अस्वस्थ योद्धा ( धनुष्य न मिळालेला)

काहीच सुचत नाहीये..जग कुठून कुठे चाललंय, कसल्या कसल्या घडामोडी होताहेत आणि मी नुसता हातावर हात ठेवून गप्प बसलोय.अरे पण मी असा आहे तरी कोण? कोणीच नाही. मला माहिती आहे की मी कोणीही नाही, पण हे मन स्वस्थ बसू देत नाही खरे. अशी ओढ लागलीये , की जिणे अशक्य करून सोडलेय. तिथे घडताहेत रोजच्या रोज रामायणे आणि महाभारते , युद्धे आणि विश्वयुद्धे आणि मी मात्र अजून घरात च बसलोय. तिथे किल्ल्यांवर किल्ले उद्ध्वस्त होताहेत, अस्त्रांवर अस्त्रे सोडली जाताहेत, आणि मी माझे गंजलेले भाले-बाण नुसतेच पाहत बसलोय. ही शस्त्रे मी परजणार तरी कधी, त्यांच्या सहाय्याने युद्ध करणार तरी कधी आणि थोडाथोडका योद्धा होणार तरी कधी? कधी? कधी?

हे काय चाललंय नेमकं? सध्या गणित विश्वात अशा काही घडामोडी घडताहेत, की स्वस्थ बसवत नाही. हैदराबादेत आता स्वयंवर होणार आहे गणिताचे- सगळे अतिरथी महारथी येतील तिथे. आणि मेडल श्री तिथे वरेल एकाला. कोण कोण येणार आहे बरे तिथे? एस आर एस वर्धन , ngo chao यांसारखे द्रोण-अर्जुन तिथे उपस्थिती लावतील. बऱ्याच अस्त्र-शस्त्रांची परीक्षा होईल तिथे. ट्या महा गणित मेळ्याला जाईन आणि संतोष पावेन, असे मांडे मनात खात असतानाच दुसरा एक बॉम्ब पडला.

अमेरिकेच्या उत्तर खंडात विनय देवळालीकर नामक संशोधकांनी P vs NP या गेली ४० वर्षे डोके खात असलेल्या समस्येचे निराकरण केले आहे अशी बातमी पसरली आणि भल्याभल्यांचे धाबे दणाणले. कोणी म्हणाले लई भारी , कोणी म्हणाले अजून वेळ आहे मत व्यक्त करायला , तर कोणी म्हणाले की ब्रह्म सत्य प्रूफ मिथ्या. आर जे लिप्टन आणि इतर प्रस्थापितांनी काही possible चुका काढल्या आहेत, बघू काय होते ते. पण सध्या तरी प्रचंड खळबळ आहे सगळीकडे. वर आणि रफ and टफ सेट आहेत च डोके खायला actuary बरोबर . वैताग……

पण पूर्ण वैताग नाही खरे तर. पाहू बे. अजून रीमान ला तरी कोणी हात नाही लावला न, मग ठीक आहे.

riemann

Advertisements
This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.

6 Responses to अस्वस्थ योद्धा ( धनुष्य न मिळालेला)

 1. Ketaki म्हणतो आहे:

  Ha photo kunacha ahe ?

 2. Mandar Karanjkar म्हणतो आहे:

  हल्ली मराठी मध्ये blogging सुरु केलं आहे. जरूर भेट द्या -www.kirwani.wwordpress.com

 3. prasad म्हणतो आहे:

  अजून रीमान ला तरी कोणी हात नाही लावला न, मग ठीक आहे.

  >>> Reimann la puDhachyaa 100 varshhaat koNee haat laavu shakel ashee shakyataa hee naaheeye 😀

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s