शिवरायाचे कैसे भोज‌न‌ क‌र‌णे?

Chhatrapati Shree Shivaji Maharaj

छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांच्या गोष्टी हा अस्मादिकांचा तसा अगदी प्रागैतिहासिक काळापासोनचा अनन्य विसावा आहे. बाजीप्रभू , मुरारबाजी, तानाजी, संभाजी कावजी, बहिर्जी नाईक, या वीरांच्या प्रभावळीत तानाजी हा आमच्या गल्लीतील एका काकांचा ऑल टाईम फेवरीट होता.ते आम्हाला अनेक गोष्टी सांगत. पण तानाजीच्या शौर्याच्या गोष्टी तर ऐकून ऐकून पाठ झाल्या होत्या. मग काय करावे? ते तानाजीच्या भोजनचर्येच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी सांगत असत. ती वर्णने असत भीमाची, परंतु तानाजीच्या नावावर खपवीत. त्यामुळे “तानाजी हाच महाभारतातील भीम” ऐसा एक प्रबंध रेडी करावा असा मानस होता, परंतु गाईड मिळेना, त्यामुळे ते राहिले आणि महाराष्ट्र अजून एका पी. एच. डी. प्रबंधाला मुकला. पण त्या गोष्टी मात्र कायमच्या लक्षात राहिल्या. मग त्यात १०० किमी रपेट करून आल्यावर तानाजीने १०० भाकर्यांचा ऑन द स्पॉट कसा फडशा उडविला, रोजच्या न्याहारीला वीसेक ऑम्लेट्स कशी बनविली जात, रायबाने एकदा “आता बास” म्हटल्यावर तानाजीने त्याला अजून १० भाकर्या कशा खायला लावल्या, शेतावर न्याहारीला बसले असताना लोणच्याची इच्छा झाल्यावर माईनमुळाचे झाडच्या झाड उपटून त्याने कसे “फार्म-फ्रेश” लोणचे खाल्ले, अशा आणि अजून अनेक कथा-उपकथा होत्या. शेवटी बालसुलभ शंका म्हणून मी विचारलेच- ” जर इतक्या भाकर्या आणि भात रोज शिजत होता, तर मोलकरणी किती असतील? त्यासुद्धा फक्त भाकर्या बडवायला?” त्यालाही उत्तर तयार होतेच- जास्ती नाही, पण ज्या होत्या त्यांना स्पेशल आहार, उदा. थंडाई वगैरे दिली जात असे- झीज भरून काढून अंगात दम राहावा म्हणून!

हे खरे की खोटे, याची शहानिशा काही आम्ही तेव्हा केली नाही. पण त्या भानगडीत शिवकालीन खाद्यसंस्कृतीबद्दल कायमचे कुतूहल मनात घर करून बसले. खरंच काय बरे खात असतील हे लोक? हे मावळे आणि महाराज आपल्यासारखे गव्हाच्या चपात्या खात असतील की भाकर्या? भाज्या कोणत्या खात असतील? यापैकी काही प्रश्नांची उत्तरे सोपी आहेत, तर काही माहिती कालौघात गडप झालीये. पण काहीसा धावता आढावा तरी आपण नक्कीच घेऊ शकतो.

सुरुवातीचा मुद्दा म्हणजे १७व्या शतकातील महाराष्ट्रात गहू कितीसा पिकत होता? आत्ता घरोघरी गव्हाच्या चपात्या आपण खातो खर्या, परंतु आत्ताचा गहू म्हणजे मुख्यत: हरितक्रांतीनंतरच्या पंजाबची देणगी आहे. तेव्हा गहू अगदीच पिकत नसे असे नाही, परंतु जनसामान्य सर्रास खातील इतका तरी नक्कीच पिकत नव्हता. आणि बटाटा? मुळात हा प्रकार म्हणजे पोर्तुगीज लोकांची जगाला देणगी आहे. दक्षिण अमेरिकेतून त्यांनी बटाटा आणला आणि जगाला दिला. त्यामुळे कमीत कमी इ.स. १६०० पर्यंत तरी भारतात बटाट्याचे उत्पादन घेतले जात नसे. पहिल्यांदा सुरत येथे बटाट्याचे पीक घेतले गेले आणि तिथून तो सगळीकडे फोफावला. मग मुख्य धान्ये कोणती? ज्वारी, नाचणी , बाजरी. मावळात तरी कमीतकमी यांचीच चलती असे. आणि भात तर होताच. भाताच्या आंबे मोहर ह्या जातीचे नाव मावळातील त्या नावाच्या २ गावांवरून पडले असे मराठी व्युत्पत्ती कोश म्हणतो. पण बासमती तेव्हा कोणी फारसा वापरत नसे- तो वाण महाराष्ट्रातील नाहीच मुळी. घनसाळ, जिरेसाळ इत्यादी भाताचे प्रकार होते. आणि मका जरी १७व्या शतकात भारतात पिकत असला, तरी महाराष्ट्रात नव्हता.

