न गजबज न बजबज – फक्त मिरज. —

मिरज नगरपालिका

miraj

सिध्दीविनायक हॉस्पिटल

hospital

आज थोडका फ्री जाहलो, तस्मात मिरजेवर काही लिहावे ऐसा मानस. मिरज ही अस्मादिकांची आद्य कर्मभूमी. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर आणि कानडी मुलुखाच्या तोंडाशी वसलेले छोटेसे गाव. जवळपास म्हैसाळ, शेडबाळ , नरवाड, टाकळी, कळंबी इत्यादी अगणित खेडी आणि सांगली, जयसिंगपूर, कोल्हापूर इत्यादी शहरे. कृष्णा नदी जवळच तीनेक मैलांवर अर्जुनवाडला. मस्त हवा, सुपीक माती, आणि तसेच लोक. येथेच अस्मादिक पहिल्यांदा बागडले, येथील गल्ल्याबोळांतून यथेच्छ सायकली फिरविता फिरविता आणि किल्ल्याच्या भग्न खंदकात शिल्लक असलेल्या गुढगाभर गढूळ शेवाळलेल्या पाण्यात मगरी हुडकायचा फजूल प्रयत्न करता करता बालपण सरले, विद्या आणि वित्ताच्या शोधार्थ आधी कृष्णा ओलांडून “पुनक विषयात” ४ संवत्सर वास्तव्य केले , त्यानंतर महानदी ओलांडून वंगदेशी पदार्पण केले, पण या देशांतरात मिरज मात्र धृवपदी अचल होते आणि आहे.

मिरजेचा इतिहास अभिमानास्पद आहे हे नक्की. शिलाहार काळापासून कर्नाटकात जाण्याच्या मुख्य व्यापारी मार्गावरील महत्वाचे ठाणे म्हणून मिरज लोकांना माहीत होते . त्या काळात (इ स १२ व्या शतकात) मिरजेत “वीर वळंज ” नामक व्यापारी संघटना होती, ज्याचे ४००० पर्यंत सदस्य होते की जे पार तेलंगणापर्यंत व्यापार करीत असत. बहामनी आणि आदिलशाही काळात मिरजेचा भुईकोट किल्ला बांधला गेला. सतराव्या शतकातील महाराष्ट्राची जी ३ उत्तुंग शिखरे – समर्थ रामदास, तुकोबा आणि शिवाजीमहाराज यांपैकी तुकोबा सोडले तर बाकी दोघांनी येथे हजेरी लावलेली आहे समर्थशिष्या वेणाबाई या मिरजेच्या.वेणाबाई मठ मिरजेत आजही आहे. पुढे पेशवाईत मिरज पटवर्धन घराण्याकडे आले आणि या घराण्याने पेशव्यांची दक्षिणेकडील आघाडी कायम मजबूत ठेवली. प्रसिद्ध सरदार बापू गोखले हेही मिरजेचे- ज्यांनी पुण्याची इंग्रज रेसिडेन्सी उध्वस्त केली १८१८च्या खडकीच्या लढाईत. प्रसिद्ध इतिहासकार वासुदेव शास्त्री खरे हेही मिरजेचे. शारदा नाटकाचा पहिला प्रयोग हादेखील मिरजेत झाला हंसप्रभा थिएटरमध्ये.स्वातंत्र्यसैनिक पुंडलीकजी कातगडे हेही मिरजेचेच. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांनी गांधर्व महाविद्यालय मिरजेतच सुरु केले. मिरजेचे संस्थानिक पटवर्धन संगीतप्रेमी असल्याने येथील संगीताला बहर आला. अब्दुल करीम खान हेही मिरजेचे- आणि (अस्मादिक स्वत:ला बहुत बहुत धन्य समजतात, कारण त्यांच्या घरापासोन ते जवळ राहतात ) असो.आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, विनायकराव पटवर्धन हे दिग्गज देखील मिरजेचेच. संगीतातील या महान तार्यांची प्रभावळ मिरजेतच वाढली.( इतका मोठा काल आणि इतके लोक एका परिच्छेदात कोम्बण्याचे एकमेव कारण म्हणजे पुढील अजून १ लेख यावरच असेल.)

