इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि मराठी सिनेमातील पहिला बिकिनी सीन!!!!!

Shejwalkar

इतिहासकारांपैकी शेजवलकर हे माझे ऑल टाईम फेव्हरीट. पगडी अथवा खरेशास्त्री यांचे काम काही कमी नाही, पण हे एकांडे शिलेदार होते. इतिहासाचा संसार थाटता थाटता यांनी आपल्या संसाराची फिकीर कधीच केली नाही. कायम कार्यरत राहिले. शेजवलकरांनी इतिहास संशोधनात एक नवीन युग सुरु केले आणि प्रगती या साप्ताहिकाद्वारे लोकांना काही प्रमाणात तरी नक्कीच जाग आणली . असो. पण आज या “दूर कोपर्यातील बैरागी चाफ्यांचे” प्रयोजन आहे ते एका वेगळ्या कारणासाठी. हा बैरागी कधीकाळी प्रेमात देखील पडला होता आणि गृहस्थ होण्यापासून इंचभरच दूर होता .

प्रख्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि आचार्य अत्र्यांच्या “ब्रह्मचारी” या चित्रपटातील “यमुनाजळी खेळू खेळ कन्हैय्या” या गाण्याचा काही संबंध आहे का? हे वाचल्यावर निम्म्याहून अधिक लोकांची प्रतिक्रिया खास आमच्या मित्राच्या भाषेत सांगायची झाली तर ” अरे डोक्यावर पडलायस की काय?” अशीच होईल , यात काही शंका नाही. कुठे तो “दूर कोपर्यातील बैरागी चाफा ” आणि कुठे ते मराठी सिनेमात खळबळ उडवून देणारे बोल्ड गाणे? कुठे ते निर्भीड प्रगतीकार आणि कुठे ते अनावृत (!) गीत? हा म्हणजे ” श्वानं युवानं मघवानमाह” पैकीच प्रकार झाला.

१९३६ साली अत्र्यांनी गांधीवादाची यथास्थित उडविणारा ब्रह्मचारी हा चित्रपट काढला. मास्टर विनायक हे हीरो आणि नम्रता शिरोडकरची आज्जी ही त्याची हिरोईन होती. गांधीवादाच्या आहारी जाऊन हीरो कसा गंडतो आणि शेवटी हिरोईन च्या प्रेमात पडून शेवटी कसे सर्व कुशल मंगल होते , ते त्यात मस्त दाखविले आहे. लाजाळू हीरोचे काम मास्टर विनायक यांनी उत्कृष्ट वठवले आहे.

असा काही संबंध असेल , असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते. अजूनही पुरतेपणी माहित नाही . पण जितके माहित आहे, ते हा संबंध अधोरेखित करते. आता उत्सुकता अधिक न ताणता हा काय प्रकार ते सांगतो. शेजवलकर यांचा समग्र लेखसंग्रह जो ह. वि. मोटे आणि गं. दे. खानोलकर यांनी संपादित केलेला आहे , त्यात शेजवलकरांचे संक्षिप्त चरित्र आलेले आहे. त्यात असा उल्लेख आला आहे, की “नानासाहेब पेशवे” हा ग्रंथ लिहित असताना कामशेत येथे रियासतकार सरदेसाई यांच्या घरी शेजवलकरांचे कायम येणेजाणे होते . त्यात आणि विध्याधर पुंडलिक यांच्या “आवडलेली माणसे” यातदेखील असा उल्लेख आहे, की शेजवलकरांचा एका कम्युनिस्ट कार्यकर्त्री बरोबर प्रेमभंग झाला.

पण मग ब्रह्मचारी आणि अत्र्यांचा संबंध इथे कुठे आला? अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या “मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी” या पुस्तकात बऱ्याच सेलेब्रिटीजचे मद्यपानाबद्दलचे अनुभव आणि मते यांचे संकलन करण्यात आलेले आहे. अगदी तर्कतीर्थांनी वेदकाळातील सोम पिण्याच्या प्रथेपासून भारतीय संस्कृतीमधील मद्यपानाचा आढावा घेतला आहे . मद्यपानाबद्दल माझ्यासारख्या अगदी सोवळ्या व्यक्तींना देखील ते पुस्तक नक्कीच वाचण्यासारखे आहे. त्यात काही भाषांतरे, काही अनुभव by themselves इतके भारी आहेत की बस- हाय कम्बख्त तुने तो पीही नही ! असे म्हणावयास क्षणभर तरी प्रवृत्त करतात. असो. त्यात बाळ सामंतांचा (चूकभूल देणे घेणे) अनुभव नेहमीप्रमाणेच रोचक आहे . ब्रह्मचारी चित्रपट खूप यशस्वी झाला आणि अत्रे उत्तरेत गेले असताना त्यांना प्रसिद्ध क्रांतिकारक मानवेंद्रनाथ रॉय यांनी डेहराडूनला पार्टी साठी बोलाविले. पार्टी रंगात आली, आणि रॉय यांनी अत्र्यांना “यमुनाजळी” या गाण्याची स्फूर्ती कशी झाली, अशी पृच्छा केली. रियासतकारांच्या नात्यातील काही व्यक्ती ह्या कम्युनिस्ट आंदोलनात होत्या. अत्रे तेव्हा(१९२८-१९३२) कामशेतला जात येत असत. तेव्हा त्यांना कळले , की एका कम्युनिस्ट कार्यकर्त्रीवर महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध संशोधकाचे प्रेम जमले होते. ते दोघे गप्पा मारावयास एका तळ्याच्या काठी जात असत. तो संशोधक बिचारा लाजाळू . तो भिडस्तपणे तळ्याच्या काठाशी बसे आणि ती बिनधास्त मुलगी मात्र तळ्यात डुंबत बसे. अत्र्यांनी हे पाहिले आणि पुढच्या १०,००० वर्षात न होणार्या गाण्याची त्यांना स्फूर्ती झाली!

त्यामुळे, उपलब्ध पुरावे पाहता, तो “विख्यात संशोधक” म्हणजे शेजवलकर असावेत असे म्हणण्यास पुष्कळ वाव आहे, कारण त्या काळात(१९२८-१९३२) तरी रियासतकारांचे अजून कुठल्या संशोधकांबरोबर इतके घनिष्ठ संबंध होते का, असले तरी त्याचे कुणाशी प्रेमबीम जमले होते का, हे सर्व पाहता शेजवलकरांच्या पक्षाचा दावा सबळ वाटू लागतो .

ता. क . – मला उपलब्ध असलेल्या माहितीवरून मी हा निष्कर्ष काढू पाहत आहे. कोणाकडे याविरुद्ध अथवा यास पुष्टी देणारा पुरावा असेल, तर कृपया मला सांगावा ही विनंती.

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत. Bookmark the permalink.

12 Responses to इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि मराठी सिनेमातील पहिला बिकिनी सीन!!!!!

 1. mandar17390 म्हणतो आहे:

  लेखन शैली मुळे ऐतीहासिक वाचल्या चा भास होतो .
  फारच शान फील येतोय त्या मुळे !!!

 2. sachin म्हणतो आहे:

  dada tujha anumaan khara aso athwa naso parantu ya premprakaranamule shejwalkaranchya jeevanavar motha parinaam jhala.te sadaiva nirashet jagayche.ya ghatanecha parinaam jasa tyanchavar jhala tasach maharashtrachya itihaas sanshodhanavarhi jhala,kaaran vrutti oodasin banlyakaranane tyanchyakadun far kami likhan jhale(tyanchya kshamatechya tulanene mhantoy).tyancha panipat 1761 ha granth ya karanamulech laambla hota.(sources:maagova by narhar kurundkar ,prastaavana of the marathi copy of the book panipat 1761)dada mi ase aikle ahe ki tujha shejwalkaraanvar daandga abhyaas aahe.please tu mala tyancha ya love story baddal jitke mahit aahe titke thodkyaat lihun paathavshil ka majhya mail id var(jadhavss09.extc@coep.ac.in) thanks!

 3. sachin म्हणतो आहे:

  i came to know that u are presently studying in Kolkata.if i am correct, RAGHUJI BHOSALE was in-charge of the bengal subha during the era of peshwas.is there any statue of his or at least a chowk named after him in Kolkata?(sorry for a very ordinary question)

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   yeah, I am in Kolkata. Raghuji Bhosale was in charge or rather the conqueror of Bengal province. But I did not find anything named after him in Kolkata. There is a canal-like structure which is called Maratha ditch – but general people do not know it. Because Marathas are viewed as invaders by those guys.

   • sachin म्हणतो आहे:

    sad to know about Raghuji Bhosale!i think marathi people like you who are now in Kolkata must raise voice against this. ((dada))i have something interesting for you. yesterday i was reading a book and i came across the following reference in it:’Raichur is a city(or may be a town)bounded by the rivers krishna and tungabhadra in the state of Karnataka.as we travel southwards along with the river tungabhadra we come across a city named BALLARY(read the part ‘BAL’ as ‘bal’ of ‘balraam’ and not as ‘baal’).There are two dharmapeethas nearby(the writer was an officer in Madras Province of British India in 1933).you find many ritualistic brahmins in this region.’ based on this i have drawn a conclusion (and let me mention at the beginning itself that i could be wrong).my conclusion is:”The distance from raichur to miraj is roughly 332 km.so ballary to miraj might be some 370 km.i think your ancestors must have migrated from ballary to miraj and started calling themselves as BALLARYKAR.later,as the time passed, the word must have moulded itself to BELLARYKAR which is your surname.so the BALLARY dist. in karnataka might be your native place.” do tell me if i am correct. and one more thing. i have written a word in bracket(( )) with purpose.it is my duty to mention that word and the bracket indicates that u have the freedom to accept or reject it. thanks and GD.

   • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

    Actually no need to raise voice against it. Its like saying we must name something after Adilshah or Nijamshah. Bengali people view the Marathas as plunderers and with a reason, which I do not feel the need to elaborate here.

    And yes, my surname is from the place only. If you find tracing the history of surnames interesting, you may observe that many marathi surnames are after some place e.g. dandekar, borkar etc., whereas many others e.g. shelar, more, jadhav etc. stem from the erstwhile dynasties like shelar from shilahar, more from maurya, kadam from kadamba , jadhav from yadav etc.

 4. Aniruddha G. Kulkarni म्हणतो आहे:

  Nice, I was well aware of this, and I know something even more that might interest you, but this side of TSS doesn’t interest me.
  M V Dhond analyses personal life of B S Mardhekar in great detail because he argues that it has an impact on some of his poems.
  If TSS’s personal life had an impact on his work, I would be interested in that.
  Otherwise let us just say: He was a human like any of us.
  In Maharashtra, where people have taken hero-worshipping and celebrity-sucking to a new level, it’s hard for people to accept this mundane fact.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s