ही झाली मुख्य धान्ये. डाळी कोणत्या होत्या? मसूर, तूर , मूग, चणा, उडीद, हरभरा इत्यादी. या डाळींचा उल्लेख अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील आढळतो. त्यात त्यांच्या विविध जाती-उपजाति आहेत, असे स्पष्ट विधान आहे. संगम तमिळ साहित्यात तूर डाळीचे काही उल्लेख आहेत. आणि पालेभाज्या म्हणाल तर अंबाडी, तांदळी, पालक इत्यादी या १७ व्या शतकातील महाराष्ट्रात होत्याच. पालकाबद्दल असे म्हटले जाते की इराण मधून अरब व्यापार्यांनी तो भारतात आणला, त्यामुळे कमीतकमी इ.स. १००० नंतर तरी भारतात पालक पिकवला जाऊ लागला हे निर्विवाद.

ही झाली निव्वळ अन्नधान्याची वर्गवारी. पण तेव्हाच्या जेवणात कोणत्या डिशेस होत्या? आत्तासारखी गल्लोगल्ली पंजाबी हॉटेल्स आणि कोल्हापुरी अस्सल मिसळ तेव्हा नसे. इतकेच काय, अगदी १९६०-७० पर्यंत पुण्याच्या शासकीय एन्जिनिअरिन्ग कॉलेजच्या होस्टेल मेस मध्ये कोकणी, देशावरची, सिंधी-पंजाबी आणि एक कॉमन नॉनव्हेज मेस होती. त्यामुळे १७ व्या शतकातील महाराष्ट्रात जेवणात बरीच विविधता होती. त्यात परत असंख्य जातींचे निकष लावले की अजून वैविध्य येते. एकच आमटी , देशावर आणि कोकणात वेगळ्या तऱ्हेने बनत असे, अजूनही बनते. आणि एकाच प्रदेशातील जाती-धर्मानुसार सुद्धा जेवणात फरक पडतो.

