ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी

सचिन ने २०० रन्स केल्या होत्या वन डे मध्ये तेव्हा हे लिहिले होते मित्राच्या ब्लॉग वर…१०० शतकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा शेअर करतोय.

विक्रमांचा महामेरू | बहुत रनांसी आधारू |
अखंड खेळाचा निर्धारु | श्रीमंत सचिन ||१||
सचिनचे कैसे चालणे | सचिनचे कैसे खेळणे ||
सचिनचे प्रेरणा देणे | कैसी असे ||२||
रनपती तो जगती | करा किती उचापती |
डाळ न शिजे पुरती | कोणाचीही ||३||
सचिनचे आठवावे शॉट | पहावा BATTING चा थाट |
पळे BALL पटापट | ग्राउंड बाहेरी ||४||
स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेची होतसे |
बदले CHANNEL मी जैसे | येथ आलो पहा कसा ||५||
सामना चालीला कैसा | शॉट अखंड चालती |
खेळला देव देवांचा | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||६||
आनेक BALL ते येती | मात्रा पै नच चालली |
सचिन कर्ता सचिन भोक्ता | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||७||
बुडाली आफ्रिका पापी(?!) | चेंडू संहार जाहला |
उदंड जाहल्या धावा | रमा रेकॉर्डसंगमे||८||
योर्करू तो जरी आला | सीमा ती पार केलीसे\
कळेना काय रे होते | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||९||
चौके चौके किती छक्के | गणना करवे नच |
ऑफ ऑन चहूलोकी | चेंडू तो भिरकाविला ||१०||
येकला लढला योद्धा | अन्ये गम्मत पाहती|
रनांचा डोंगरु झाला | ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी||११||
हे धरा अकरा श्लोकी | लाभली शोभली बरी|
दृढ bat निसंदेहो | सचिन तो सर्व काळीचा ||
. – निखिल बेल्लारीकर

Advertisements
This entry was posted in कविता-बिविता. Bookmark the permalink.

2 Responses to ग्वाल्हेर ग्रौंडभूवनी

  1. संतोष फटांगरे म्हणतो आहे:

    याहुनी करावे विशेष ! तरीच म्हणवावे पुरुष ! याऊपरी आता विशेष ! काय लिहावे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s