केरळकोकीळ आणि एक मोरोपंती चाळा

नुकतीच, कशी कोण जाणे, केरळ कोकीळ या आता विस्मृतीवश झालेल्या मासिकाची फार तीव्रतेने आठवण आली. ते मासिक वाचण्याचा मला तरी योग नाही आला, पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस सर्व लेखकांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. माझ्या आठवणीप्रमाणे कोणी कृष्णाजीपंत जोशी म्हणून ते मासिक चालवीत असत. (चूकभूल देणे घेणे) त्या मासिकात विविध गोष्टी येत असत. पण खालील आर्या तेव्हा मराठी आणि इंग्लिश च्या मिश्रणामुळे खूप गाजल्या होत्या. त्यांचा एक मासला खालील प्रमाणे आहे-

मिस्टर नानाभाई. तुम्ही जो धाडीलात सर्व्हन्ट |
गुड फॉर नथिंग आहे, अदराची लागली असे वोन्ट(want ) ||

यास्तव पर्सनलीने दुसरा बहु बेस्ट man सेंड करा |
पडला मोर पे जरी, केअर त्याची मुळीच न धरा ||

ट्रेनीतुनी मेहुणीला करितो आज dispatch बॉम्बेस |
कारण तिचा म्हातारा आहे बहु ओल्ड आणि डाम्बीस |

या ओळी परवा अचानक मनी आल्या, आणि येक मोरोपंती चाळा करावा, असा विचार मनी आला. अर्थात भुजंगप्रयाताची यातायात करणे आणि शार्दूलविक्रीडीतांची आयाळ कुरतडणे जरी जमले तरी आर्या ही खास मोरोपंतांची….त्या ३० मात्रांवर मात्र मात्रा चालत नाही, आणि कदाचित चाललीच, तर मात्र त्या मात्र होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पात्रापात्रतेचा निकष लावून त्याला कात्री लावण्या आधी ही अस्मादिक-आर्यावली सादर करीत आहे.

ऐसेची देखता आला तुम्हीच अमुच्या आठवणीत |
अनुदिन मनी येतसे मजसी तुमची मज आठवण नीट |
स्तव तव आळवीन मी, विविधही रसमयी आठ वाणीत |
लोक ते सकल जगती, तुजला बहु इति आणि अथ वानीत | |

अर्थात ही अवजड आर्या नसून सुटसुटीत आर्या आहे हे सुटलेल्यांना आणि न सुटलेल्यांना सांगणे न लगे(!). यातून पाकनिष्पत्ती झाली , की पाकिस्तान उजाड होईल, हे मात्र नक्की. एकदा ते झाले, की मग स्त्रियांना आवडणारे शिकरण करता येईल.( नारी-केल-पाक) आणि मग मात्र द्राक्षरसाची मिजास (मी-जास्त) संपेल . आणि मग-

द्राक्ष लोकी क्षयो जाला | राम नारळ संगमे |
उदंड खोबरे झाले | चटणी ती करावया||
कितीही करिता डोसे | चटणी नच संपते|
सांबार-ए -इडलीसाठी | निधी तो नष्टला जरी||

असो. कदाचित माझे डोके ठिकाणावर नाहीये बहुतेक. पण कृष्णमौक्तिकाचे कप्तान म्हणतात त्याप्रमाणे ठिकाणावर आहे ते डोके कसले? आणि १९५३ साली शिवाजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ठिकाणावर नसलेली डोकी उडविण्याचा हुकुम औरंगजेब देणार नाही याची खात्री आहे अस्मादिकांना. त्यामुळे प्रिय वाचकांनो,( त्यांचे अस्तित्व का कुणास ठाऊक , मी गृहीत धरले आहे.) आजच्या पोस्ट चा एकमेव हेतू म्हणजे मी आलो आहे..पुनरेकवार मी आपली डोकी यथासांग खाईन….हेहे…

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

4 Responses to केरळकोकीळ आणि एक मोरोपंती चाळा

  1. Ketaki म्हणतो आहे:

    Interesting and cute ! Asech lihit raha…Nikhilbabu…:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s