर्सितेसची डेड बॉडी कॉमन खड्ड्यात टाकून दिली.

पॅरिस आणि पॉलिडॅमसची बाचाबाची

या भागात पेन्थेसिलिआ मेल्यानंतरचे वर्णन आले आहे. तिच्या मरणानंतर ग्रीक लोक अकिलीसची वाहवा करीत होते, तर ट्रोजनांची अवस्था अजूनच बिकट झाली होती. ट्रॉयच्या तटाबाहेर आपल्या रथातून फिरणार्या अकिलीसकडे पाहून त्यांना भीतीने कापरे भरत होते. राजा प्रिआमच्या महालात भरलेल्या महासभेत थिमोएतेस नामक म्हातारा ट्रोजन म्हणाला, “ट्रोजनांनो, मी आता हे युद्ध जिंकायची आशा सोडली आहे. आपला सर्वांत मोठा चँपियन हेक्टर होता त्याला अकिलीसने मारले. इतकी शूर पेन्थेसिलिआ राणी, पण तिलाही अकिलीसकडून मरण आले. आता आपण काय करायचं यापुढं? पळून जायचं की या निर्दय ग्रीकांपुढे अशीच लढत द्यायची? अकिलीस रणमैदानात असेतोवर आपला त्यांच्यापुढे टिकाव लागणे अशक्य आहे.”

त्यावर प्रिआम उत्तरला, “भावा, टेन्शन नको घेऊ. इथिओपियाहून मेम्नॉन आणि त्याचे अगणित काळे सैनिक आता आपल्या मदतीला येणार आहेत.
( हा इथिओपिया म्हणजेच आत्ताचा इथिओपिया-इजिप्तच्या दक्षिणेस असलेला. ग्रीक भाषेत एथिओप म्हणजे जळक्या तोंडाचा, म्हणजेच काळा.)
मेम्नॉनने मला तसं वचनच दिलंय. काही दिवसांत येतील ते. मेम्नॉन आला की आपले कष्ट संपतील, काळजी नसावी. तेवढी जरा अजून कळ काढा.”

पण पॉलिडॅमसचा त्यावर विश्वास बसला नाही. “मेम्नॉन जरी आला, आणि जरी त्याने भरमसाट वचने दिली असली आणि त्याची सेना कितीही मोठी असली तरी ते सगळे इथे फुकट मरणार आहेत. ग्रीकांचे सामर्थ्य आजपर्यंत जेवढे पाहिले त्यावरून मला असेच वाटते. ते एक असो. पण आपण इकडून पळून जाणे किंवा ग्रीकांशी मरेतोवर लढणे हे दोन्ही पर्याय अव्यवहार्य आहेत. त्यापेक्षा मी अजूनही सांगतो ते ऐका. त्या हेलेनला ग्रीकांच्या ताब्यात परत द्या. तिच्याबरोबर जितका खजिना आला होता त्याची दामदुप्पट करून त्यांना परत द्या. अख्खे ट्रॉय शहर या बयेपायी जळण्याअगोदर मी म्हणतो तसे करा. हेक्टरनेही जर माझा सल्ला तेव्हा ऐकला असता तर तो अजूनही जिवंत असता.”

यावर सर्व ट्रोजनांनी मनातल्या मनात संमती दर्शवली, पण पॅरिस व हेलेनच्या भयाने कोणी तोंड उघडेना. पण पॅरिस मात्र त्याला सर्वांदेखत शिव्या घालू लागला- साहजिकच आहे म्हणा, हेलेनपायी पागल झालेल्याकडून दुसरी अपेक्षा तरी कशी ठेवणार? “लढाईची वेळ आली की पळून जाणार्या भित्रटा, तुझ्या अंगात काही दम नाही. मी आणि बाकीचे पुरुष चिलखते चढवून लढाई करून पराक्रम गाजवू, लेकिन वो तो तुमसे ना हो पायेगा. महालात बस नुसता बुळग्यागत तू, सैन्याचे मन खच्ची करण्यावाचून तुला दुसरं येतंय तरी काय!!!”

आता मात्र पॉलिडॅमसची सटकली. चोर तो चोर आणि वर शिरजोर???? “अरे भ्याडा, पराक्रम कशाशी खातात तुला ठाऊक तरी आहे का? पराक्रम म्हणे! हाड!! तुझ्या एकट्यासाठी आम्ही सगळेच काय, अख्खे ट्रॉय शहर नष्ट झाले तरी तुला त्याची पर्वा नाही आणि वर पराक्रमाच्या गोष्टी करतोस!! घंट्याचा पराक्रम.”
हा बाण मात्र पॅरिसच्या वर्मी लागला. सदसद्विवेकबुद्धी जागृत होऊन त्याच्या हट्टापायी ट्रॉयला सहन कराव्या लागलेल्या हालांची आठवण झाली आणि काहीच न बोलता तो गप्प बसला.

