Category Archives: ग्रीस

ट्रोजन युद्ध भाग ३.४- लाकडी घोडा ऊर्फ ट्रोजन हॉर्स आणि ट्रॉयचा समूळ विनाश.

प्रस्तावना हा कथाभाग सर्वांत नाट्यपूर्ण, थरारक अन तितकाच करुण आहे. अख्ख्या कथेचा क्लायमॅक्स या भागात पहावयास मिळतो. ओडीसिअसचे लोकोत्तर चातुर्य, ग्रीकांची अपरिमित हाव आणि क्रूरता तसेच ट्रोजनांची त्यांच्या दुर्दैवाने उडालेली दैना हे सर्व या भागात एकवटलेले आहे. पोस्टहोमेरिकामधील बुक क्र. … Continue reading

Posted in ग्रीस | 7 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग ३.३- अकिलीसपुत्र निओटॉलेमस(Neoptolemus) याचे आगमन व त्याकडुन ट्यूथ्रॅनियन युरिपिलस(Eurypylus) याचा वध, प्रख्यात धनुर्धर फिलोक्टॅटेस(Philoctates) चे पुनरागमन व त्याकडून पॅरिसचा वध.

अंमळ स्पष्टीकरण मागील भागात आपण पाहिले की थोरल्या अजॅक्सने आत्महत्या केली. यापुढील कथाभाग क्विंटस स्मिर्नियस आणि एपिक सायकल व अन्य सोर्सेस यांमध्ये अंमळ वेगळा आहे. म्हणजे साधारणपणे पाहता घटना त्याच आहेत, पण त्यांचा क्रम बदललेला आहे आणि काही घटनांचे कर्तेही … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

ट्रोजन युद्ध भाग ३.२- अकिलीसच्या शवाभोवतीची लढाई, अंत्यविधी व फ्यूनरल गेम्स. जजमेंट ऑफ आर्म्स आणि थोरल्या अजॅक्सची आत्महत्या.

अकिलीसच्या शवाभोवतीची तुंबळ लढाई- थोरल्या अजॅक्सचा महापराक्रम आणि ओडीसिअसची समर्थ साथ. अकिलीस मृतावस्थेत पडला तरी ट्रोजन सैनिक घाबरून त्याच्या जवळ येत नव्हते. पण मग पॅरिसने त्यांना ओरडून धीर दिला, “आजवर ट्रॉयचे अन ट्रोजन लोकांचे सर्वांत जास्त नुकसान करणारा अकिलीस अखेर … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | 4 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग ३.१- अकिलीसचे शेवटचे पराक्रम व मृत्यू.

ग्रीक एपिक सायकल- पार्श्वभूमी. मागील भागात पाहिल्याप्रमाणे हेक्टरच्या मरणानिशी इलियड संपते, तर ट्रॉयचा पाडाव झाल्यानंतर ओडीसिअस त्याच्या घरी इथाका येथे १० वर्षांनंतर पोहोचतो तो १० कालखंड ओडिसीमध्ये आलेला आहे. पण मधल्या काळात ज्या सर्वांत महत्त्वाच्या घटना घडल्या, त्यांचे ओडिसीमध्ये अगदीच … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

ट्रोजन युद्ध भाग २.५ – पॅट्रोक्लसचा अंत्यविधी आणि प्रिआमची यशस्वी गांधीगिरी-हेक्टरचा अंत्यविधी.

पॅट्रोक्लसचा अंत्यविधी मागील भागात सांगितल्याप्रमाणे अकिलीसने हेक्टरची डेडबॉडी रथामागे फरपटत आणली आणि पॅट्रोक्लसच्या चितेजवळ तशीच ठेवून दिली आणि आगामेम्नॉनला सांगितले की उद्या सकाळी लाकडे इ. आणा. सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू बाराव्याचे जेवण असाव तसे बरेच बैल, बोकड अन रानडुकरे कापून … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | 3 प्रतिक्रिया

ट्रोजन युद्ध भाग २.४- अकीऽऽलिस! अकीऽऽलिस!! अकीऽऽलिस!!!

पॅट्रोक्लसच्या प्रेताभोवती तुंबळ कापाकापी होते. मागच्या भागात अकिलीसचा भाऊ पॅट्रोक्लस हेक्टरच्या हातून मरण पावला त्याचा वृत्तांत आलेला आहे. तो मेल्यावर माशा घोंगावाव्यात तसे त्याच्या प्रेताभोवती ट्रोजन घोंगावू लागले. उद्देश अर्थातच त्याचे चिलखत काढून घेणे हा होता. संपूर्ण इलियड आणि एकूणच … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा

ट्रोजन युद्ध भाग २.३-इलियडमधील हेक्टरपर्व आणि पॅट्रोक्लसचा मृत्यू.

सर्वप्रथम या लेखमालेतला हा चौथा भाग येण्यास कल्पनातीत उशीर झाला त्याबद्दल सर्व वाचकांची क्षमा मागतो. कधी हे नैतर ते अशी नाना खेकटी मध्ये आल्यामुळे फार वेळ गेला. पण गेले काही दिवस काम सुरू असून आता ही लेखमाला लौकरच वेग घेऊन … Continue reading

Posted in इतिहास-इतर जग, ग्रीस | यावर आपले मत नोंदवा