कार्टून्स, कार्टून्स आणि कार्टून्स….

swat kats

परवा युट्युबवर सहज चाळा म्हणून कार्टून्स् पाहत होतो. आधी Tom & Jerry चे काही एपिसोड्स पाहिले, मग popeye ने पालक खाऊन त्याचा सनातन प्रतिस्पर्धी ब्लूटोला कसे मारले, त्या ऐतिहासिक मारामारीला याची देही याची डोळा पाहत बसलो . पण मग जरा बोअर झालो आणि मोर्चा शेवटी वळवला कार्टून नेटवर्क वर लागणारे “power zone ” कडे.त्यातले ते दुपारी तीन ते ५ वाजेपर्यंत लागणारे चारही कार्टून्स म्हणजे फुल्टू दंगा. ३ वाजता Goltar and the golden lance लागायचे. त्यातील ती सोन्याच्या तलवारीची टोर्नक बरोबर होणारी खणाखणी पाहून कसे बेष्ट वाटायचे. पण त्यात साली एक खोट होती. तो Goltar बेटा He -man ची स्टाईल मारू पहायचा, पण ते काही त्याला जमायचे नाही. कुठे तो सर्वशक्तिमान राखाडी कवटीचा(Grey skull ) योद्धा आणि कुठे हे कालचे पोरगे? तो टोर्नक पण तसाच. त्या जरत्कारू स्केलेटोरने एकदा का आपली जादूची काठी फिरवली, की अक्ख्या जगात उलथ-पालथ व्हायची. त्याच्याशी तुलना कुठे करता याची? पण तलवार एकदा का हातात घेतली, की मग Goltar चा धुडगूस सुरू. मग तो अगदी रुस्तम-इस्फान्दियार प्रमाणे अन्झेपेबल होत असे.

या जादूभर्या विश्वातून बाहेर काढले ते “The centurions ” नी. डॉक्टर बार्त की असाच कोणीतरी Jake Rockwell , Max Ray , आणि Ace Mccloud तिघांचा कायमचा शत्रू. आणि ते तिघे अनुक्रमे भूचर जलचर आणि “हवा”चर. वरती एका उपग्रहात ती क्रिस्टल हेन म्हणून बाई त्या एका चीम्पान्झीसोबत कायमची तळ ठोकून बसलेली असते, आणि त्या तिघांपैकी कोणीही पृथ्वीवरून सिग्नल दिला, म्हणजे “Power Extreme !” असे ओरडले, की तर्हेतर्हेची मिसाईल्स आपोआप त्यांना फिट होऊन ते धडाधड शत्रूचे बालेकिल्ले तहसनहस करत सुटतात. हिंदीमध्ये कार्टूनच्या डबिंगची जेव्हा लाट आली, तेव्हा यांची नावेदेखील भाषांतरित करण्यात आली- शाम घोरपडे, आणि अजून कोणी वाघमारे किंवा असेच काहीतरी.

पण यापैकी सगळ्यात Rocking कार्टून म्हणजे SWAT KATS हे होय. डबिगवाल्यांनी यांची तर पूर्णपणे वाटच लावली होती. ती Megacat city आणि तिच्यावर वारंवार येणारी अगणित संकटे आणि त्यातून सोडविणारे ते दोन तारणहार- T-bone आणि Razor . पहिला बेदरकार सारथी आणि दुसरा कुशल, बेरकी नेमबाज. डबिंगमध्ये Megacat city चे सरळ सरळ “महाबिल्ला शहर” केले आणि त्या दोघांची नावे “बडे म्याव आणि छोटे म्याव ” अशी करून टाकली! असा राग आला त्याक्षणी! आणि वाटून गेले- “How Green was my valley !” तो मेयर एकदम भित्रा आणि डेप्युटी मेयर मात्र अगदी सौंदर्यखणी! सेनापती नेहमीप्रमाणेच बत्थड आणि निर्बुद्ध. आणि SWAT KATS ची शस्त्रेदेखील किती किती म्हणून सांगावीत! अगदी रामायण महाभारतातील अस्त्रावलीप्रमाणेच त्यांचेही असंख्य प्रकार होते.

नुसते वैचित्र्य पहायचे असेल तर “The addams family ” हे कार्टून आदर्श आहे. त्या घराची गृहिणी पायांनी नाही, तर झाडाची मुळे असतात तशा मुलांची हालचाल करत फिरत असते. एक नुसताच हात असतो आणि घरमालक त्या हाताबरोबर कायम तलवारीचे हात खेळत असतो. एक आज्जीबाई आपल्या ओठावरचे केस वीन्चरत असतात , तर गळूकाका उर्फ Uncle Fester हे आत्मदंडन करण्यात मग्न असतात. मुलगीच्या बाहुलीला डोके नसते, आणि मुलगा मगरीबरोबर खेळत असतो. त्यावेळी आम्हाला त्या मुलाचा फार म्हणजे फारचफार हेवा वाटायचा आणि त्यांचे अनुकरण म्हणून आम्ही पादरा किडा नामक एक षटपाद काडेपेटीत बंदिस्त करून आमच्या परम स्नेहाची निशाणी म्हणून आमच्या मित्रवर्यांस सप्रेम भेट देत असू आणि घरातील पालीला घाबरत असूनदेखील शक्य तितके तिच्या जवळ जाऊन तिला डिवचत असू- शेवटी आपला भाव वधारल्याशी कारण!

पण खरेच जर आमच्या परम संस्कारशील मनावर कुठल्या कार्टूनचे ठसे उमटले असतील, तर ते म्हणजे ‘BATMAN” होय. आधीच वटवाघूळ , तशात रात्रीच्या अंधारात तुफान मारामारी- तीसुद्धा एकाहून एक खतरनाक गुंडांशी, पण एकदाही सुपरपॉवर न वापरता. सुपरपॉवर एकदा वापरली, की काहीपण करता येते. त्यात काय विशेष? त्यामुळे सुपरपॉवर न वापरतादेखील सर्वांना दे माय धरणी ठाय करून सोडणारा BATMAN हाच खरा भारी असा आमच्या मनाने स्पष्ट निर्वाळा दिला होता.त्या साक्षात्काराच्या जोरावर आम्ही Superman आणि Spiderman च्या भक्तगणांना वादात पूर्वपक्ष सुरु असतानाच खडे चारले होते. पण BATMAN मध्येदेखील एक खोट होतीच. तो पीतदंत जोकर काही त्याला आटपत नसे. काही केले तरी त्याचे ते विकट हास्य कायम बरकरार असे. पण दोष हाच माणसाचा खरा गुण आहे, अशी आम्ही मनाची जड अंत:करणाने समजूत घातली आणि निश्चिंत झालो. घरातील अंधार्या कोपर्यांमध्ये न घाबरता जाण्यासाठी मात्र याचा उपयोग झाला, हे कबूल केलेच पाहिजे. विशेषत: “दैनिक शांतीदायक त्याग” तोसुद्धा वीज गेलेली असताना करायचा असेल तर महासंकट- मग त्याचे स्मरण करीत स्वारी तिकडे प्रस्थान करीत असे.

अजूनही अनेक कार्टून्स होती – Wacky races , त्यातील तो कुटिल असा Dick Dastardly आणि त्याचा तितक्याच कुटिलपणे हसणारा चतुष्पाद साथीदार- Mutley , स्कूबी-डू आणि त्याबरोबरची भूतशोधक मंडळी, इत्यादी सर्व कार्टून्स म्हणजे अगदी वेचीव नग आहेत. त्यांचा परामर्श पुढे यथावकाश घेऊच.

Advertisements
This entry was posted in विविधा. Bookmark the permalink.

16 Responses to कार्टून्स, कार्टून्स आणि कार्टून्स….

 1. Nikhil Sheth म्हणतो आहे:

  BRAVO…!!! GREAT… Khalllaaaass….

 2. Nikhil Sheth म्हणतो आहे:

  but what is the meaning of ‘how green was my valley’?

 3. Ketaki म्हणतो आहे:

  Ekdum besht !

 4. saurabh म्हणतो आहे:

  अरे काय अप्रतिम पोस्ट आहे ही. मी उशिराच वाचली. अहाहा! अरे ते जुने कार्टून नेटवर्क कुणीतरी विसरेल का? पॉवर झोनची मजा काय वर्णावी? मला सगळ्यात आनंद झाला तो Swat Cats आणि Power Centurians आणि ही दोन नावे वाचून! पॉवर सेंच्युरियन्स तर काय अप्रतिम कार्टून होते रे! पॉवर एक्स्ट्रीम म्हटल्याबरोबर त्या तिघांना ती जी काही शस्त्रं येऊन चिकटायची तो सीन म्हणजे आख्खे कार्टून बघण्याचे सार्थक होत असे. त्यावेळचे ते संगीत ऐकून मी अक्षरश: जागेवर उभा राहत असे. आणि ती वर अवकाशात चिपांझीला घेऊन बसलेली बया. आणि ती निळसर दिसणारी पृथ्वी! मध्येच कधी त्यांना वाचवायला ती खाली पण दिसत असे.

  महाबिल्ला शहर एकदम झकास होते. बडे मिया आणि छोटे मिया! क्यों बडे मिया, तो निकले? असा त्यातला संवाद अजूनही आठवतोय. आणि त्यांची ती गाडी, एका पुराण्या गॅरेजमधल्या जमिनीची झडप उघडून ते आत जातात आणि खालचे त्यांचे ते वर्कशॉप! सगळेच अद्भुत होते.
  खूपच जुन्या दिवसांची याद करुन दिलीस रे! तुझे आभार कसे मानावेत कळत नाही. साले आपण वय वाढेल तसे छोट्या छोट्या आनंदापासून जास्तच दूर होत जातो. असो. डेक्स्टर आणि मिनीला कसे विसरलास? आणि ते जॉनी क्वेस्ट बघायचास का तू? त्याचे संगीत तर इतके कडक होते की बास!
  लाख लाख धन्यवाद. You made my day- sorry! month! पुढचा महिना आता सगळी कार्टून्स शोधतो आधी यूट्यूबवर!

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   सौरभ, उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल बहुत बहुत धन्यवाद , शेवटी तुझ्या (एकवचन चालेल का?) रूपाने समान धर्मा भेटलाच म्हणायचा! मी पण कार्टून नेटवर्क चा अगदी अगदी डाय हार्ड fan होतो, आहे आणि राहीन. मला सेन्च्युरीयंस आवडत , पण महाबिल्ला शहर म्हणजे महान प्रकार होता. मी आणि माझे मित्र मिळून त्यांच्यावर कॉमिक स्ट्रिप्स काढत असू.-कथा माझी आणि चित्रे मित्रांची! डेक्स्टर आणि डीडी ला मी विसरलो नक्कीच नाही, पण विस्तार खूप होईल म्हणून टाळले. एकदा लिहीत गेलो, की लिहिता लिहिता लिही | पोचला शून्य प्रहरी | अशी स्थिती होते , म्हणून. आणि जॉनी क्वेस्ट तर मी नेहमी बघायचो, त्यातली ती कन्सेप्टच खतरनाक होती. तो “सर्पकेश” डॉक्टर सर्ट एकदा आला, की संपले! तसेच डार्क मूड असणारे दुसरे कार्टून म्हणजे सामुराई jack . पॉवरपफ गर्ल्स हा देखील बेष्ट प्रकार होता- त्यात तो “हिम” नामक लाल शत्रू अतिशय गूढ वाटायचा तेव्हा. कार्टून म्हणजे खरंच जीव की प्राण होता तेव्हा तरी.
   सो एन्जॉय! कार्टून पहा आणि त्या आनंदाचा आस्वाद पुनरेकवार घ्या!

 5. saurabh म्हणतो आहे:

  Oops! डेक्स्टरच्या बहिणीचे नाव डी डी असे असायला हवे. मी चिंटूतल्या मिनीचे नाव दिले. तशा दोघीही त्रास देणार्‍याच आहेत म्हणा! 🙂

 6. unekar म्हणतो आहे:

  dainik shantidayak tyag !!! rotfl 😀

 7. सागर कोकणे म्हणतो आहे:

  फार छान…माझ्या ही मनात होतेच या विषयी लिहायचे…वेळ मिळेल तेव्हा लिहीन…
  पण कार्टूनस चीमजा काही औरच होती..खाणे-पिणे विसरून पाहत राहायचो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s