इथिओपियन योद्धा मेम्नॉनचे शौर्य आणि उच्च नैतिक संस्कार आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखसचा मृत्यू

पण त्यानंतर लगेच काही दिवसांतच मेम्नॉन त्याची सेना घेऊन आला. ती सेना लै मोठी होती आणि स्वतः मेम्नॉनदेखील भलादांडगा होता. ट्रॉय शहरात प्रवेश करणार्या इथिओपियन सैनिकांना पाहून ट्रोजनांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रिआमला मेम्नॉन भेटल्यावर हाय-हॅलो झाले अन भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. मेम्नॉनने इथिओपियाहून ट्रॉयकडे येतानाच्या प्रवासाची कहाणी साद्यंत प्रिआमला सांगितली. त्याने पाहिलेल्या विविध देशांची व टोळ्यांची वर्णने, तसेच गाजवलेले पराक्रम ऐकून प्रिआम एकदम सुखावला. त्याने मेम्नॉनला एक वाईन प्यायचा कप भेट दिला आणि म्हणाला, “आयला तू तर लैच जबरी दिसतोयस. ग्रीकांची चटणी उडवशील यात काही शंका नाही.”
मग मेम्नॉनबरोबर सर्व सैन्याला प्रिआमने मेजवानी खिलवली. प्रिआमने दिलेला सुरेख नक्षीवाला कप हातात घेऊन निरखून बघत मेम्नॉन म्हणाला, “उगीच भरमसाट वचने देत बसत नाही आता. मी जरा जेवून झोपायला जातो. जास्त वाईन प्याली आणि जागरण केलं की शरीरातली ताकद नष्ट होते. प्रत्यक्ष लढाईत जे होईल ते खरे. लढाईच निर्णय करेल माझ्या पराक्रमाचा.”

मेम्नॉनचा हा नम्रपणा पाहून प्रिआमला सुखद आश्चर्य वाटले. मेम्नॉन तसा लै संस्कारी होता. “यथेच्छसि तथा कुरु |” असे म्हणून दोघेही आपापल्या शामियान्यात झोपायला गेले. बाकीची सेनाही विश्रांती घ्यायला पांगली.

दुसर्या दिवशी पहाट झाल्याबरोबर सगळे ट्रोजन्स आणि इथिओपियन्स उठले. आन्हिके वगैरे उरकून चिलखते चढवून लढाईला तयार झाले. काळ्या इथिओपियन लोकांमुळे ट्रॉयच्या दरवाजांतून जणू काळे ढगच बाहेर यावेत तसे दिसत होते. ट्रॉयसमोरचे मैदान त्यांनी लगेच भरून गेले.

ते पाहून ग्रीकांना आश्चर्य वाटले. आत्ताच तर कुठं ती अॅमेझॉन राणी मेली होती, आणि इतकी आर्मी कुठून आली? पण थोड्याच वेळात ग्रीकही तयार झाले. ग्रीक सेनेच्या अग्रभागी अकिलीस आपल्या रथात बसून निघाला. लगेच लढाईला तोंड लागले.

ग्रीक अन ट्रोजन लोक एकमेकांवर कोसळू लागले. पण आज पराक्रमाची कमाल केली ती इथिओपियन सेनेने. भालाफेक अन रणगर्जनांनी वातावरण भरून गेले. आज पहिले बळी अकिलीसच्या नावावर होते. थॅलियस आणि मेन्तेस या दोघा ट्रोजन सेनापतींना आणि त्यांच्यासोबत अनेक सैनिकांना त्याने आपल्या भाल्याने हेदिससदनी धाडले. ट्रोजनांची एक फळी अकिलीसच्या हल्ल्यापुढे लगेच कोलमडली.

इकडे मेम्नॉनदेखील फुल्ल फॉर्मात होता. छातीत भाला खुपसून फेरॉन आणि एरेउथस या दोघा ग्रीकांना त्याने ठार मारले. ते पाहून नेस्टॉरपुत्र अँटिलोखस चिडला आणि त्याच्यापुढे आला. अँटिलोखसने नेम धरून मेम्नॉनच्या एका इथिओपियन सहकार्याला ठार मारले. ते पाहून मेम्नॉन अँटिलोखसच्या जवळ आला. एक मोठा धोंडा उचलून अँटिलोखसने मेम्नॉनच्या डोक्यावर आपटला, पण दणकट मजबूत हेल्मेटमुळे मेम्नॉन बचावला. त्याला झाले काहीच नाही, फक्त हेल्मेटला धोंडा आदळून खण्ण्ण्ण्णकन आवाज झाला. मग मेम्नॉनने अतिशय खवळून जाऊन अँटिलोखसच्या छातीत भाला खुपसला आणि त्याला ठार मारले.

