आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f-१) आढावा

इतिहास म्हणजे या ना त्या कारणाने वेळोवेळी फुटणाऱ्या बॉम्बगोळ्यांनी व्यापलेले कुरुक्षेत्रच  जणू. अलीकडे तर कधी कोणत्या मुद्द्यावरून वाद , वितंडवाद आणि दहशतवाद फोफावतील, हे सांगणे कठीणच आहे. मग काल कोणताही असो , प्रदेश कोणताही असो. युरोपात पाहिले तर लोक  चेंगीज खान , अरब यांच्या नावाने बोटे मोडतात , ज्यू हिटलरला शिव्या घालतात. आफ्रिका आणि वसाहतवादाच्या जोखडातून नुकतेच मुक्त झालेले कोणतेही देश युरोपच्या नावाने खडे फोडतात .  भारतात तर असे बॉम्बगोळे  किती आहेत कुणास ठाऊक. पण या सर्व स्फोटकांचा बाप म्हणजे सो-कॉल्ड आर्यन इन्व्हेजन थेअरी . या सिद्धांतावरून जितका कंठशोष झाला, तितका अजून कोणत्याही मुद्द्यावरून झाला नाही . तस्मात या आणि अजून काही लेखांमधून याचा एक अति-अति धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आहे .

हा सिद्धांत पुढे करून १९व्य शतकात ब्रिटीश लोकांनी आपल्या साम्राज्यवादाला नैतिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुल्यांनी हा सिद्धांत वापरून आर्य हे बाहेरचे उपरे असून त्यांनी आधीच्या अधिक प्रगत अशा मूलनिवासी  द्रविड लोकांना पराभूत केले , असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला . बहुजनसमाजाला पारंपारिक हिंदू धर्मापेक्षा एक वेगळी ओळख देण्याचा हा प्रयत्न होता. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी   या सिद्धांताचा उहापोह “who were the shudras?”  या पुस्तकात केला आणि फुल्यान्प्रमानेच  मत दिले. तामिळनाडूमध्ये हा सिद्धांत वापरून सो-कॉल्ड द्रविडपणाला चेतविण्याचा प्रयत्न केला गेला. आजदेखील काही तथाकथित आणि पोकळ बहुजनसमाजवादी लिखाणात या सिद्धांताची मढी उकरून हवी तशी सजविली जातात.अर्थात आर्यन इन्व्हेजन थेअरी हा आर्य संकल्पनेचा एक भाग आहे. ती संकल्पना वापरून हिटलरने जो दंगा केला, तो महशूर आहे . “white man’s burden” हादेखील असाच एक रद्दी सिद्धांत आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी .

मुळात हा सिद्धांत काय आहे? हा सिद्धांत असे सांगतो , की सुमारे १५०० इ.स .पू. या वेळी भारतात आर्य नामक लोक बाहेरून आले, त्यावेळी भारतात असलेल्या द्रविडीय लोकांना त्यांनी हळूहळू आपले गुलाम बनवले, आणि आपला वरचष्मा भारतावर प्रस्थापित केला . आर्य लोकांचा वंश द्रविड लोकांपेक्षा वेगळा होता , त्यांची भाषा देखील वेगळी होती .

तर हा सिद्धांत कोणी सर्वात आधी मांडला? याचे उत्तर देण्या आधी मुळात या सिद्धांतामागील पार्श्वभूमी थोडीशी समजावून घेऊ. १८व्य शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटीशांची भारतावरील पकड बर्यापैकी मजबूत होऊ लागली आणि बरेच युरोपियन्स भारतात येऊन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करू लागले . त्याची परिणती म्हणजे “indology” ही शाखा होय. सर विलियम जोन्स हे त्यातील एक अग्रगण्य नाव आहे . संस्कृत चा अभ्यास करून त्यांनी आधीच्या लोकांनी केलेल्या तर्काला पुष्टी दिली, की संस्कृत, ग्रीक आणि लातिन या ३ भाषांची पूर्वज भाषा ही एकच होती. त्यामुळे भारत आणि युरोप यांचे सांस्कृतिक आजेपणजे एकच असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याचीच परिणती म्हणजे वरती सांगितलेला हा सिद्धांत होय . max  मुल्लर , जॉन मुइर आणि इतर अभ्यासकांनी हा सिद्धांत पहिल्यांदा मांडला.

