अजि म्यां ब्रह्म ऐकिले……..

पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड :

शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात.

प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती. तशी आपल्या इथली लोकं अडगी ती अडगीच-मग काळ कुठलाही असो. उगीच दंगा करू लागली. मग लोकमान्यांनी सर्वांना कडक तंबी दिली आणि शांत बसवले ; शिवाय गायनकलेबद्दल छोटेसे भाष्यदेखील केले. त्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग झाले त्यात हे अवघ्या एका मिनिटाचे नाट्यदेखील कॅप्चर झाले.

तर मग डॉट्ट सहा वाजता पोहोचलो. केसरीवाड्यात फुल्टू गर्दी . आयबीएन सेव्हन वैग्रे च्यानेलांचे प्रतिनिधी हजर होते. काही पोलीसपण होते. नंतर कळाले की निखिल वागळ्यांची सुधीर गाडगीळ मुलाखत घेणारेत. आधीच तिथे बसायला जागा नव्हती, म्हटलं आयच्या गावात आता २ तास उभारून पायांचा भुगा झाला की मग शेवटी ऐकवतील, पण सुदैवाने त्या मुलाखतीच्या आधीच ऐकायला मिळाली. शेवटी मग लोकमान्यांचा आवाज ऐकला आणि अंगावर एक शहारा उठला. तोच हा आवाज ज्याने “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच” हा नारा देऊन इंग्रजांना कळायचं बंद करून सोडलं होतं. निव्वळ योगायोगाने आणि सेठ नारंग यांच्या गायनप्रियतेमुळे आज हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला.एकदम ती मधली ९७ वर्षे जणू गायब झाली आणि मी २१ सप्टेंबर १९१५ ला केसरीवाड्यात पोहोचलो.

” आजचा कार्यक्रम गणपतिउत्सवाचा आहे. ठरल्याप्रमाणं गायनाचार्य बखलेबुवा यांचं …. गायन सुद्धा लोकांनी शांतपणे ऐकावं, अशी माझी इच्छा आहे. कुणी गडबड केली, तर मी ऐकून घेणार नाही. लोकांनी बाहेर जावं.पण ठरलेला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. भास्करबुवांच्या गाण्याबद्दल, मला काही जे वाटतं, ते वाटतं म्हणजे असं, की माझ्या मते तथापी ही कला मोठी आहे, ………अन् ते काही खोटं नाही. तेव्हा त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की मी जरी मी गाणं शिकलो नाही, तथापी त्या ……बद्दल विचार करावा असं मला वाटतं आणि म्हणून भास्करबुवांसारख्यांना मी इथे … दिली आणि बुवा जर इथे आले , अन कार्यक्रम …….झालेला आहे …..उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, तेव्हा सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो, आणि गणपतीनं प्रत्यक्ष….. चा अर्थ लावून गावं असं मला वाटतं, इतकं बोलून मी आपली सर्वांची रजा घेतो.”

(एकदा ऐकल्यावर परत वन्स मोर च्या गजरात ध्वनिफीत पुन्हा एकदा चालवली गेली. पुन्हा एकदा ऐकल्यावर मग सटकलो तिथून. तसेही एकदा लोकमान्यांचा आवाज ऐकल्यावर वागळे आणि गाडगीळ काय दिवे लावणारेत हे ऐकायची बिल्कुल इच्छा नव्हती.)

ध्वनिफीत इथेच संपली, पण मन अजूनही भूतकाळातच वावरत होते. रत्नागिरी, पुणे, मग पितृनिधन, केसरीची स्थापना, मंडाले, जहाल-मवाळ दरी, होमरूल चळवळ, या सार्‍या घटना क्षणार्धात डोळ्यांपुढे तरळून गेल्या आणि दिसले ते अडिग, अविचल असे लोकमान्य.ध्वनिफितीसारख्या या छोट्याछोट्या गोष्टीदेखील, भूतकाळ आणि वर्तमानकाळ या संज्ञा भास आहेत हे जणू सिद्ध करतात. एक ऑडिओ लोकमान्यांपर्यंत नेतो; एखादे चिटोरे डायरेक्ट छत्रपतींपर्यंत नेते. मधला एवढा मोठा काळ जणू विरुनच जातो आणि ती काळाच्या पडद्याआडची माणसे जिवंत होऊन समोर दिसू लागतात – अगदी हरितात्यांना जसे छत्रपती दिसत तसेच. आणि मग हरितात्यांच्या वागण्यातले मर्म कळते.