आपला मुलगा रणभूमीवर पडल्याचे पाहून नेस्टॉर अतिशय दु:खी झाला. थ्रासीमिदेस नामक आपल्या दुसर्या मुलाला हाकारले, “थ्रासीमिदेस!!! लौकर इकडे ये. तुझा भाऊ पडलाय इकडं, त्याचा बदला घे! नाही आलास तर तू माझा मुलगाच नाहीस!!”

ते ऐकून थ्रासीमिदेस धावत लढाईत पुढे आला. फेरेउस नामक योद्धा त्याच्या मदतीला आला आणि ते दोघे मेम्नॉनचा सामना करायला पुढे गेले. पॉलिम्नियस नामक ट्रोजनाला फेरेउसने मारले, तर लाओमेडॉन नामक ट्रोजनाला थ्रासीमिदेसने लोळवले. सोबत स्वतः वृद्ध नेस्टॉरही मेम्नॉनचा सामना करायला पुढे आला इतक्यात मेम्नॉन त्याला म्हणाला, “हे वृद्ध राजा, तू माझ्यापेक्षा वयाने लै मोठा आहेस. मी तुझ्याबरोबर लढलो तर तो बरोबरीचा सामना तर होणार नाहीच, शिवाय मला लाज वाटेल. मला माझ्या तोडीच्या योद्ध्याशी युद्ध करूदे. अगदी अनिर्वाहपक्ष म्हणून मी तुला मारण्याच्या अगोदर तू मागे जा कसा!” कापाकापी आणि संधिसाधूपणाच्या कहाण्यांनी भरलेल्या या ट्रोजन युद्धात असे सुसंस्कृत क्षण बाकी विरळाच.

मेम्नॉनचे वक्तव्य ऐकून नेस्टॉरने परत जरा टिवटिव केलीच-“माझ्या वयाकडे पाहू नको, अजूनही माझ्यात बराच दम आहे” इ.इ.इ. पण शेवटी थ्रासीमिदेस, फेरेउस आणि इतरांना घेऊन मागे हटला. हेलेस्पाँट खाडीकडे तोंड करून मेम्नॉन आता ग्रीकांची चटणी उडवण्यात मग्न झाला. त्याला हळूहळू लढाईचा ज्वर चढत होता. त्याचे खंदे सहकारी अल्किओनेउस, निखियस, मेनेक्लस, क्लिडॉन, अॅलेक्सिप्पस हेही त्याला समर्थ साथ देत होते. मागे हटता हटता नेस्टॉरने मेनेक्लसला ठार मारले. ते पाहून मेम्नॉन चिडून ग्रीकांचे शिरकाण करू लागला, त्याने ग्रीक सैरावैरा पळू लागले.

शेवटी नेस्टॉरने अकिलीसची मदतीसाठी याचना केली. “अकिलीस, माझ्या पोराला मेम्नॉनने मारला रे!! त्याचं प्रेत कुत्र्यांनी खाण्याअगोदर त्याचा बदला घे.” अँटिलोखस मेला हे ऐकून अकिलीसला लै दु:ख झाले आणि तो इतर ट्रोजनांचा पाठलाग सोडून सरळ मेम्नॉनसमोर आला.

अकिलीस-मेम्नॉन युद्ध, मेम्नॉन मरण पावतो.

अकिलीस विरुद्ध मेम्नॉन ही लढाई अख्ख्या ट्रोजन युद्धात भारी आहे. अतिशय गाजलेल्या हेक्टर-अकिलीस फायटीपेक्षा हिचे वर्णन जबराट आहे. अकिलीसला इतकी टफ फाईट अजून कोणीच दिली नव्हती.

मेम्नॉनने एक भलामोठा धोंडा हातात घेऊन अकिलीसवर फेकला, तो त्याने ढालीवर अडवला. अकिलीसने मेम्नॉनच्या उजव्या खांद्यात भाला खुपसून जखम केली, पण त्यातून लगेच सावरून मेम्नॉनने अकिलीसच्या हाताला भाला भोसकून रक्त काढले! आणि त्यानंतर म्हणाला,”लै बढाई मारत होतास नै रे अकिलीस? तू इथून जित्ता परत जाणार नाहीस, माझ्याकडून मरशील. ट्रोजनांची इतक्या निर्दयपणे कत्तल करून तू काय लै भारी झालास वाटलं काय तुला? मूर्ख कुठला! मीही देवपुत्र आहे. तू आता मरणार हे नक्कीच!”