तर आता मूळ मुद्द्याकडे येऊ. शिवाजीमहाराज रोजच्या जेवणात काय बरे जेवत असतील? त्यांच्या जेवणात जे जे घटक असण्याची सर्वात जास्त शक्यता होती, त्यांची यादी वर दिलेली आहे . चपाती-भाजी, भात शिवाय काही गोड-धोड पदार्थ असावेत. शिवाय नॉनव्हेज तर क्षत्रिय असल्याने ते खात असावेतच. पण त्यात देखील कोणते नॉनव्हेज? चिकन? मटन? मासे? देशावर जास्त काळ वास्तव्य असल्याने मासे हा प्रकार कधीतरी कोकण प्रांतात गेल्यावरच जास्त करून होत असावा. त्यामुळे उरले चिकन आणि मटन हे दोन पर्याय. महाराजांची जीवनशैली पहिली, तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यांनी आयुष्यभर धावपळ, दगदग केली. स्वस्थता अशी फारशी लाभलीच नाही. त्यामुळे जाड्य, मांद्य आणणारे मटन सारखे नॉनव्हेज ते सर्रास खात असतील का, अशी शंका येते. त्यामुळे जास्त शक्यता वाटते ती चिकनचीच. दुर्गभ्रमणगाथेत गोनीदांनी एक उल्लेख उद्धृत केला आहे( मूळ तो कदाचित नरहर कुरुंदकरांचा असावा- स्मरण पुसट आहे), की महाराज चिकन खात असावेत. उत्तरेत गेल्यावर पुलाव, तंदुरी इत्यादी गोष्टींचा आस्वाद त्यांनी नक्कीच घेतला असेल. पण गोवळकोंड्याला त्यांनी बिर्याणी खाल्ली होती का? नसावी, कारण हैदराबादी बिर्याणी हा प्रकारच मुळात निजामाच्या काळात विकसित झाला, १८ व्या शतकात. बंगळूरला गेल्यावर इडली-डोसा, तर वेल्लोरला गेल्यावर रसम इत्यादी पदार्थ त्यांनी खाल्ले असावेत. शिवाय ते खिचडी खात असत. आता म्हणाल यात काय विशेष? विशेष आहे तो म्हणजे खिचडीचा केलेला उल्लेख. राज्याभिषेक जेव्हा झाला, तेव्हा हेन्री ऑक्झेण्डन हा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.त्याने लिहून ठेवले आहे, की मराठे डाळ-तांदळात लोणी घालून खातात! त्याला तरी काय माहिती म्हणा मुगाची खिचडी! [बाकी खाण्याच्या बाबतीत म्हणाल तर मोगलाई आणि पेशवाई जास्त इंटरेस्टिंग आहेत, पण त्यांपैकी प्रत्येकाचा परामर्श घ्यायचा तर स्वतंत्र पुस्तकच हवे. असो.] आणि प्रसंगवशात काजू-पिस्ते तर नक्कीच खात असतील. पापड-सांडगे देखील रायगडावर केले जात असावेतच. पण तत्कालीन पदार्थांबद्दल एतद्देशीय साधने पहिली तर ब्राह्मणी जेवणाचे डीटेल वर्णन समर्थ रामदासांच्या एका रचनेत आहे. त्यावरून काहीसा अंदाज बांधता येतो.

[जाता जाता :”Shivaji’s visit to Aurangzeb at Agra” या जदुनाथ सरकारांनी संपादित केलेल्या राजस्थानी पत्रसंग्रहात शिवाजीमहाराज दिसायला कसे होते , याचा उल्लेख आला आहे. अस्सल पत्रातील वाक्यांचे सरकारांनी इंग्रजी भाषांतर केले आहे तेच खाली देतो:
” At first sight, Shivaji’s body looks lean and short, but he is wonderfully fair in complexion, and even without knowing who he is, one does feel that he is a ruler of men. His spirit and manliness are apparent from his demeanor. He wears a beard.”
अजूनही बरेच वर्णन पुढे आहे, पण त्यातील मुख्य महत्वाचा भाग वर दिला आहे. वरील वर्णनावरून असे दिसून येते, की महाराज उंचेपुरे म्हणावे असे नव्हते. आणि त्यांची अंगकाठीही जराशी बारीकच होती. पण हे वर्णन आहे इ.स. १६६६ चे- महाराज तेव्हा ऐन छत्तिशीत होते आणि तो काळ सर्वात धामधुमीचा होता. पुढे १६७० नंतर जराशी स्वस्थता लाभल्यानंतर मात्र महाराजांचे वजन बर्यापैकी वाढले. याला पुरावा म्हणजे त्यांच्या राज्याभिषेकावेळी जी सुवर्णतुला झाली, तिला हजर असलेल्या एका इंग्रजाने नमूद केले आहे, की महाराजांचे वजन सुमारे ७०-८० किलो असावे.हा अंदाज अर्थात मोहोरांच्या संख्येवरून आणि एका मोहोरेच्या साधारण वजनावरून केला गेलेला आहे. असो.]

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत. Bookmark the permalink.

35 Responses to शिवरायाचे कैसे भोज‌न‌ क‌र‌णे?

 1. पिंगबॅक Tweets that mention शिवरायाचे कैसे जेवणे? | Manogate's Blog -- Topsy.com

 2. आल्हाद alias Alhad म्हणतो आहे:

  chhan mahiti
  ajun liha ya vishayavar

 3. निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

  आल्हाद, प्रतिक्रियेबद्दल आभार. अजून लिहिण्याची इच्छा आहे, पाहू कसा वेळ मिळतो त्याच्या अभ्यासाला.