आता या सिद्धांतातील तथ्य आणि मिथ्य दोन्ही तपासून पाहू . विलियम जोन्स हा संस्कृत भाषेचा पहिला प्रसिद्ध अभ्यासक संस्कृत बद्दल असे म्हणतो , की संस्कृत ही ग्रीक आणि लातिन यापेक्षा बाहेरून वेगळी असली तरी त्यांचे व्याकरण आणि साधारण ढाचा बर्यापैकी सारखा आहे आणि हा सारखेपणा इतका आहे , की या तीनही भाषांची मूळ भाषा १ च असावी . त्या भाषेला तो “proto-indo-european” असे म्हणतो. इतकेच नाही , तर पारशी लोकांच्या अवेस्ता नामक धर्मग्रंथातील पर्शियन भाषा आर्ष संस्कृतशी खूपच मिळतीजुळती आहे. हे झाले भाषिक पुरावे . कधीकाळी आर्य लोक हे भारताबाहेर होते याला काय पुरावा? इराणमधील प्राचीन  संस्कृती ही आर्य संस्कृतीशी मिळतीजुळती होती, पण त्यापुढे काय? पण तुर्की मध्ये बोगोझ-कोई नामक ठिकाणी मितान्नी   साम्राज्यामधील तुशारात्त राजाने इजिप्त च्या अमेनहोतेप तिसरा या राजाबरोबर केलेला  शांतता करार मिळाला क्युनिफोर्म लिपीत लिहिलेला मिळाला आहे . त्यात वरुण यांसारख्या स्पष्टपणे आर्यन / वैदिक देवतांना साक्षी मानले आहे . या कराराचा काळ आहे इ.स.पू . १४००   . ह्यावरून असे सिद्ध होते की भारताबाहेर देखील आर्य संस्कृती प्राचीन काळी पसरलेली होती.

पण मग द्रविड लोकांवरील त्या तथाकथित हल्ल्याचे काय? आर्य हे हल्लेखोर होते , असे म्हणणार्यांच्या मताला पुष्टी देणारा एकच अप्रत्यक्ष पुरावा आहे, तो म्हणजे पाकिस्तान मधील बलुचिस्तान भागात आजही सुमारे २२ लाख लोक बोलत असलेली ब्राहुई ही भाषा होय. जरी शब्दसंपदा अलीकडच्या काळात उर्दू फारसीने प्रभावित असली तरी व्याकरण इत्यादी प्रकारे तपासू गेलो तर ती एक द्रविड भाषा आहे , असे सर्व भाषातज्ञ म्हणतात. बाकी सर्व द्रविड भाषा दक्षिण भारतात आणि हीच एकटी उत्तरेत कशी काय? नक्की उत्तर कुणालाच माहित नाही. पण यावरून स्थलांतर हे एकच तर्कशुद्ध उत्तर निघते.

आता हा पुरावा असे सूचित करतो, की भाषेचे कदाचित स्थलांतर झाले असावे. पण मग तथाकथित आर्य वंशाचे काय? तर २००५ साली National DNA analysis centre, Kolkata , Oxford university zoology dept. ani Estonian biocentre या संस्थांमधील संशोधकांनी भारतामधील ३२ भटक्या जमाती आणि ४५ (नेहमीच्या) जाती यांमधून हजारो लोकांचे डी एन ए तपासले आणि निष्कर्ष काढला की सुमारे गेल्या ४०००० वर्षात तरी उत्तरपश्चिम भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे कोणतेही उल्लेखनीय  स्थलांतर झालेले नाही . कुणाला हवे असल्यास त्याची पीडीएफ माझ्याकडे आहे. त्यामुळे वंशाचा मुद्दा तरी निकालात निघाला .

भारतीय संस्कृतीचा सध्या ज्ञात असलेला सर्वात जुना अवशेष जी हडप्पा संस्कृती, ती आर्य  की द्राविडी? हडप्पा संस्कृती ही आर्य नाही , असे म्हणणार्यांचा भर कायम घोडे आणि त्याशी निगडीत असलेल्या रथ आणि इतर गोष्टींशी असतो. त्यामुळे घोड्यांचा  उल्लेख असणे म्हणजेच आर्यपणाचे लक्षण आहे का? आता “आर्य /वैदिक” संस्कृतीशी निगडीत असलेला सर्वात जुना ग्रंथ जो ऋग्वेद , तो याबद्दल काय सांगतो? त्यात घोड्याचे उल्लेख आहेत , परंतु निव्वळ घोडाच नाही , तर बैल , गायी यांनादेखील महत्वाचे स्थान आहे. आता एक fact म्हणजे घोडा हा प्राणी मुळात भारतातील नाहीच. इ स पू २००० पूर्वी अश्वपालनाचे उदाहरण दक्षिण आशिया मध्ये सापडलेले नाही. तर एक गोष्ट नक्की , की घोडा हा प्राणी बाहेरचा आहे. पण मग हडप्पाचे  काय? निव्वळ  घोडा नसणे हे  द्रविडपणाचे लक्षण कशावरून?  ज्या अर्थी ऋग्वेद आणि जुन्यातील जुनी उपनिषदे सरमा-पणी यांसारख्या कथा रंगवून सांगतात आणि त्या कथा गाईंच्या  चोरीबद्दल आहेत , त्या अर्थी ती आर्य संस्कृतीची अतिशय जुनी अवस्था आहे , आणि हडप्पादेखील तसे असण्याची शक्यता आहे. अर्थात हे सगळे अवलंबून आहे ते हडप्पाच्या चित्रलिपीच्या सर्वमान्य अशा वाचनावर . तोपर्यंत आर्य आणि द्रविड या दोन्हीही पक्षांना मूग गिळून बसणे भाग आहे.

तर सारांश असा , की घोडा भारतात बाहेरून आला आणि काही प्रमाणात भाषिक स्थलांतर झाले .पण मग संस्कृत भाषा ही मूळ भारतातील आहे की नाही? द्राविडी भाषांचे भारतीयत्व निर्विवाद आहे, तर खरी “भारतीय भाषा ” कोणती?   S R Rao  या संशोधकांनी संस्कृतवर आधारलेले त्यांचे वाचन मांडले १९९२ साली , पण ते मान्यताप्राप्त नाहीये . जोपर्यंत हडप्पा बोलत नाही, तोपर्यंत आर्य आणि द्रविड ह्या दोन्हीही पक्षांना आपापला प्राचीनतेचा दावा पुढे रेटता येणार नाही.

इत्यलम!

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत. Bookmark the permalink.

13 Responses to आर्य आणि अनार्य : एक धावता (अगदी f-१) आढावा

 1. Mr WordPress म्हणतो आहे:

  Hi, this is a comment.
  To delete a comment, just log in, and view the posts’ comments, there you will have the option to edit or delete them.

 2. Kshipra म्हणतो आहे:

  Ati jast divasani vachalyane cmnt karavi ka? Pan karatech! Factual mistake bogozkoi var agni naiye, itar char dev ahet! Baki ek ajun purava, human genome projectnantar he siddh ki bharatiyancha genepool ekach ahe, arya dravid vagere bhangad nai

 3. निखिल पुजारी म्हणतो आहे:

  अतिशय उत्तम ब्लॉग. अभिनंदन.
  प्राचीन भारतीय इतिहास, सिंधू सरस्वती संस्कृती/ वैदिक संस्कृती हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. हा लेख आवडला. काही सूचना व माहिती नोंदवू इच्छितो.
  वस्तुत: आर्यन आक्रमणाच्या सिद्धांताला पहिला सुरुंग लावला तो आंबेडकरांनीच. त्यामुळे आंबेडकर आणि फुले या दोघांची मते या बाबतीत सारखी होती असे म्हणता येणार नाही. “Who were the shudras” पुस्तकामध्ये त्यांनी या आर्य नावाच्या लोकांचे/वंशाचे अस्तित्व आणि आणि त्यांचे भारतामध्ये झालेले तथाकथित आगमन/आक्रमण या दोन्हीची पुरेपूर वासलात लावली आहे. त्यांचे तर्क आणि पुरावे हे आजतागायत या सिद्धांताला असणाऱ्या आक्षेपांचे आधार आहेत. मी त्यावर एक सविस्तर लेख – मूळ पुस्तकातील quotations सहित लिहिलेला आहे.
  http://aamhikon.blogspot.com/2009/04/refuting-aryan-theory.html
  आर्यन आक्रमणाचा सिद्धांत इतके दिवस टिकून राहिला यामागे अनेक राजकीय/सामाजिक कारणे आहेत. पण indology/anthropolgy/archeology चे सध्याचे गंभीर अभ्यासक आता या सिद्धांतावर बिलकुल विश्वास ठेवत नाहीत. आर्य नावाचा एक विशिष्ट वंश अस्तित्वात होता हि संकल्पनाच आता कालबाह्य झालेली आहे.
  अनेक संशोधनामधून हे हि सिद्ध झालेले आहे कि इस.पू दुसर्या सहस्रकात भारतामध्ये बाहेरून लक्षणीय संख्येने कोणतेही लोक आलेले नाहीत. ना त्याचे जनुकीय पुरावे मिळतात, ना पुरातात्विक. भारतीय लोक प्रामुख्याने एकाच वंशाचे आहेत, खरेतर भारतीय वंश हा जगातील इतर ढोबळ मानव वंशांच्या बरोबरीने स्वतंत्र असा वंश आहे. ऋग्वेदाला भारत सोडून कोणतीही दुसरी भूमी माहिती नाही. वैदिक साहित्याला पश्चिमेकडून पूर्वेकडील कोणताही प्रवास माहिती नाही, या उलट पूर्वेकडून पश्चिमेकडे लोक गेल्याचे काही स्पष्ट निर्देश आहेत. सरस्वती नदी हा एक महत्वाचा आधार आहेच.