मिरजेत काय आहे? बेष्ट हवा, मोकळी जागा, पहावे तिथे अनेक बेष्ट तंतुवाद्ये, असंख्य दवाखाने आणि….आणि द्विपाद, सोबत चतुष्पाद(गाई, गर्दभ हे मेजोरीटी) मिरजकर त्यांना विचारले की म्हणतात- डॉक्टर,धूळ आणि गाढवे( मी नाही हो त्यातला!) आणि पुण्यामुंबईकडचे आंग्ल पेपरवाले देखील चुकून कधी मिरजेवर मेहेरनजर झालीच, तर चक्क गाढवांची बातमी देतात! (अर्थात हे मी प्री-दंगल बोलतोय हे ध्यानी असू द्यावे.) डॉक्टर तर असंख्य आहेत- त्याबाबतीत काहीसा वाराणसीप्रमाणे प्रकार आहे खरा- रुग्णांपेक्षा डॉक्टरच जास्त! आणि तेदेखील अगदी “सब ट्रीटमेंट १० रुपये” पासून स्पेशालीस्ट, सुपर-स्पेशालीस्ट आणि सुपर-डुपर स्पेशालीस्ट. दक्षिणेकडील तसेच कोकणातील लोक त्यांना आपापल्या गावी करमेनासे झाले, की मिरजेला हजेरी लावून जातात. धूळ तर पाचवीलाच पुजली आहे- पण चार्ल्स नेपियरने म्हटल्याप्रमाणे “आम्ही धुळीत राहतो , धूळ खातो”, त्यामुळे धुळीस देखील धुळीस मिळविण्याचा महान पराक्रम केलेले हे मिरजकर! बाकी तिसर्याबद्दल बोलावे तर यांची पैदास जगात सगळीकडे आणि प्रमाणाबाहेर आहे. त्यामुळे मिरजेने तरी कुणाचे गाढव मारलेले नाही या बाबतीत.

बाकी मिरजकरांची भाषा हा खास संशोधनाचा विषय आहे. इथली मराठी ही कन्नडचा एक खास लहेजा घेऊन आलेली आहे. त्यामुळे अस्सल मिरजकर मराठी माणसाची मातृभाषा ही काहीशी कन्नडमोळी मराठी आहे. ह्या अद्वितीय भाषेतील काही खास शब्दप्रयोग अगदी वेचीव नग आहेत, जसे की “मारणे”. या शब्दाचा अर्थ मारणे, मारामारी करणे असा आहे हे चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्खा मराठी माणूस मान्य करतो. पण मिरजेत मात्र तसे नाही. इथे “मारणे” हा शब्द “करणे” या अर्थी वापरला जातो. खास मिरजकरी मराठीचा नमुना म्हणून खालील उतारा पाहण्यासारखा आहे:

अ: कुठं चाललायस एकटाच सायकल मारत ?
ब : अरे गेल्तो हवा मारायला .
अ : परवा त्या हिला कोण प्रपोज मारला म्हणे?
ब : काय की माहित नाही . पण क तिला कायम कट मारायचा .
अ : क कायम ऐंशिने गाडी मारतो नुसता गावभर फिरत असतो. थांबताना ब्रेक पण असा कचकन मारतो.
ब : कॉलेज तर कायमचेच बंक मारतो.
अ : सोड रे , त्याला जाऊदे कृपामयीत. आपण एक चहा मारू चल .

या संभाषणात एका “मारणे” या शब्दाचे इतके पैलू आहेत, पण हे तर हिमनगाचे टोक आहे फक्त. विविधतेतून एकते ऐवजी “एकोऽहं बहु:स्यां” हे इथले सूत्र आहे . आणि “कृपामयीत जाणे” हादेखील तसाच एक वाक्प्रचार. खड्ड्यात जाणे, तेल-तूप लावत जाणे इत्यादी सर्व तत्सम आणि तद्भव शब्दांचे प्रतिनिधित्व करणारा हा वाक्प्रचार.

