कप्तान jack sparrow

कृष्णमौक्तिकाचे कप्तान आणि महान फिरंगी दर्यासारंग कप्तान jack sparrow ( जीमेल मध्ये jack चे transliteration
जाचक असे होते हे बहुत सूचक आहे) यांचे आम्ही परम म्हणजे अगदी चरम गरम पंखे. उष्ण असो व शैत्य, अस्मादिकांची वाणी
त्यांना वर्णिताना कधीच शिणत नाही. २००४ साली यांनी अस्मादिकांना प्रथम दर्शन दिले आणि आम्ही वात झाल्यागत यांचे पंखे होऊन फिरू लागलो.
असे आहे तरी काय हो यांच्यात? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या एका दर्शनाने मुहूर्तमात्री मिळेल येविषी किमपि आन्येथा नाही .
काय तो रांगडा आवेश आणि काय ते संवाद! अशी चौफेर फटकेबाजी चाललेली नुसती. कमीतकमी किलोभर वजनाचा तो शिरस्त्राणातून खाली घोळणारा नानामणीविभूषित विपुल केशसंभार, भेदक ( की “रम”लेले) डोळे , आणि तितकेच चपळ शरीर ही त्याची शस्त्रे . परंतु त्याचे ब्रह्मास्त्र म्हणजे त्याची बुद्धी. बार्बोसा आणि डेवी जोन्स यांसारख्या खुंखार चाच्यांना मामा बनवणारी आणि कटलर बेकेटसारख्या स्वार्थी अधिकार्यास अस्मान( की समुद्रतळ) दाखविणारी, कृष्णमौक्तिकावरील लोकांनी बंडाळी करून निर्जन बेटावर सोडून दिल्यावरही ना डगमगता “रम्य”पणे लोकांशी डील करून निसटून जाणारी.
अस्मादिकांनी जेव्हा ही त्रिभागिनी चाचामालिका प्रथम पहिली, तेव्हातर मनी इतुका आनंदू ओसंडला की त्यांचे तेच जाणोत. एका आगळ्याच विश्वाचा साक्षात्कार जाहला. हे सागरी विश्व जितके गूढ, तितकेच रोमांचक आणि तर्हेतर्हेच्या खतर्यांनी भरलेले. मज भूचरास त्यांनी पाहता पाहता समुद्री नेले. प्रथम राष्ट्रभाषा हिंदीतील दिव्य संवाद कानावर पडले – जे एरवी dubbing या शब्दाचा मराठी उच्चार सार्थ करतात.पण या मालिकेतील पहिल्या चित्रपटाचा (कृष्णमौक्तिकाचा शाप) संवाद असे अप्रतिम आहेत की काय सांगू. हजारो channels वर लक्ष वेळा आणि आता तर अंकमूर्धा संगणकावर
डाउनलोड करून पाहिले तरी तृप्ती कशी ती झाली नाही. मासला पाहाल तर तो असा आहे:

इथून पुढे cjs = कप्तान jack sparrow ; हे फिक्स.

तर हे साहेब जेव्हा विलच्या लोहारशाळेत लपतात आणि त्यांची चकमक झडते, तेव्हा विलची अशी खेचतात की काय सांगू.

CJS = तुम जाने पहचाने लगते हो. क्या पहले कभी मर खायी है मुझसे?
ये तलवारे कौन बनता हैं?
विल = मै. और रोज ३ घंटे सीखता हूँ.
CJS = तुम्हारी उम्र तो तलवारे चलानेकी नाही, इश्क लड़ानेकी है. ओह्ह…शायद तुम्हारी कोई माशूका है जिसे तुम
तलवार चलाकर खुश करते हो. शायद तुम्हे किसी लड़की को खिश करनेका सिर्फ यही एक तरीका मालूम है…..
(एकवार आपादमस्तक न्याहाळून) कोई गडबड तो नही है ना?

कमोडोर ने पकडले असताना तर असे करारे जवाब देतात की काय सांगू!

कमोडोर norington = “बंदूक मे ना गोली है ना बारूद . एक कंपस जो बिलकुल खराब है. ( तलवार पाहून)
मुझे तो लगा था की तलवार भी लकड़ी की होगी. तुम तो समुद्री लुटेरोंका नाम बदनाम कर रहे हो jack .

CJS = बदनाम होगा तो क्या नाम न होगा? (कमोडोर ला कळायचं बंद ( हा डायलॉग अस्मादिकांनी नंतर अगणित प्रसंगी वापरला))…

आणि त्याचा तो फेव्हरीट डायलॉग –

” साहेबान , मोह्तर्मा; ये शख्स आपको हमेशा याद रहेगा जो आपके हाथ आकर निकल गया – कप्तान jack sparrow . !! ”

त्याला बर्बोसाचे साथीदार पकडतात आणि विल ला आधीच बळी देण्याकरिता आणलेले असते तो तर खल्लास डायलॉग आहे .
विल त्याला एलिझाबेथ बद्दल विचारतो तेव्हा तो म्हणतो-

” वह महफूज है , और कमोडोर से शादी कर रही है जसा की उसने वादा किया था; तुमने उसके लिए अपनी जान खतरे
में डाली जैसा तुमने वादा किया था, और मै यहाँ तुम्हारे साथ आया जैसा मैंने वादा किया था . याने हम सब अपने अपने
वादे के पक्के इन्सान है – एलिज़ाबेथ को छोडके ;क्योंकि वो तो एक हसीं औरत है न!”

असे अनेक मासले देता येतील. पण कप्तान साहेबांना असे जिवंत करणारे जॉनी डेपसाहेब यांची स्तुती करावी तितकी थोडीच.
चाचे= रॉकस्टार हे समीकरण पक्के करून त्यांनी भूमिकेत असा काही प्राण ओतला की बस – ते अद्वैत झाले.

jack sparrow हे प्रकरण इतके गाजले आणि अस्मादिकांच्या मनात एक स्पेशल कोपरा पटकावून बसले. स्वतंत्रतेची
अतिशय तीव्र जाणीव घेऊन सकल करेबियन सागर भ्रमंती करणारा jack म्हणजे स्वातंत्र्याचा एक मूर्तिमंत आविष्कारच वाटतो.
अर्थात नीती-अनीती अशा अर्थ हीन वादात मला शिरायचे नही,पण माणसाची आदिम प्रवृत्ती चेतवून तिचे समर्थन करणारा jack
जबरदस्त भुरळ पडतो हे नक्की.

त्यामुळे वाटते, की खास रिचर्ड बर्टनच्या परंपरेतील पात्र आहे हे. असो. बर्टन साहेबांबद्दल परत कधीतरी.

आणि चाच्यांचे हे राष्ट्रगीत –

Advertisements
This entry was posted in सिनेमा. Bookmark the permalink.

4 Responses to कप्तान jack sparrow

 1. Ketaki म्हणतो आहे:

  त्रिभागिनी चाचामालिका, कृष्णमौक्तिक…भारी !!!

 2. shreenivas म्हणतो आहे:

  kaptansaheb
  jinklet
  hail jack sparrow
  hail nikhil the captain
  ani ha lekh wachnaryansathi vishesh suchana
  nikhil bellarykar he swataha pirates of Caribbean (coep visheshank) hyache nayak ahet (athat jack sparrow)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s