अकिलीस खवळून उत्तरला, “अरे ए, डोक्यावर पडलायस काय? तुझ्यापेक्षा हजारपटीने भारी आहे मी. मला च्यालेंज देण्याची तुझी हिंमत झालीच कशी? हेक्टरने माझ्या भावाला-पॅट्रोक्लसला मारले तेव्हा त्याचा बदला त्याला मारून मी घेतला. माझा मित्र अँटिलोखसला तू मारलंस, त्याचाही बदला मी नक्कीच घेणार! तुझ्या छातीत मी भाला खुपसणार हे नक्कीच!! पण ते सोड. मूर्ख पोरांसारखं आपण आपल्या वडिलांची कीर्ती आणि खानदानाची माहिती का सांगतोय? काळच ठरवेल काय होईल ते.”
लढाईला पुन्हा तोंड लागले. दोघांनी आपापल्या तलवारी उपसल्या आणि एकमेकांवर झेपावले. दोघांनाही कधी खांद्यांवर, कधी ढालींवर तर कधी छातीवर असे सतत घाव लागत होते.

बराच वेळ त्यांची आपसांत लढाई सुरू होती. कधी दगडधोंडे तर कधी तलवारींनी त्यांचे घणाघाती युद्ध सुरू होते. दोघांनीही मारलेल्या सैनिकांच्या प्रेतांनी पूर्ण रणभूमी भरून गेली. अखेरीस मेम्नॉनच्या बरगडीच्या खालच्या बाजूस अकिलीसची तलवार आत घुसली आणि महापराक्रमी मेम्नॉन कोसळला. त्याचे इथिओपियन सहकारी भयाने गार झाले. मृतांचे चिलखत चोरून मॉर्मिडन सैनिक आणि त्यांच्यासोबत अकिलीस ट्रोजनांवर झेपावले. ट्रोजन पळू लागले. मेम्नॉनचे प्रेत घेऊन इथिओपियन लोकही पळाले.
तोपर्यंत सूर्यास्त झाला होता. मेम्नॉनसाठी त्याचे इथिओपियन सहकारी आणि ट्रोजन्स विलाप करीत होते, तर अँटिलोखससाठी ग्रीकही शोक व्यक्त करीत होते. मेम्नॉनचे थडगे बांधून झाल्यावर इथिओपियन्सही परत गेले असावेत. कवी क्विंटस म्हणतो त्याप्रमाणे त्या विलाप करणार्या सर्वांचे पक्ष्यांत रूपांतर झाले.

अकिलीसचा पॅरिसकडून वध

नेस्टॉरच्या सेनेतले लोक मरण पावलेल्या अँटिलोखससाठी शोक करीत असताना अकिलीस तिथे उभा होता. सूडाच्या भावनेने त्याचे शरीर पेटले होते. तो ट्रोजनांवर झेपावला. सिमोइस आणि खँथस या ट्रॉयच्या दोन्ही बाजूंनी वाहणार्या दोन्ही नद्यांचे पाणी त्याने मारलेल्या माणसांच्या रक्ताने लाल झाले. घाबरून ट्रोजन सैरावैरा पळत सुटले. अगदी तटबंदी व दारांपर्यंत जाऊन त्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. दारांच्या बिजागर्या हलवून खिळखिळ्या करणे आणि आडण्यांवर धडका देण्याचा देखील त्याने सपाटा लावला!! जर त्याने एखादे जरी दार तुटले असते तर अख्ख्या युद्धाचा निकाल तेव्हाच लागला असता, पण ट्रोजनांच्या सुदैवाने तसे काही झाले नाही.

ते पाहून ट्रॉयचा संरक्षक देव अपोलो तिकडे आला आणि अकिलीसला म्हणाला, “ट्रोजनांपासून मागे हट. ते माझ्या संरक्षणाखाली आहेत.”

यावर अकिलीस चिडून उत्तरला,”त्या उर्मट ट्रोजनांचे संरक्षण कशाला करतोस? तू सांगितलंस म्हणून मी काही मागे हटणार नाही. आता गप घरी जा नैतर देव असलास तरी मार खाशील माझ्याकडनं.” आणि तसाच इतर ट्रोजनांचा पाठलाग करू लागला.