कैकवेळेस इष्टमित्र विचारतात, काहीजण खिल्लीदेखील उडवितात. या जुनाट गोष्टींमध्ये काय गाठोडे ठेवले आहे ते त्यांना उमजत नाही आणि त्यांना का उमजत नाही ते मला समजत नाही. पण ती अर्धवट नष्ट झालेली पत्रे , ते देवळाबाहेरचे एकाकी वीरगळ, किल्ल्याचे बुलंद बुरुज, म्हणजे टाईम मशीनची पोर्टल्सच जणू. त्यांच्याशी बोलावे तितके कमीच हे त्या वर्तमानातदेखील पुरतेपणी न रमणार्‍यांना कसे कळणार? एका पत्राआडून छत्रपती आम्हां रयतांची काळजी घेताहेत, तर दुसर्‍या पत्रातून सखारामबापू २२ मोगली सुभ्यांचा हिशेब सांगून मराठ्यांचे सामर्थ्य अधोरेखित करताहेत, तर एखाद्या जीर्ण दासबोधाच्या पोथीआडून सस्मित वदनाने समर्थ “गोष्टी युक्तिच्या चार” सांगताहेत. आता इतके लोक संवादोत्सुक असताना इथे रमू नाहीतर कुठे? हेच आमचं फेसबुक आणि हेच आमचं ट्विटर.

असो. अजून विस्कळीत होण्याआधी थांबतो.

Advertisements
This entry was posted in इतिहास-भारत. Bookmark the permalink.

7 Responses to अजि म्यां ब्रह्म ऐकिले……..

 1. Anonymous म्हणतो आहे:

  I am suspicious about the authenticity of this recording. I am not sure whether any such facility for outdoor audio recording even existed in those days. Some other sound-clip is often peddled as being in Vivekanand’s voice. Remember that V died in 1902 when the only way his voice could have been captured was to invite him to a studio specifically to record his voice, and he was never as big a deal during his lifetime as RSS makes him out to be. The case of fake Hitler diaries, which were serialized in some famous newspapers around 1980, is also well-known.

  While Zohra of Agra, who died in 1913, did leave behind a few recordings, while Abdul Karim Khan did record a few 60-70 second snippets in 1905-1907 span which were recently released on a CD, these are the exceptions, and these recordings were specifically carried out within a studio. Even Vishnu Digambar’s voice, though he died in early 1930s, is not available.

  If Tilak’s voice has really been captured, well and good. But due caution is called for before it is accepted as authentic.

  – dn

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   Hmm. I think you must have read the eSakal news regarding the recording. It is only after numerous cross-references that the descendants of Bhaskarbuva Bakhale, Seth Narang and and Tilak agreed that there was indeed a concert during the Ganeshotsava of 1915; and more importantly; Tilak had to silence the audience. Sources given in the news are:

   “1. केसरी गणेशोत्सवात गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ झाला होता,’ ही मास्टर कृष्णराव यांची आठवण “लोकमान्य टिळकांच्या आठवणी” या पुस्तकात नोंदली आहे. या कार्यक्रमाची नोंद “केसरी’च्या 21 सप्टेंबर 1915 च्या अंकात सापडते.

   2. अशीच नोंद “देवगंधर्व’ या शैला दातारलिखित बखले यांच्या चरित्रग्रंथातही आहे. बखलेबुवांसंदर्भात दातार कुटुंबीयांकडे असलेल्या कागदपत्रांतही, “लोकमान्यांनी गडबड करणाऱ्या लोकांना खडसावून शांत केले,’ असा उल्लेख असलेला मजकूर आहे.

   3. याशिवाय बखले यांचे शिष्य गणेश नरहर श्रीगोंदकर यांच्या हस्ताक्षरात या प्रसंगाचे वर्णन करणारा कागदही दातार कुटुंबीयांना सापडला आहे. याच पुराव्यांच्या आधारे नारंग यांच्याकडील ध्वनिमुद्रणातला आवाज लोकमान्यांचाच आहे, हे निश्‍चित करण्यात आले आहे. ”

   As for the recording facility, the news item says:

   “सेठ लखमीचंद नारंग यांनी 1910 मध्ये अमेरिकेतून केपहार्ट कंपनीचे ध्वनिमुद्रण यंत्र मागविले होते. याच यंत्रावर 1915 मध्ये केसरीवाड्यात झालेला गायनाचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित करण्यात आला. विशेष म्हणजे, हे यंत्र आजही चालू स्थितीत आहे. सेठ नारंग कराचीहून हे यंत्र घेऊन पुण्यात दिग्गजांच्या मैफलींना येत.”

   This and the fact that Grierson’s linguistic surveys of India circa 1920 are still extant convinced me that such facilities; although exceptionally rare at the time, were nonetheless POSSIBLE.

   Moreover, the grandson of Seth Narang was present at Kesariwada when I had gone there on 24 August 2012. Therefore, the odds are in favor of the voice being Tilak’s. What is remarkable is the agreement of contemporary sources about the course of events. In absence of such agreement, I would have been skeptical as well. Such digging up for the sources regarding Vivekananda’s record must be done; that I agree; although in this case I am convinced.

   Still, the Kesari of the date mentioned in news must be checked. As Mr. Arvind Kolhatkar remarked here, the news item has given a wrong date; but not the narrative. These things have convinced me about the veracity of Tilak’s voice.

   As for the late Abdul Karim and Zohra and others, I really wish they had a fan like Seth Narang and some documentary evidence so that their voice could have been recorded for music enthusiasts 🙂

 2. Anonymous म्हणतो आहे:

  While I have no reason to doubt the motives of Mr Narang who was present in Kesari-wada on 24-Aug-2012, it is easier to produce a fake recording and pass it off as Lokmanya’s. This is just the sceptic in me speaking. Even if a recording machine was present, what was the length of a recording that was possible to do using it? Why would the recording be turned on while all that was happening was that Tilak was silencing the crowd? One would expect the machine to be used only while Bhaskar-buwa Bakhale was singing. But note that no authentic and useful piece of Bhaskarrao’s voice is available. It would be more difficult to produce a spoof-recording attributable to Bhaskarbuwa’s singing than to Lokmanya’s voice.

  A few years ago, a recording surfaced which was supposedly in Bhurji Khan’s voice. I was suspicious, and routed it to Shruti Sadolikar. Baba Azizuddin Khan (Bhurji’s son) was alive that time and she played it to him. He said that the singing style was not Bhurji Khan’s at all. Nor did it belong to any of his disciples. If the recording had surfaced today, it would be difficult to prove that it was fake.

  – dn

 3. Anonymous म्हणतो आहे:

  एक प्रचंड खरखर असलेली आणि भास्करबुवा बखले यांची मानलेली गाण्याची ओळ, म्हणजे खयालातले एखाद-दुसरे आवर्तन असणार, शैला दातार यांच्याकडे आहे. पण ते बुवांचेच कशावरून याची खात्री नाही, आणि बुवांचे असले तरी त्या ध्वनिमुद्रणाचा दर्जा इतका खराब आहे (इति शैलाताई) की तसला आवाज़ उपलब्ध असल्याचा काही फायदा नाही. अल्लादिया खानसाहेबांच्या नांवावर लावलेला असाच एक खरखरीचा तुकडा घेऊन त्याची खात्री करायला अनेक लोक अज़िज़ुद्दीन बाबांकडे ज़ात असत. १९३० नन्तर खानसाहेबांना (जन्म: १८५५-५६) लोकांनी ध्वनिमुद्रणाची अनेकदा विनन्ती केली, पण ‘माझा म्हातारपणीचा आवाज़ आठवण म्हणून मागे ठेवणे नको’ असे सांगून त्या नाठाळ म्हातार्‍याने ते सगळे प्रस्ताव धुडकावले. मात्र त्या भावनेमागे तथ्य आहे, हे मान्य करावेच लागेल.