ही झाली मराठी. पण हिंदीची चिंधी फाडण्यात देखील मिरजकर अजिबात कमी नाहीत. औरंगजेबाच्या मृत्यूत मिरजेच्या हिंदीचा सिंहाचा नसला तरी वैतागाचा वाटा नक्कीच असावा, असे खुद्द पु ल त्यांच्या गाळीव इतिहासात एके ठिकाणी म्हणतात. खासा औरंगजेब मिरजेत १७००(किंवा १७०१) साली आला, जानेवारी ते फेब्रुवारी २ महिने राहिला, त्या अवधीत त्याला ह्या हिंदीचा संसर्ग झाला असावा, असे म्हणण्यास बरीच जागा आहे. पण ही हिंदी ही मराठी + कन्नड उद्भव आहे . ती सुरु होते ती मराठीपासून आणि संपते तीदेखील मराठीच्याच कुशीत.

अ: अरे वो तेरी फुवा का बेटा कामा नई करता, खाली बोलता “मै आता जाको, तुम लोगा काम करो बोलके.
अ; “ऐसा असतंय व्हय?”
ब : वहीच मै बोल्या उसकू, कबसे करतंय, ऐसे कामा करते तो लोगा आते नई.
अ: अम्मीको बोलतू मै तो बोलता ऐसिच तेरी दोस्ती, निस्ता बसतंय.
ब: बडी फज्जरसे देख्या उसे, सब मापा, टेपा, पायपा वहीच पड्या था.
अ: आज तो अब्बाको बोलता मै, ये आदमी कामा नई करता, अपनेको नई परवडेगा,
नया आदमी होना अपनको.

हाडाचा मिरजकर हा मिरजेचा जाज्वल्य अभिमान घेऊन असतो. कोणी सांगलीशी तुलना केली, की लगेच शेरीनाला, गव्हर्नमेंट कॉलनीमधील दरवडे , असे विषय काढावेत, म्हणजे सांगलीकर बिचारा गप्प होतो. आणि मिरजेतल्या मिरजेत तरी प्रकरण धड आहे का? “गावात” उर्फ ब्राह्मणपुरी भागातील लोकांनी मिरजेचा मक्ता घ्यायचा की मेडिकल कॉलेज आणि रेल्वे स्टेशन जवळच्या लब्धप्रतिष्ठितांनी? यावरही छुपे अभिमान बाळगले जातात. पण अशी भांड्याला भांडी लागली म्हणून काही मिरासाहेबाच्या उर्सातील गम्मत कमी होत नाही आणि बसाप्पाच्या पेढ्याची चव कमी होत नाही, उलट अधिक वाढते. खरे महत्वाचे मतभेद म्हणजे भेळीत भेळ ही गाडगीळ बाईची की परसरामची? आणि राहण्यासाठी बेष्ट एरिया कोणता? हे आहेत. लाखभर वस्ती असलेल्या या चिमुकल्या गावात देवळे, मशिदी, चर्चेस आणि जैन बस्ती या सर्वांनी हजेरी लावली आहे, तीसुद्धा खूप आधीपासून. एक प्रकारे भारताचे प्रतिबिंबच असलेले हे माझे छोटेसे गाव मिरज – त्याच्या इतिहासाचा थोडासा मागोवा मी इतिहासाच्या भाष्यकारांना वाट पुसत घेणार आहे. आपण सर्वांना त्याची माहिती असावी, म्हणून हा लेखनप्रपंच.

क्रमश:

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत. Bookmark the permalink.

51 Responses to न गजबज न बजबज – फक्त मिरज. —

 1. हेरंब म्हणतो आहे:

  सुस्साट लिहिलं आहेस रे !!.. जाम आवडलं. अगदी मिरजेच्या गल्लीबोळातून सायकल मारल्यासारखं आपलं हाणल्यासारखं वाटलं 🙂

 2. महेंद्र म्हणतो आहे:

  जबरदस्त लिवलंय राव तुमी.. लई बेश्ट बगा. लवकर येउंदे दुसरा भाग.

 3. अमोल केळकर म्हणतो आहे:

  मस्त लेहिले आहे आपण. मी सांगलीचा. सांगली मिरज ही जुळी शहरं. पण मिरज शहराने ही आपला खास सांस्कृतीक वारसा जपला आहे. आम्ही लहान असताना अजोळी पुण्याला जाताना मिरज – पुणे या बसने जायचो. त्यावेळी सांगलीहून पुण्यासाठी फार थोड्या बस होत्या. आणि मिरज – पुणे ही प्रतिष्ठीत बस सेवा होती.

