बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

वृत्त- स्रग्धरा.
कंटाळा पूर्ण पाळा, वळवळवळिता , रोडका होशि बाळा |
देहाचा सान गाळा, शिणवुनि विरळा, का करावा कृपाळा?
लागावा छान चाळा, बघत बस नळा, तोय वाहे खळाळा |
किंवा येंगोनि माळा, सकलहि झुरळां, मारि रे चंडकाळा ||१||

वृत्त- शार्दूलविक्रीडित.
चित्ती नाद उठे मनी पुटपुटे, आलस्य हे गोमटे |
कैसा दीस उठे व रातहि कटे, दोघे जसे भामटे |
तोंडीची जरि मक्षिका नच फुटे , तादात्म्य वाटे, पटे |
जे कोणी दिवटे जगात फुकटे, हे त्यांपरी ओखटे ||२||

वृत्त- उपजाति.
आलस्य आहे जगतात थोर |
तयाविना विश्व पुरे असार |
तयाविना कार्य महत्वहीन |
तेणेगुणे शीण नसे “रुटीन”||३||

वृत्त- उपजाति.
म्हणाल का लावियले पुराण?
उपाय जो ह्यावरि रामबाण |
तो ऐकता सोडुनिया उसासे |
आलस्यभृत्यांत जावे अपैसे ||४||

कंटाळा ब्लॉग चे प्रेरणे बद्दल आभार.

आणि सरतेशेवटी –
वृत्त- द्रुतविलंबित.
न कळता पद अग्निवरी पडे| न करि दाह असे न कधी घडे |
जगति आळस नाम तसे असे | कर्तृभाव झणि नष्ट करीतसे||

– श्री .वामन नरहर शेषे, राहणार कोरेगाव कुमठे (सातारा) , यांची क्षमा मागून (!)

Advertisements
This entry was posted in कविता-बिविता. Bookmark the permalink.

7 Responses to बाळाचा चाळा- कंटाळा !!!!!

  1. पिंगबॅक Tweets that mention MarathiBlogs: बाळाचा चाळा- कंटाळा !!!!! -- Topsy.com

  2. Nikhil Sheth म्हणतो आहे:

    तोडलयेस लेका…. उपजातीची फुल्टू घेतलीयेस…

  3. yasha म्हणतो आहे:

    bhidto ahes bala….chandakala…..wah wah…

  4. शब्दांकित म्हणतो आहे:

    अबब एवढंच म्हणता येईल मला. तुमची शिक्षणाची सैद थोडी चुकलीय का हो? आर्ट्सला जायला काही हरकत नव्हती तुम्ही. खरतर तिकडे न जाताही तुमच्याकडून कलाकृती घडताहेत म्हणा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s