  ‘मी गायक नाहीच’ असे स्वत:विषयी म्हणणारे, आणि गायनाचा रियाज़ टाळण्याबद्‌दल भास्करबुवांची टीका ऐकावी लागणारे, गोविन्दराव टेम्बे ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटात ३-४ गाणी किती सुन्दर गायले आहेत हे ऐकल्यावर अल्लादिया खान, भास्करराव बखले हे लोक काय गात असतील याची कल्पना करता येते. मोगूबाई, मल्लिकार्जुन मनसूर, किशोरी आमोणकर हे लोक अल्लादियांच्या तोडीस तोड, कदाचित त्यांच्याहूनही चांगले, गात असतील अशी शक्यता आहे. पण अल्लादिया, भास्करबुवा (आणि काही प्रमाणात टिळकांचा मानल्या गेलेला आवाज़ खरा नसल्यास टिळकही) यांचा आवाज़ शिल्लक नाही ही दुर्दैवाची गोष्ट खरीच.

  तो आवाज़ खरेच टिळकांचा असेल तर आनन्दच आहे; साधासुधा नाही तर प्रचण्ड आनन्द आहे. पण त्यांचा आवाज़ शिल्लक असला-नसला तरी फार फरक पडत नाही.

  – नानिवडेकर

  • निखिल बेल्लारीकर म्हणतो आहे:

   ओके, तुमचे म्हणणे बऱ्याच अंशी पटले. भास्करबुवांचा आवाज उपलब्ध नाही म्हणालात म्हणून म्हणतो की:

   दिलेल्या माहितीवरून, ज्या ध्वनिफितीत टिळकांचा आवाज आहे त्यात भास्कर बुवांचाआवाज पण असलाच पाहिजे-त्याचा बातमीत विशेष उल्लेख का बरे नाही?, रिझनेबल लांबीचे रेकोर्डिंग नसेल तर मात्र संशय घेण्यास बरीच जागा आहे.ते दुसरे खरखरभरले रेकोर्डिंग शैला दातार यांनी ऐकले आहे असा उल्लेख तुम्ही केला, तर बातमीत सांगितलेली ध्वनीफीत देखील त्यांनीच ऐकली असेच दिले आहे. जर त्यांनी टिळकांच्या आवाजाची क्लिप ऐकलीये तर मग बखलेबुवांबद्दल देखील न्यूज यायला हवी होती . त्यांच्याशी संपर्क साधता येईल का? म्हणजे दोन गोष्टी साध्य होतील:

   १. बखल्यांचा आवाज आहे की नाही हे सिद्ध होईल-आधी मुळात ध्वनिफितीची लांबी, गायकीचा ढंग , वगैरे.

   २. त्यातून लोकमान्यांचा आवाज देखील सिद्ध होण्यास अजून एक आधार मिळेल.

   • Anonymous म्हणतो आहे:

    Laxmi-chand Seth (Narang) was a Bal Gandharva fan and he may well have been present to record Bhaskarbuwa Bakhale and BG’s singing in Sept-1914/15. But during Shaila Datar’s research (in 1990s) for her book on Bhaskarbuwa, I doubt she came to know about any such attempt at recording. Her book finds no mention of this attempt, IIRC. Whether Bakhale’s voice has also come to light now is a point worth following. Shaila Datar lives between Paud Phata and Alankar Police Chowki, behind Atithee/Prachi eatery; try to meet her if you want to follow up on this. Bakhale’s voice is not of as much interest to the general public as Lokmanya’s, so I am willing to pass over any lack of discussion about Bakhale over the past few weeks.

    I do not know how often recording was attempted at public functions around 1915, but it is a point worth considering. If anybody wanted to record Tilak, it could have been done in a studio; same with Bakhale and BG. I doubt anybody would attempt recording at a public function in 1915. Also, in those days recordings were not started before the main program even began. If the machine could not record for more than 3-4 minutes at a stretch (a valid assumption, I think), it is unlikely that the recording machine was on while attempts were being made to quiet the crowd. The crowd seems to have magically fallen silent once Lokmanya began to speak. Not impossible but somewhat unlikely. I am now curious whether even Edward VII’s (d 1910) or Asquith’s or David Lloyd George’s voice from 1910s is available. A recordist in 1910s, IMO, was more likely to avoid a public function to do his recording than seek such a setting. My biggest suspicion is still centred on the recording being on just when Lokmanya decided to intervene.

    – dn

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s