ग्रीक भाषा

काही शतकांपासून ग्रीक भाषा शिकण्याची इच्छा मनात घर करून राहिली होती. तसे पाहिले तर काय माहिती होते ग्रीस बद्दल? भूमध्य समुद्रातील बेटांचा एक विस्कळीत समूह आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे उगमस्थान इतकीच ओळख होती आतापर्यंत. गेलाबाजार पायथागोरास आणि इरातोस्थेनीस यांची प्रमेये आणि अलेक्झाण्डरच्या स्वार्या आणि अजून काही तुरळक नावे वगळता काही परिचय नव्हता. चीनी लोकांसारखीच विचित्र वाटणारी यांची नावे मात्र का कुणास ठाऊक अशी एखादा कठीण श्लोक म्हटल्यासारखी वाटायची . नंतर मग सुरेश मथुरे यांचे ” प्राचीन ग्रीसमधील वैज्ञानिक शोध” हे किंवा अशाच शीर्षकाचे लहानसे पुस्तक वाचले तेव्हापासून या लोकांशी थोडा थोडा परिचय झाला आणि मीदेखील एक अथीनियन झालो . मग अथेन्स म्हटले की कुठे आक्रोपोलीसवर पेरीक्लेसची राजकारणावर भाषणे चालू आहेत, तर कुठे अरिस्टोटल लोकांना तर्कशास्त्राचे नियम शिकवता शिकवता लिसियममधून शिष्यमंडळींसोबत फेरफटका मारतोय , तर दुसरीकडे युरीपायडीसची नाटके बघायला तोबा गर्दी जमलीय, तर बाजूला फिदिआस आणि प्राखीतेलेस हे शिल्पी पार्थेनोन मधील मूर्ती घडविण्यात मग्न आहेत, अशी चित्रे आपसूकच डोळ्यांसमोर येऊ लागली.

आणि वंगदेशात आल्याबरोबर “यावनी भाषा” शिकण्याचा हा मनोदय पुरा झाला तो किक्लोस नामक एका ग्रीक क्लबच्या द्वारे . किक्लोस क्लब ही अशी एकमेवाद्वितीय संस्था आहे, की तिच्याबद्दल एक स्वतंत्र आर्टिकल लिहिणेच अधिक प्रशस्त होईल. असो. आणि हळूहळू जसा या भाषेशी परिचय झाला, तसे “It sounds greek to me” या उक्तीमागील इंगित ध्यानी आले. अक्षरांच्या बाबतीत जास्त त्रास नाहीये, कारण फिजिक्स आणि इतर बऱ्याच ठिकाणी ग्रीक अक्षरे ही चिन्हे म्हणून वापरली जातात. एकूण २४ अक्षरे आहेत . अल्फा म्हणजे इंग्लिश a हे पाहिले, बीटा म्हणजे (जवळ जवळ ) इंग्लिश b हे दुसरे तर ओमेगा म्हणजे इंग्लिश ओ हे शेवटचे अक्षर आहे.अक्षरांना “अल्फाबेट” ही संज्ञा वरील नावांवरूनच आलेली आहे. या भाषेला अक्षरे दिली ती फिनिशियन लोकांनी. कमीतकमी गेली ३००० वर्षे तरी ग्रीक भाषा अस्तित्वात असल्याचे लिखित पुरावे सापडतात. युरोप खंडातील २ सर्वात प्राचीन भाषा म्हणजे ग्रीक आणि लातिन. संस्कृतबरोबर मिळून या भाषा इंडो-युरोपियन भाषाकुलाच्या ३ खापरपणज्या आहेत.

ग्रीक ची शब्दसंपदा भारतीय कानांना प्रथम तरी एकदम वेगळी आणि म्हणूनच कर्णकर्कश वाटू शकते. काही शब्द पाहून मात्र संस्कृत ही तिची दूरची नातलग असल्याचे लक्षात येते. जसे की संस्कृतमध्ये पाणी = नीर आणि ग्रीकमध्ये पाणी= नेरो, भांडे = पोतीरी (पात्रम् ) , केन्द्र=केन्द्रो. बाप=पातेरास( पिता, पितृ ), आई= मातेरास(माता, मातृ) अशी अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील. पण इंग्लिश मधील इतके शब्द ग्रीक आहेत. की त्यांची गणना करणेच शक्य नाही. एक नामवंत ग्रीक अर्थशास्त्रज्ञ खेनोफोन जोलोतास( Xenophon zolotas) याचे १९५७ सालचे हे भाषण ह्याचा नमुना म्हणून नेहमी वापरले जाते:

I always wished to address this Assembly in Greek, but realized that it would have been indeed “Greek” to all present in this room. I found out, however, that I could make my address in Greek which would still be English to everybody. With your permission, Mr. Chairman, l shall do it now, using with the exception of articles and prepositions, only Greek words.
Kyrie, I eulogize the archons of the Panethnic Numismatic Thesaurus and the Ecumenical Trapeza for the orthodoxy of their axioms, methods and policies, although there is an episode of cacophony of the Trapeza with Hellas. With enthusiasm we dialogue and synagonize at the synods of our didymous organizations in which polymorphous economic ideas and dogmas are analyzed and synthesized. Our critical problems such as the numismatic plethora generate some agony and melancholy. This phenomenon is characteristic of our epoch. But, to my thesis, we have the dynamism to program therapeutic practices as a prophylaxis from chaos and catastrophe. In parallel, a Panethnic unhypocritical economic synergy and harmonization in a democratic climate is basic. I apologize for my eccentric monologue. I emphasize my euharistia to you, Kyrie to the eugenic and generous American Ethnos and to the organizers and protagonists of his Amphictyony and the gastronomic symposia.

(विकिपीडिया वरून साभार: बाय द वे , हादेखील ग्रीक पद्धतीचाच शब्द आहे)

काय, इंग्लिश आहे की ग्रीक? पण यातील शब्दनशब्द एक तर ग्रीक तरी आहे किंवा ग्रीकवरून आलेला आहे.

इतर कोणत्याही भाषेप्रमाणेच ग्रीकला देखील खोडी आहेत आणि त्या विद्यार्थांचे कंबरडे मोडू पाहतात! अर्थात ज्यांनी संस्कृतचा थोडाफार तरी अभ्यास केला आहे, त्यांना हे अवघड जायचा कारण नाही. संस्कृत मधील धातूंच्या १० गणांप्रमाणेच इथेही ४ गण आहेत, धातूंची रूपे आहेत. आणि सहजलिंग हा डोके फिरविणारा प्रकार इथेही आहे. म्हणजे मराठीत आपण जसे तो चमचा , ती खोली आणि ते कपाट असे निर्जीव वस्तूंमध्ये भेदभाव करतो, तसाच पंक्तिप्रपंच तेही करतात. त्यामुळे ग्रीक डोळा हा नपुंसकलिंगी, तर नाक मात्र स्त्रीलिंगी होते. मुलगा या अर्थाचा अगोरिया आणि मुलगी या अर्थाचा कोरीत्सी हे दोन्ही शब्द मात्र नपुंसकलिंगी आहेत! खरंच ग्रीक लोक रिकामटेकडे होते हे निर्विवाद . पण त्यात पाहिला नंबर जातो तो चिन्यांचा!

पण यावर कडी म्हणजे हो आणि नाही या अर्थाचे शब्द. हो=ने आणि नाही=ओखी असे ग्रीक प्रतिशब्द आहेत. इंग्लिशप्रमाणे बोलू गेलो, तर हो च्या जागी नो आणि नाही च्या जागी ओखी म्हणजे ओके होऊन बसायचे. म्हणजे आली का पंचाईत !

ग्रीक भाषा ऐकायला कशी वाटते, ह्याचा १ नमुना या video मध्ये आहे : हे १ गाणे आहे ग्रीको-पर्शियन युद्धावरचे.

Advertisements
This entry was posted in ग्रीस. Bookmark the permalink.

6 Responses to ग्रीक भाषा

 1. yasha म्हणतो आहे:

  lai khas re…..gana ek number ahe…
  muzik pan bhari ahe bagh…..

  Kudos…ha pan greek shabd ahe na??

 2. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  Indeed…..kudos has greek origin…original is pronounced as “kee-dos”.

 3. vijay म्हणतो आहे:

  thodisi bangali zak vatate madhye madhye… baki sagalyach bhashat kahi na kahi samya asanaarach mhana…

  lekhanasathi shubheccha

 4. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  त्या ग्रीक गाण्यात बंगाली झलक आपल्याला वाटली का? बंगाली उच्चार हे काही बाबतीत युरोपीय भाषांसारखेच आहेत- त्यामुळे तसे वाटणे साहजिक आहे.
  बाकी ब्लॉग तर मी नुकताच सुरु केला आहे, आपल्या शुभेच्छेबद्दल अनेक आभार.

 5. suruchi dhawalolkar म्हणतो आहे:

  malahi greek shikaychi ahe u help me or u tech me….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s