  असो.
  पुढील लेखनास शुभेच्छा !!. मिरज जंक्शन, मिशन हॉस्पीटल याचे फोटोही लावा

  आपला

  अमोल केळकर

 4. shreenivas म्हणतो आहे:

  belya, lay bharee
  marlay bhava…

 5. Mandar Karanjkar म्हणतो आहे:

  sarkar krupene Ichalkaranji la rahanyacha yog ala……….tyatach mirjela adhun madhun janyache bhagya amhala labhate……..sakshat tya athavani ubhya rahilyat…….

 6. pratik म्हणतो आहे:

  किती ही मारामारी !

 7. Aniruddha G. Kulkarni म्हणतो आहे:

  Thanks for the wonderful picture of Miraj market. Little seems to have changed there in last 20 odd years, since I went there. There was “Miraj tea depot” near the signboard of “Modern tea depot”. Is it still there?

  When I was a kid, those tea depots were some of the most hip shops in Miraj then.

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   Welcome! Yes, little has changed in Miraj except the much-ridiuled signals near killa entrance and some minor changes. Brahminpuri is changing rather rapidly.new appts. springing…..and outskirts being developed..but yes, overall bit same.

   About the tea depot, I am afraid I don’t know. In the last one and 1/2 year, I have travelled less often to Miraj, so really cant tell. Sorry 😦
   But will know definitely in december. Indeed Interesting to know about the hip shops!

 8. Ek mirajkar म्हणतो आहे:

  a nice description of our beloved town. what i suggest is that since you know so much about the history of the town why don’t you update the miraj wiki on wikipedia. also we are eagerly waiting for the next installment. Good work, keep it up!

 9. anita nadkarni म्हणतो आहे:

  its a great pleasure to read alot about miraj .i spent my childhood there .and i was studing in miral kanya shala at that time. .rightnow when i see my school photographs i still remember my all teachers whom i miss alot.i still remember urus and nirupan of bodas sir.i still remember so many beutiful things of miraj.i feel to visit miraj sometimes.but i dont know whether it will be the same which i left about thiry to thirtyfive years back.thnks alot for updating my knowledge of miraj .may god bless you.

 10. samir sattigeri म्हणतो आहे:

  gr8 , mirajecha julani katta , monopoly in world , we should consider this branding…..

 11. anita nadkarni म्हणतो आहे:

  hi nikhil,
  how are you?for so may days you have not written about miraj. achha nikhil still laxmi market is there? and gogate stationery shop .then one undale vastra bhandar ,kopardevastra bhandar are these old shops are still there?i still remember these shops as we used buy so many chintu pintu items from there.i still remember brhman galli,threre was one vitthal rakhumai mandir.we used to live near my school and my father was on trasferable job,working with miraj medical college(part of state govt )
  some day or other i will visit miraj. i hope at that time i will meet you..regards———anita aunty

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   Hi Anita aunty, nice to hear from you. I am fine, thanks for asking.

   I have been busy recently and as a result have not got much time to write about Miraj. Now, Laxmi market is still there, just as before. I Don’t remember the Undale and Gogate shops, but Koparde bhandar is there, they have modernised it. Vitthal Rukmani mandir is also there in the same old form near Khare Mandir.

   We can surely meet if I happen to be in Miraj while you are there.

 12. kaloday kadam म्हणतो आहे:

  ahooooo !!!! pan tumi mairaj badal sangitale evde sagle pn tumi miraje badal sangatana aaple gram devat khaja shaman mira cha dargya badal kahich sanitle nahit hoooooo ase kaaaaaaa ????????

  ani evdya mirjetlya thor lokanchi yadi aapan tumcha lekha madhe takli pn ek naav tumi visarlat kase ???????
  aaplya mahiti sathi sangto LAVNI SAMRAT SANGITKAR RAM KADAM he pn mirajkar hote .

  lakshat theva ani reply mazya email var aatvani ne kara …… onlykaloday@yahoo.co.in

 13. sanju म्हणतो आहे:

  aplya miraj badl lekh lihlya mule amhi mirajkara na abhiman vatto. miraj chote ahe pan mahan ahe.abinandan.

 14. Aniruddha G. Kulkarni म्हणतो आहे:

  Enjoyed reading this one more time, Nikhil.

  You say: बसाप्पाच्या पेढ्याची. For me, Basappa was best for khwaja’s. Wherever I go and whatever age I reach, not a month goes by, I don’t remember khwaja.

  Also, it was interesting to read Ms. Nadkarni’s comments.

  Gogate and Undale were two of the most hip places to hang around. Gogate, located in left corner of the picture of Laxmi market on your blog, for stationery and other sundry stuff and Undale for sarees.

  Gogate was eclipsed by ‘Bombay’, owned by a Sindhi- very friendly, soft speaking- gentleman and Undale- our close family friends- were done in by sibling rivalry.

  I also wonder if Ms. Nadkarni knows my classmate in Bharat Bhushan- Ms. Smita Taksale whose father too, I remember worked for Miraj medical college.

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   Great to know that you enjoyed re-reading it 🙂

   Much of the details regarding Gogate and Undale were unknown to me. Since we do not live in Brahminpuri, I am unaware of all this.

   As for Khaja, I agree completely. Only thing is that Khaja is not my favourite, so I just chose my favourite sweet- could have said Malai Barfi as well 🙂 I basically wanted to point out the quality of Basappa Halwai.

 15. Gajanan Chavan म्हणतो आहे:

  nice………..miraje baddal wachun kharcha khup bar watle me pan miraje chach pan service sathi baher padlo ani……..jawde tumhi mirajechya Ganpati Ustava baddal kahicha lehale nahi, ganpati visarjan mirawanuk kharch kiti mast aste “TE RATRA BHAR WAJNARE BANJO, DOLBI,BAND” Ani nachnare karyakarte ,Ganpati che swagat karnyasathi ubhe karnyat aalelya swagat kamani Kharecha kiti mothe aste, me ti dusrya thikani pahili nahi kiti ustaha asto to ……………….nadcha khula…. Ganpati pula ,Shivayaaaaaaaaaa mirajet sajre honare shiv jayant,,,sarva dharma sambhavne sajri honari ………id- e- milid………Kharcha wisru mhantle tari wisrat nahi………………………..Tumchya pudhchay lekhachi wat bagat aahot……………………………Ganpati Bappa Morya ……………..Gajanan

 16. Ravi Sambargikar म्हणतो आहे:

  pharach chan……………… mirje vishayi pharach chan lihele ahe phudhacha bhagachi vat baghtoy.

 17. Sadanand Kitture म्हणतो आहे:

  हाडाचा मिरजकर ……:)

 18. RASHMI BHIDE म्हणतो आहे:

  atishay sundar lekh. ani mahatwach mhanaje konatyahi babatit dumat nasanara.

  EKDAM SAHICH

 19. MUPHID MUJAWAR, मिरज इतिहास संशोधक मंडळ, मिरज म्हणतो आहे:

  KHUP CHAN NIKHIL……YOU HAVE TO CONTINUE THIS….!

 20. गणेश पावले म्हणतो आहे:

  निखील सर
  खूप छान माहिती लिहिलीय मिरज बद्दल………….
  सर मला भुईकोट किल्ल्याबद्दल थोडी माहिती पाहिजे होती……….
  तुमच्याकडे काही माहिती असल्यास ganeshpavale@gmail.com
  या मेल आई डी वार पाठवा……..अथवा तुमच्या ब्लॉग वार लिहा…
  धन्यवाद
  गणेश पावले

 21. Umesh Yeware म्हणतो आहे:

  नाद खुला निखिल सर्….

 22. rohit म्हणतो आहे:

  Bellya bhari yar .. sahi ahe…
  marathi n hindi baddal je ahe ti patnya n hasnya sarkhe nakkich ahe

 23. Swapnil Patil म्हणतो आहे:

  Mastach………….i feel very proud now 😀

 24. MohsEin Maner म्हणतो आहे:

  Nikhlya bhava ekk number re…..

 25. Gajanan chavan म्हणतो आहे:

  Nikhil Sir,
  wat bahato aahe pudhachya lekha chi
  lavkar liha raooooooo

  ………………………..Gajanan

 26. संतोष बंडगर म्हणतो आहे:

  छान…..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s