  आता प्रश्न राहतो तो proto-indo-european भाषेचा आणि त्याच्याशी निगडीत संस्कृतीचा. त्याचा प्रसार कसा झाला हे सांगण्याकरता एक निराळा सिद्धांत आकार घेतो आहे. तसा तो AIT इतकाच जुना आहे. त्याचे नाव आहे Out of India (OIT). Shrikant Talageri यांचे Rigveda and the Avesta: The final Evidence हे OIT वरील अतिशय चांगले पुस्तक उपलब्ध आहे ज्यात नव्या अभ्यासाने त्यांनी या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
  असो. हा विषय अंतहीन आहे. थोड्याश्या मोठ्ठ्या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व. उत्तम ब्लॉग बद्दल परत एकदा अभिनंदन.

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   मोठ्या(!) आणि अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेबद्दल बहुत बहुत धन्यवाद. हा आर्यांचा सिद्धांत खरेच एक डोकेदुखी बनून राहिलेला आहे हे मात्र नक्की.या बाबतीत फुले आणि आंबेडकर यांचे विचार मुळातून आणि समग्र वाचण्याचा मौका अजून तरी नाही मिळाला मला. आपला लेख वाचला, त्यातून बहुमोल अशी बरीच माहिती मिळाली. हा विषय अंतहीन आहे हे नक्की. जितके खोलवर जावे तितके अजून अनुत्तरीत प्रश्न राहतात च . भाषा आणि वंश यांची गल्लत करणार्यांच्या चुका जरी लगेच उघड झाल्या, तरी फार्मर , वित्झेल प्रभृती लोक अजूनही छुपेपणे वर करतातच . त्यांचा सिद्धांत असा आहे की हडप्पा मधील लिपी ही भाषा दर्शवित नाही. याला उत्तर म्हणून इरावतम महादेवन यांचा पेपर आहे, पण त्याला मात्र कोणी फारसे महत्व देत नाही. ही वृत्ती बदलणे परम आवश्यक आहे. प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

 4. निखिल पुजारी म्हणतो आहे:

  आणखी एक गोष्ट. हडप्पा/मोहेंजोदडो मध्ये आणि एकंदरीत सिंधू-सरस्वती प्रदेशात , अगदी कर्नाटका पर्यंत, घोड्यांचे अवशेष सापडले आहेत. बरेचशे वादात आहेत. पण तशा नोंदी आहेत.
  घोड्यांच्या बाबतीतला मुख्य आक्षेप म्हणजे वैदिक जीवनात त्याचे असणारे अनन्यसाधारण महत्व. याउलट एकाही “indus seal ” वर घोडा नाही. पण घोड्यांच्या terracotta figurines – मातीचे पुतळे मिळाले आहेत. बरेचशे संशोधक सिंधू जीवनात घोड्यांचे अस्तित्व मान्य करू लागले आहेत. त्यामुळे त्या मुद्द्यात पूर्वी इतका दम राहिलेला नाही.

 5. Vitthal Khot म्हणतो आहे:

  sunder lekh ahe, i clear my so many douts

 6. aruna म्हणतो आहे:

  णिखिल फुजरी, मी तुमचा ‘http://aamhikon.blogspot.com/2009/04/refuting-aryan-theory.html हा ब्लोग वाचायचा प्रयत्न केला परंतु permission denied असे उत्तर आले. तरि कृपया मला तशी परमिशन द्यावी.

 7. aruna म्हणतो आहे:

  hello again sorry. i could not contat Mr. pujari so i tried to doo so from your blog. i am already following your blog and enjoying and appreciating it..suppose old age is catching up with me!:)

 8. swapnil khopkar म्हणतो आहे:

  खुप छान सर… पण २००० दोन हजार वर्षांपूर्वी सुद्धा घोड़्या चा उल्लेख तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाचा कालावधी मध्ये येतो.याचा उल्लेख बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथा मध्य केलेला आहे. दूसरी गोष्ट अशी की लोकमान्य तिलक यांचा आर्कटिक होम इन वेदाज या पुस्तका चा रेफरेंस आपण घ्यावा की. अाणखी एक 9th May 2001 The Times of India patrachar संदर्भ आपण ध्यावा दूसरी महत्वाची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यानी हु वेअर शुद्राज ?या पुस्तका मुद्दे जी पुरावे मांडली आहेत त्याचा संदर्भ अापण घ्यावा.त्या मध्ये मांडलेल्या तर्क अशुद्ध पुराव्यांचा आपण आधार घ्यावा……..त्याच प्रमाणे सावरकरांचे “सहा सोनेरी पाने ” हे पुस्तक वाचावे…. dhanyavad

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s