 4. Nikhil Sheth म्हणतो आहे:

  अती उत्कृष्ट बेल्ल्या…. You have that material is nothing but what this article of yours exemplifies… Great…

 5. जास्वंदी म्हणतो आहे:

  मधे कुठेतरी वाचनात आलं होतं की त्यावेळेस साखरही नव्हती.. गुळ वापरला जायचा
  आणि मिरचीसुद्धा भारतात नंतरच आली, महाराजांच्या काळात काळ्या मिरीचा वापर होत असे.. असं वाचलं होतं.

  source लक्षात नाही 😦

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   महाराजांच्या वेळी म्हणजे इ.स. १७ व्या शतकात मिरचीचा वापर फारसा होत होता का? पोर्तुगीज लोकांनी मिरची भारतात आणली, ती साधारण पणे इ.स. १५०० ला वगैरे. त्यामुळे महाराजांनी मिरचीचा आस्वाद घेतला असण्याची शक्यता कमी आहे. आणि साखर म्हणाल तर खूप आधीपासून साखर भारतात आहे. “शर्करा” हा संस्कृत शब्दच त्याची साक्ष पटवतो. जुन्या काळी मंगल प्रसंगी हत्तीवरून साखर वाटण्याची परंपरा होती. सारांश, महाराजांनी “चिली चिकन” खाल्ले नसले तरी साखर नक्की खाल्ली असेल.

 6. मनोहर म्हणतो आहे:

  आता वापरला जाणारा बटाटा पोर्तुगीजानी आणला असला तरी पत्थरफोड या नावाचा बटाट्यासारखा कंद आधीपासून अस्तित्वात आहे.

 7. शब्दांकित म्हणतो आहे:

  सुरवातीचे तानाजीचे प्रसंग मजेशीर आणि तुमची चिली चिकन ची कॉमेंट ही! लेख छान झालाय. इन्टरेस्टिंग!!!

 8. chetan म्हणतो आहे:

  bokad khayache ka????
  32 datancha bokad kapalyacha ullekh athawato 🙂
  kanda pithala sudda asawa tyanchya jewana,.
  hapoos aambe khayache ka shiwaji maharaj??

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   चेतन बाबा चंगळवादी : आपले ब्लॉगवर स्वागत!
   महाराज मटन सर्रास खात असतील का, अशी शंका तर आहेच . बाकी ३२ दातांचा बोकड त्यांनी देवीला बळी दिला हे तर खरेच!
   बाकी आंबे म्हणाल तर हापूस तेव्हा फेमस झालेला असायला हरकत नाही, कारण आल्फोन्सो डी आल्बुकर्क हा गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर १५१० साली भारतात आला, त्यानंतर काही वर्षातच हापूस आंबा त्याने भारतात आणला. त्यामुळे हापूस त्यांनी खाल्ला असेलही. आणि कांदा, भाकरी पिठले तर साथीदारांसोबत नेहमीच खात असावेत.

 9. Nikhil Sheth म्हणतो आहे:

  Aple article atishay surekh ahe. Tatkalik anna dhany aani anna padarthancha utkrusht paramarsh getla ahe.. fakt doodh ani doogdh-janya padarthancha ullekh to kahisa adhalala nahi… Maharaj roj sakali glass bharun doodh peun sadarewar jayache ka??

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   थांकू! आणि दुग्ध जन्य पदार्थांबद्दल म्हणाल तर तो उल्लेख राहिला खरा. somehow तिकडे लक्ष गेलेच नाही फारसे. पण पाहीन नक्की.
   जाता जाता: आईस क्रीम सदृश पदार्थ अकबराने खाल्ल्याची नोंद आहे. महाराजांची नोंद आता परमानंदांनाच विचारतो.

 10. सौरभ म्हणतो आहे:

  मजा आली. उत्कृष्ट लेख.

  मावळ्यांनी खालेल्या कांदा लसणाच्या वासानेच मुघलांना सळो की पळो होत असावे असा पुलंच्या पुस्तकात काहीतरी उल्लेख वाचल्याचे स्मरण झाले!

  पु.ले.शु.

  ‍‍BTW, On Baraha,
  र्‍या = r + ^ + yaa

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   थांकू सौरभ! तो उल्लेख गाळीव इतिहासातील आहे: पु ल म्हणतात, की मर्द मराठ्याचा दरारा कसा? तर हाती तळपती तलवार आणि मुखी धारदार उर्दू! त्या उर्दूच्या धसक्याने औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बर्हानपुरी प्राण सोडला असे म्हणतात…हेहेहेहे!! कळायचं बंद !!
   मावळे होतेच तसे डेंजर!
   आणि बारहा च्या टीप बद्दल आभार.

 11. मनोहर म्हणतो आहे:

  कंदाचे नाव पत्थरफोड असे नजरचुकीने पडले आहे. ते पत्थरचूर असे आहे.
  पंजाबी/मद्रासी बटाटा या नावाने हा कंद बाजारात मिळतो. महाराष्ट्रात याची लागवड आता होत नाही. शेतात भाजीपाल्याचे मळे लावताना हा कंद केव्हा केव्हा लावला जातो.
  मिरचीचा हाच प्रकार आहे. पोर्तुगीजानी मिरचीची एकच जात (बहुधा लवंगी) आणली. इतर जाती अस्तित्वात होत्याच.
  हापूस आंबा पोर्तुगिजानी आणला असला तरी निवडपद्धतीने आंब्याच्या जातींची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न वॆदिक काळपासून चालू आहे.

 12. Gangadhar Mute म्हणतो आहे:

  छान माहीतीपुर्ण लेख.

 13. mandar17390 म्हणतो आहे:

  Tu mi jinkla ahaat!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!kai lihila ahe wahhhhh!!!!!!!!!BHOOK LAGLI!!!!
  baki ajun 1000 varshani lok aplya vejvna baddal asech boltil ter tyachi shanka nirsan karnya sathi manun apan kahi shilpe vagire keli pahijet,
  Tya madhe sadhya chy mahatwachy padarthancha samaavesh karu
  1 WADA PAV,bhaji vagire upprakar
  2 MISAl (kolhapuri ani puneri ase waad nakot jar puneri ter mag bedekar ki bapat vagire sub waad pan nakot)
  3 BHEL ani upprakar
  4 PAV BHAJI
  5 UKDI CHE MODAK!!!
  6 BAKI BENGOLI MITHAI VAGIRE CHALEL

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   बहुत बहुत थांकू मंदार! आणि सध्याचे पदार्थ जतन करायचे तर त्वा दिलेली लिस्ट बेष्ट आहे एकदम!
   त्यात मी अजून काही पदार्थ सुचवेन:
   पुरणपोळी
   कडबू
   जिलेबी
   पेढे (सातारी कंदी, नरसोबावाडीचे आणि धारवाडी)
   गेलाबाजार काही पंजाबी पदार्थ.
   खरंतर ही लिस्ट म्हणजे मारुतीच्या शेपटाप्रमाणेच लांबत जाईल, पण असे काहीतरी केले पाहिजे हे निर्विवाद. इ स पूर्व ४थ्या शतकात ग्रीस मध्ये असे एक cookbook होते, त्यावरून लोकांना आजही पुरता अंदाज लावता येतो की पेरीक्लेस इत्यादी मंडळी काय खात असतील. तसे काहीतरी केले पाहिजे हे नक्की.

 14. vedvati म्हणतो आहे:

  hi!wachun faar chhan watalechala ya nimittane ka hoina ki aapan swayampakgharat dokawlat

 15. VIJAYKUMAR VINAYAK BHAWARI म्हणतो आहे:

  mala hi mahiti awadli yat sabudana protugijani aanala he rahile …. marathit kase lihayce

 16. sachin म्हणतो आहे:

  nikhil dada,khup chhan lekh lihila aahe.parantu subject historical aslyane aankhi jaast references dene garjeche aahe,ase mala vatate.

 17. VIJAYKUMAR VINAYAK BHAWARI म्हणतो आहे:

  nikhil bellrikar, kuthe aahat ….. tumchi mahiti ajun vachychi aahe ???

 18. Pratik म्हणतो आहे:

  Puran poli?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s