यावर अपोलो म्हणाला, “साला हा अकिलीस फारच उर्मट आहे पण डोक्यावर पडलेला आहे. पण हा आता लौकरच मरणारे, त्याला त्यापासून स्वतः झ्यूसही वाचवू शकणार नाही.”

त्यानंतर पॅरिसने लपून अकिलीसच्या घोट्यात बाण मारला. काही व्हर्जन्सप्रमाणे स्वतः अपोलोनेच बाण मारला. ते काही असो, पण अकिलीसला बाण मारणाराने भ्याडपणे लपून बाण मारला होता एवढे नक्की. बाण लागताक्षणी असह्य वेदनेने कळवळत अकिलीस खाली कोसळला. सगळीकडे नजर टाकत, डोळ्यांवाटे आग ओकत ओरडला:
“कोण बाण मारला मला त्यानं पुढं यावं फक्त एकदा. क्षणार्धात भाल्याने त्याची आतडी बाहेर जमिनीवर लोळवतो..समोरासमोर माझ्याशी लढायची कुणाचीही लायकी नाही. सगळे एकजात भित्रट आहेत. बाण मारणार्यानं फक्त पुढे यावं. ऑलिंपस पर्वतावरच्या देवांपैकी कुणी असला तरी चालेल. खरं तर मला शंकाच येतेय की अपोलोनेच माझा घात केलाय. माझ्या आई थेटिसनं सांगितलं ते खरंच होतं तर- ट्रॉयच्या स्कीअन दरवाजासमोर मी दयनीयपणे मरेन म्हणून.”

असे म्हणून त्याने असह्यपणे दुखत असूनही त्याने घोट्यातून बाण उपसून काढला. अकिलीस जखमी झाला तरी भीतीने ट्रोजन्स त्याच्या जवळ यायला घाबरत होते. तसाच तो पुन्हा उठून उभा राहिला आणि हळूहळू अंगात भिनलेल्या विषामुळे सामर्थ्य कमी कमी होत असतानाही त्याने भाला फेकून ऑरिथाऑन नामक ट्रोजनाच्या कपाळात भाला खुपसून त्याच्या मेंदूचे तुकडेतुकडे केले. हिप्पोनूस नामक ट्रोजनाच्या भुवईखाली भाला खुपसून आतपर्यंत आरपार नेला. डोळ्यांची बुबुळे जमिनीवर कोसळून हिप्पोनूस हेदिसघरी गेला. अल्काथूस नामक ट्रोजनाची जीभ दुभंगून जबड्यात भाला खुपसून त्याला ठार मारले. भाला शेवटी त्याच्या कानातून बाहेर डोकावू लागला.

लै ट्रोजन्स अकिलीसच्या अंगावर धावून आले. जितके चढाई करून आले त्यांपैकी बर्याच जणांना तर त्याने मारलेच, शिवाय पळून जाणार्यांपैकीही अनेकांना कंठस्नान घातले.
पण शेवटी त्याचे शरीर थंड पडू लागले. तरीही भाल्याचा आधार घेत त्याने गर्जना केली, “ट्रोजन भित्रटांनो, मेल्यानंतरही माझ्या भाल्यापासून तुमची सुटका नाही. या विनाशाची किंमत तुम्हांला पुरेपूर चुकती करावी लागेल!!!”

हे ऐकून अकिलीस अजूनही फिट आहे असे वाटून ट्रोजन्स घाबरले. शेवटी एखाद्या पर्वताचा कडा जमिनीवर आदळावा तसा अकिलीस जमिनीवर कोसळला आणि गतप्राण झाला. तो मेल्यावरही आत्यंतिक भीतीपोटी एखादा सिंह मेल्यावर जशी मेंढरे इ. जवळ येत नाहीत तसेच ट्रोजन सैनिकही त्याच्या जवळ येत नव्हते.

अकिलीस पायात बाण लागून कसा मेला याबद्दलची सर्वांत प्रसिद्ध कथा म्हणजे त्याची आई थेटिसने लहानपणी त्याला स्टिक्स नामक नदीत बुडवले होते-फक्त टाचा-घोटे वगळता- त्यामुळे त्याचे अख्खे शरीर अभेद्य झाले होते. फक्त टाच हा एकच कमकुवत भाग राहिला होता. तस्मात एखाद्या गोष्टीचा/माणसाचा एकच पण घातक ठरणारा वीक पॉइंट असेल तर त्याला ‘अकिलीस हील’ असे म्हणावयाचा प्रघात आहे. हा वाक्प्रचार इंग्लिशमध्ये प्रसिद्ध आहे.

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा