दिसामाजी काहीतरी

निखिल शेठ उर्फ पोलादपूरकर….पोलादपूरच्या पोलादी नावाचा त्याला सार्थ अभिमान आहे.(जाता जाता : पोलादपूर हे कवींद्र परमानंद नेवासकर , शिवभारतकर्ते यांचे गाव) आणि समग्र कोकणाला पोलादपूरच्या पोलादी अधिपत्याखाली एकत्रित करणे हि ह्याची सुप्त महत्वाकांक्षा आहे.
मी मिरजेहून सीओईपी मध्ये आलो, तेच मुळी काहीसा गोंधळलेल्या आणि समानधर्मे नाहीत म्हणून बोअर झालेल्या अवस्थेत. दुसर्या वर्षात कधीतरी आय ब्लॉकसमोर दिनेश उर्फ दिन्या हा शेठ उर्फ शेट्याबरोबर उभा होता. मी आलो , तशी दिन्याने आमची ओळख करून दिली आणि मग दिसामासाने आमचे वाद-संवाद वाढू लागले, आणि भवभूतीची उक्ती सार्थ ठरल्याचा महदानंद जाहला –
ये नाम केचीदिह नः प्रयतंत्यवज्ञाः
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पस्यते मम कदापि समान धर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||
शेट्या म्हणजे डोके ढगात ठेवूनही पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून राहणारा शिलेदार . जिथे इतरेजन कल्पनाविलास म्हणजेच सर्वस्व मानीत आणि वायफळाचा मळा यथाशक्ती पिकवित, तिथे त्याची वास्तवाशी सांगड नेहमी घालण्याचा प्रयत्न करणारा वास्तववादी विश्लेषक. आणि कोणत्याही परिस्थितीचे विश्लेषण करण्यात एकदम तत्पर. सगळ्यात महत्वाचे एका अनाम उर्जेने कायम सळसळणारा . आळसदेवाचे एकनिष्ठ भक्त जे आम्ही, त्यांना नेहमी प्रश्न पडायचा की हा इतके काम कसे करू शकतो? म्हणजे नुसता अभ्यास नाही, तर इतरही बरेच काही. नो झंझट, सटासट, रपारप आणि मराठीतील उर्जादर्शक सर्व क्रियाविशेषणे अपुरीच आहेत.
पण त्याचे इतिहासप्रेम तितकेच जाज्वल्य. मग ते मराठे असोत, स्वातंत्र्य चळवळ असो अथवा जगाच्या पाठीवरील कोणतीही घडामोड असो. आमच्या हिस्टरी क्लब मध्ये गालिबादी अपसव्य कवींचा रसिक म्हणून तो विख्यात होता. उर्दू हे प्रकरण मला थोडे तरी झेपले ते त्याच्यामुळेच. नाहीतर लोक नुसते सुभानल्ला आणि इर्शाद च्या ललकार्या देत आणि कवितेचा मागमूस उरत नसे. तर सांगायचे प्रयोजन म्हणजे त्याने सुमारे ४ महिन्यांपूर्वी १ ब्लॉग सुरु केला आहे . खरेतर मी ब्लॉग सुरु केल्याला अवघे २ दिवस झालेत. त्यामुळे आमच्या या “PRAGMATIC IDEALIST ” ची ओळख सुरुवातीलाच करून देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो . त्या ब्लोग ची लिंक इथे आहे. विविध विषयांवरील मस्त आणि भरपूर आर्टिकल्स हे त्या ब्लॉग चे वैशिष्ट्य आहे. लवकरच आर्टिकल्सचे शतक साजरे होईल तिथे. जरूर वाचा. बेष्ट आहे.

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

2 Responses to दिसामाजी काहीतरी

  1. d. s. lele म्हणतो आहे:

    Nikhilji,
    blog vachala.pratikriya denyache tharavile hote pan thoda avadhi hava hota, to aaj milala.
    likhan uttam, vachan uttam, vichar karayala lavanare aahe.
    chalu thev.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s